Just another WordPress site

पत्नीचा खून करुन मेव्हणीवर चाकूने केले वार, हडपसर मधील घटना

हडपसर विशेष प्रतिनिधी – दारुच्या नशेत पत्नीला पट्ट्याने मारहाण करीत असल्याची तक्रार आईला केल्याच्या कारणावरुन पत्नीवर चाकूने वार करुन तिचा पतीने खून केला तिला सोडविण्यासाठी आलेल्या मेव्हणीवरही वार करुन तिच्यावर खूनाचा प्रयत्न केल्याचा प्रकार हडपसरमधील साडेसतरानळी येथे घडला. याप्रकरणी पोलिसांनी पती हनुमंत धोंडिबा पवार (वय २२, रा. सूर्यवंशी बिल्डिंग, तोरडमल वस्ती, साडेसतरानळी, हडपसर) अटक करण्यात आली आहे. नंदिनी हनुमंत पवार (वय १९) असे खून झालेल्या पत्नीचे नाव आहे. तर मेव्हणी कोमल वैजनाथ लांडगे (वय २२, रा. साडेसतरानळी, हडपसर) या जखमी झाल्या आहेत. याप्रकरणी नंदिनीची आई माणिका शिवाजी कांबळे (वय ५५, रा. सूर्यवंशी बिल्डिंग, तोरडमल वस्ती, साडेसतरानळी, हडपसर) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद (गु. रजि. नं. ८१३/२२) दिली आहे.

GIF Advt

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नदिंनी आणि हनुमंत यांना सहा महिन्यांची मुलगी आहे. तिला सांभाळण्यासाठी नंदिनीसोबत तिची बहिणी रहात होती. हनुमंत हा बिगारी काम करतो. त्याला दारुचे व्यसन आहे. तो पत्नीला वारंवार मारहाण करीत असे. मंगळवारी रात्री हनुमंत याने नंदिनीला पट्ट्याने मारहाण केली असता त्याबद्दल ती आपल्या आईला सांगत होती. त्यावेळी हनुमंत तेथे आला. त्याने तू तुझ्या आईला काय सांगत आहेस. तुला आता सोडत नाही, असे म्हणून दारुच्या नशेत त्याने त्याच्याकडील चाकूने नंदिनीच्या छातीवर, पोटावर वार केले. ते पाहून तिला वाचविण्यासाठी तिची बहीण कोमल धावत गेली. तेव्हा त्याने तिच्यावरही वार करुन तिला गंभीर जखमी केले. या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त नम्रता पाटील, सहायक पोलीस आयुक्त बजरंग देसाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद गोकुळे यांनी भेट दिली. अधिक तपास हडपसर पोलीस करीत आहेत

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!