Just another WordPress site

लोणी काळभोर हद्दीत आढळला होता अज्ञात तरुणीचा मृतदेह, बघा नेमकी काय आहे ही बातमी..!

पुण्यातील लोणी काळभोर पोलीस स्टेशनच्या हद्दीतून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका 20 ते 25 वर्षीय मुलीची निर्घृणरित्या हत्या करण्यात आली. थेऊर येथील एका मोकळ्या जागेत हा मृतदेह सापडला.

 पुणे विशेष प्रतिनिधी –   लोणी काळभोर पोलीस स्टेशनच्या हद्दीतून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका 20 ते 25 वर्षीय मुलीची निर्घृणरित्या हत्या करण्यात आली. थेऊर येथील एका मोकळ्या जागेत हा मृतदेह सापडला. थेऊर पोलीस चौकीपासून काही अंतरावर हा मृतदेह सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. मयत मुलीची ओळख मात्र अद्याप पटली नाही.

5 जुलैच्या पहाटेच्या सुमारास काही नागरिकांना थेऊर पोलीस चौकीपासून काही अंतरावर असणाऱ्या मोकळ्या जागेत मुलीचा मृतदेह आढळला. त्यानंतर त्यांनी तातडीने पोलिसांना ही माहिती दिली. माहिती मिळताच लोणी काळभोर पोलिसांचे एक पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले आहे. पोलिसांसोबतच डॉग्स स्कॉड ही दाखल झाले आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत. दरम्यान मृत तरुणी ही अंदाजे 20 ते 25 वयोगटातील आहे. अज्ञात आरोपींनी अतिशय निर्घृणपणे तिचा खून केल्याचे दिसत आहे. तिच्या चेहऱ्यावर दगडाने वार केल्याचा देखील खुणा दिसत आहेत. पोलीस या तरुणीची ओळख पटवण्याचा प्रयत्न करत आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एक अनोळखी महिला वय अंदाजे 20 ते 25वर्षे नाव व पत्ता माहिती नाही. अंगाने- मध्यम बांधा, रंगानेसावळी, चेहरा- गोलाकार, उंची 5 फुट 2 इंच, नेसणीस- गुलाबी रंगाचा टॉप व लालसर चॉकलेटी रंगाची लेगीन्स, पायात- चॉकलेटी रंगाची चष्बल, दोन्ही पायात पैजन,डावे नाकपुडीवर चमकी टोचलेली, बेन्टेक्सचे मंगळसुत्र व निळया रंगाची बांगडी व त्यावर सोनेरी रंगाची फुलांची नक्षी असलेली, डाव्या हाताच्या मनगटाचे पोटरीवर व त्याखाली बदामाचा आकार गोंदलेले आहे.

मृददेह सापडून 24 तास उलटून गेले आहे तरी तरुणीची ओखळ पटली नाही आहे. ओखळ पटवण्यासाठी पोलिसांनी नागरिकांना आवाहन केलं आहे. तरुणीच्या कुटुंबीयांची देखील माहिती मिळत नसल्याने लोणी पोलिस त्रस्त आहेत. काही दिवसांपुर्वी चंद्रपूर मध्ये देखील असंच प्रकरण समोर आलं होतं. 24 वर्षीय तरुणीची हत्या करुन तिचा मृतदेह फेकून देण्यात आला होता. पोलिसां 2 दिवसांनी तो मृतदेह सापडला होता. मैत्रिणीने कट रचून तिची हत्या केल्याचं समोर आलं होतं.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!