Just another WordPress site

दहावीतली मुलगी गरोदर,नंतर कळलं शिक्षकानेच केला बलात्कार, गुन्हा दाखल

धाराशिव प्रतिनिधी – शिक्षकी पेशाला काळीमा फासणारी धक्कादायक घटना धाराशिवमध्ये घडली. एका शिक्षकाने विद्यार्थीनीवर वारंवार बलात्कार केला. ही विद्यार्थीनी गरोदर राहिल्यानंतर हे संपूर्ण प्रकरण उघडकीस आलं. आता या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. शिक्षक अमित माळी विरोधात पोलिसांनी कळंब पोलीस ठाण्यात  गुन्हा नोंदवला असून पुढील तपास सुरु आहे. धाराशिव जिल्ह्यातल्या कळंब तालुक्यातील सावित्रीबाई प्राथमिक विद्यालयात ही धक्कादायक घटना घडली आहे. कलम 376,(2)(फ) भा.द.वि. सह 4, 8, 12 आण बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक अधिनियम अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पीडित मुलगी दहावीची विद्यार्थीनी असून तिच्या कुटुंबीयांनाही मोठा धक्का बसलाय. पीडित मुलगी दोन महिन्यांची गर्भवती असल्यानंतर हे भयंकर प्रकरण उघडकीस आलंय.

GIF Advt

दहावीत शिक्षणाऱ्या या विद्यार्थीनीवर नराधम शिक्षकाने वारंवार बलात्कार केला. गेले अनेक दिवस हा नराधम शिक्षक मुलीचा लैगिंक छळ करत होता, असा आरोप करण्यात आलाय. ही मुलगी एके दिवशी स्कुटीवरुन प्रवास करत होती. त्यावेळी तिला अचानक रक्तस्त्रावाचा त्रास सुरु झाले. त्यामुळे या मुलीच्या कुटुंबीयांनी तिला जवळच्या रुग्णालयात नेलं. तिथे या मुलीची तपासणी केल्यानंतर ही मुलगी दोन महिन्यांची गर्भवती असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली. यानंतर पीडित मुलीचे कुटुंबीय हादरुन गेले होते. नराधम शिक्षकाने केलेल्या या कृत्यामुळे कळंब मध्ये संताप व्यक्त केला जातोय. तसंच विद्यार्थीनींच्या पालकांमध्ये भीती पसरली आहे. व्हॉट्सअप द्वारे चॅटिंग करून कळंब येथील फिर्यादीच्या आत्याच्या घरी इतर कोणी नसताना इच्छेविरुद्ध या शिक्षकाने संबंध ठेवले आणि तिचा बलात्कार केला. दरम्यान, मुलीची कुटुंबीयांनी विचारपूस केली. तेव्हा याप्रकरणी अधिक खुलासा झाला. अखेर मुलीनेच या शिक्षकाविरोधात जबाब दिलाय. आता कळंब पोलिसांनी गुन्हा दाखल करुन घेत या शिक्षकाला अटकही केली आहे. तसंच या शिक्षकाला दोन दिवसांची पोलीस कोठडीदेखील सुनावण्यात आलीय.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!