Just another WordPress site

एकही आमदार शिवसेनेतून फुटला तर कायद्याची पर्वा न करता त्याला रस्त्यात तुडवा,व्हिडिओ व्हायरल..?

मुंबई प्रतिनिधी – शिवसेनेचे कट्टर नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे महाराष्ट्र ढवळून निघाला आहे. या घटनेनंतर गोट्यात अस्वस्थता पसरली आहे. दरम्यान राज्यभरातून शिवसैनिकांचा संताप पाहायला मिळत आहे. भारतमाता चौकात सेनेच्या कार्यकर्त्यांनी शक्तिप्रदर्शन केलं. काही शिवसैनिकांनी वर्षा बंगल्यावर धाव घेत एकनाथ शिंदेंविरोधात घोषणाबाजी केली. यावेळी उद्धव ठाकरे यांनीही समोर येऊन त्यांना वज्रमूठ दाखवली.

दुसरीकडे सोशल मीडियावरही एकनाथ शिदेंच्या अकाऊंटवर विविध नाराजीच्या प्रतिक्रिया येत आहे. त्यामुळे शिंदेच्या बंडामुळे शिवसैनिक नाराज असल्याचंही दिसून येत आहे. दरम्यान बाळासाहेब ठाकरेंचा एक video सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यापुढे एकही आमदार शिवसेनेतून फुटला तर कायद्याची पर्वा न करता त्याला रस्त्यात तुडवा, असं या व्हिडीओमध्ये बाळासाहेब म्हणत आहे. बाळासाहेब ठाकरेंना हा जुना व्हिडीओ पुन्हा सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

बघा व्हिडिओ

 

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!