Just another WordPress site

महाराष्ट्राच्या राजकारणात पुढचे 15 तास महत्त्वाचे, काय घडणार,ही बातमी बघा

महाराष्ट्र विशेष प्रतिनिधी – महाराष्ट्राच्या राजकारणात मागच्या 24 तासांमध्ये मोठी उलथापालथ झाली आहे. एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  यांचं सरकार अडचणीत सापडलं आहे. त्याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्रिमंडळाची बैठक बोलावली आहे. या बैठकीमध्ये उद्धव ठाकरे नेमका काय निर्णय घेणार, याकडे लक्ष लागलं आहे. पुढच्या 15 तासांमध्ये महाराष्ट्राच्या राजकारणात नेमकं काय होऊ शकतं, याचा आढावा घेऊया.

GIF Advt

मुख्यमंत्री राजीनामा देणार?

एकनाथ शिंदे यांच्यासोबत 32 आमदार आहेत, तर उद्या सूरतमध्ये 4 अपक्ष आमदार येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. जर एकनाथ शिंदे यांच्याकडे एवढे आमदार असतील तर महाविकासआघाडी सरकार अल्पमतात येईल, त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राजीनामा देणार का? हा प्रश्न उपस्थित होत आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्रिमंडळाची बैठक बोलावली नाही ना?याबाबत उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत.
शिवसेनेने गटनेतेपदावरून एकनाथ शिंदे यांना हटवून अजय चौधरी यांना ही जबाबदारी सोपवली आहे. अजय चौधरी यांची गटनेतेपदी नियुक्ती करताना शिवसेनेच्या 17 आमदारांच्या सह्या त्यावर होत्या, पण एकनाथ शिंदे यांच्याकडे 17 पेक्षा जास्त आमदार आहेत, त्यामुळे या आमदारांनी एकनाथ शिंदे यांना गटनेतेपदासाठी समर्थन दिलं, तर पुन्हा एक वेगळा पेच निर्माण होऊ शकतो.
आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!