Just another WordPress site

इतकंच लक्षात ठेव, त्याचा बाप वसंत मोरे आहे…!

"सावध रहा रुपेश" काय आहे ही नेमकी बातमी नक्की बघा

 मनसेचे पुण्यातील नेते वसंत मोरे काही ना काही कारणामुळे सतत चर्चेत आहेत.  विविध उपक्रम आणि आंदोलनांमुळे वसंत मोरे सगळ्यांचं लक्ष वेधून घेतात. मात्र, आता ते वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहेत. वसंत मोरे यांच्या मुलाला धमकीचं पत्र मिळाल्याने एकच खळबळ उडाली आहे. या धमकीच्या पत्रामध्ये सावध राहा रुपेश असा मजकूर लिहिण्यात आला आहे. ही चिठ्ठी रुपेश मोरे यांच्या कारवर ठेवण्यात आली होती. या प्रकरणी वसंत मोरे यांचे सुपूत्र रूपेश मोरे यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल केली आहे. पोलीस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत. स्वःतः वसंत मोरे यांनी फेसबुकवर पोस्ट लिहित याबाबतची माहिती दिली.

 

GIF Advt

पोस्टमध्ये नेमक काय लिहिलंय?

“मुलगा म्हटलं की प्रत्येक बापाचा अभिमान असतो आणि बाप म्हटलं की प्रत्येक पोराचा आयडॉल असतो…आमचंही अगदी तसंच आहे, पण कोणाला तरी हे का खटकतंय तेच समजत नाही… राजकारणात काम करत असताना अनेकदा कळत नकळत कधी कोण शत्रू होतो तेच समजत नाही…गेले दोन तीन दिवस झालं बोलू की नको तेच समजत नव्हतं, पण आज ठरवलं तुमच्या सोबत बोललच पाहिजे…!

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!