Just another WordPress site

पुण्यात शिवसेनेला खिंडार..! उद्धव ठाकरेंची शिवसेना धोक्यात…? शिवसेनेचे माजी नगरसेवक नाना भानगिरे शिंदे गटात सामील

पुणे प्रतिनिधी –  शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जाणारे शिवसेना आमदार संतोष बांगर हे सोमवारी शिंदेगटात सामील झाले. हा एक धक्का पचत नाही तोच आणखी एक झटका पुण्यातील नगरसेवकाने उद्धव ठाकरेंना दिल्याचे दिसत आहे. शिवसेनेचे माजी नगरसेवक नाना भानगिरे मंगळवारी शिंदे गटात सामील झाले. इतकच नव्हे तर त्यांचे कार्यकर्तेही शिंदे गटात सहभागी होणार असल्याचे उघड झाले आहे.

GIF Advt

नाना भानगिरे हे आतापर्यंत पुणे महानगरपालिकेत तीनवेळा नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत. महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर भानगिरे यांनी पक्षाला रामराम ठोकल्याने शिवसेनेची चिंता वाढली आहे. हडपसर भागात भानगिरे यांच्या कार्यकर्त्यांचे मोठे पाठबळ असून तेही शिंदे गटात सहभागी होणार असल्याची चिन्ह दिसत आहेत. त्यामुळे भानगिरे यांच्या शिंदे गटात जाण्याने शिवसेनेला मोठे खिंडार पडल्याचे दिसत आहे. हडपसर भागात कार्यकर्त्यांचे मोठे जाळे असणाऱ्या नाना भानगिरे यांच्यासोबत शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचा एक मोठा गट देखील शिंदे गटात सहभागी होणार असल्याची माहिती मिळत आहे. भानगिरे यांना विधानपरिषद आमदारपदाची संधी किंवा एखाद्या महामंडळाचे अध्यक्षपद मिळण्याची देखील शक्यता आहे. याचीच फिल्डिंग लावण्यासाठी पुण्यातील शिवसेनेचे काही माजी नगरसेवक मुंबईत पोहचले असून आज संध्याकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या गटाला चर्चेचे निमंत्रण देखील दिल्याची माहिती आहे.दरम्यान, येत्या काही दिवसांत पुणे महापालिकेची निवडणूक येऊ घातली आहे. अशात आधीच पुण्यात शिवसेनेची ताकद जेमतेम असल्याने भानगिरे यांच्या रूपाने शिंदे गट पुणे शिवसेनेला मोठा धक्का देण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे पुण्यात शिवसेनेच्या गोटात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!