Just another WordPress site

थेऊर येथे अल्पवयीन मुलीचा दगडाने ठेचून खून, पोलीस घटनास्थळी दाखल, पुढील तपास सुरू

लोणी काळभोर प्रतिनिधी – राज्यामध्ये दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत चालली आहे. त्यातच पुणे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात खुनाचे प्रकार घडत आहेत. अशीच एक धक्कादायक घटना थेऊर येथे घडली आहे. थेऊर येथील यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या मोकळ्या जागेत १६ते १७ वर्षीय अल्पवयीन मुलीची निर्घृण हत्या करून मृतदेह टाकल्याचे आढळून आले आहे. सदर मुलीची ओळख अद्यापही पटलेली नाही. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, थेऊर पोलीस चौकीच्या समोरील बाजूस यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या मोकळ्या जागेत आज मंगळवार पहाटेच्या सुमारास काही नागरिकांना संबंधित मुलीचा मृतदेह आढळून आला त्यानंतर नागरिकांनी तातडीने ही घटना लोणी काळभोर पोलिसांना कळविली. या घटनेची माहिती मिळताच लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक व त्यांचे सहकारी घटनास्थळी तातडीने दाखल झाले आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास लोणी काळभोर पोलीस करीत आहेत.नेमका हा खून कोणत्या कारणाने झाला हे पोलिस तपासात लवकरच उघड होईलं

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!