Latest Marathi News
Ganesh J GIF

माकडाला चिप्स द्यायला गेला अन् दरीत कोसळला… पुढे काय झालं..? ही बातमी बघा

महाबळेश्वर प्रतिनिधी : प्रभातगड मुख्य घाटरस्त्यावर शंभर फूट खोल दरीत पर्यटक कोसळल्याची घटना घडली. ३३ वर्षीय पर्यटकास तीन तासांच्या प्रयत्नानंतर महाबळेश्वर ट्रेकर्सच्या जवानांनी दरीबाहेर सुखरूप बाहेर काढले आहे. संदीप ओमकार नेहते असं पर्यटकाचं नाव असून ते माकडाला चिप्स खायला देण्यासाठी गाडीमधून उतरले. त्यावेळी घाटातील कठड्यावरून पाय घसरून शंभर फूट कोसळल्याची माहिती मिळत आहे. ही घटना सोमवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास घडली.

पोलिसांनी दिलेल्या  माहितीनुसार, संदिप ओमकार नेहते आणि त्यांचे कुटुंबीय हरिहरेश्वर जिल्हा रायगड येथून महाबळेश्वर येथे पर्यटनास जात होते. त्यावेळी अंबनेळी घाटरस्त्यामार्गे येत असता त्यांनी जन्नी मंदिरावरील बाजूस रस्त्याजवळ कठड्यावर काही माकडे दिसली. त्यामुळे संदिप नेहते हे वाहनातून उतरून माकडांना चिप्स खायला देण्यासाठी दरीवर असलेल्या कठड्यावर उभे राहिले. त्यावेळी त्यांचा पाय घसरून ते थेट शंभर फूट दरीमध्ये कोसळले. नेहते कोळल्याची माहिती महाबळेश्वर पोलीस आणि महाबळेश्वर ट्रेकर्सच्या जवानांना मिळताच घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर पोलीस आणि ट्रेकर्सच्या जवानांनी संततधार पावसात तीन तासांच्या अथक प्रयत्नानंतर संदीप नेहते यांना सुखरूप दरीबाहेर काढले. त्यानंतर त्यांना ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपाचारांनंतर जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.या मोहिमेत महाबळेश्वर ट्रेकर्सचे सुनिलबाबा भाटिया, माजी नगरसेवक कुमार शिंदे, अमित कोळी,सुनील वाडकर, सुनील केळगणे, बाळासाहेब शिंदे, सौरभ साळेकर,जयवंत बिरामणे, अमित झाडे, सौरभ गोळे,संतोष आबा शिंदे, अनिकेत वागदरे, सतीश ओंबळे, सूर्यकांत शिंदे यांनी मोलाची भूमिका बजावली. यासह महाबळेश्वरचे पोलीस निरीक्षक संदीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस फौजदार डी.एच पावरा, संदीप मांढरे, सलीम सय्यद, जगताप आदींनी सहकार्य केले

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!