Just another WordPress site

सासवड रोडवरील सत्यपुरम ते भेकराईनगर पालखी मार्गाचे झाले डांबरीकरण

हडपसर,पुणे प्रतिनिधी –  फुरसुंगी येथील सत्यपुरम ते भेकराईनगर पोलीस चौकी पेट्रोल पंप रस्त्याचे रुंदीकरण काम पूर्ण अखेर या रस्त्यावरील अपघाताची मालिका खंडित होण्यास मदत होईल सतत होणाऱ्या अपघाताला सर्वसामान्य नोकरदार ज्येष्ठ नागरिक विद्यार्थी कंटाळले होते धुळीचा देखील मोठ्या प्रमाणावर त्रास होत होता अखेर भाजपच्या सततच्या पाठपुराव्याला यश आले.

GIF Advt

भारतीय जनता पार्टी हवेली तालुका अध्यक्ष धनंजय कामठे व हवेली तालुका उपाध्यक्ष संतोष रमेश हरपळे यांनी सतत केलेल्या पाठपुराव्यामुळे हडपसर सासवड रोड वरील तुकाई दर्शन ते भेकराईनगर या पालखी महामार्गाची डागडुजी व रस्ता रुंदीकरण हे काम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणामार्फत गेल्या सात दिवसांपासून चालू होते. गेल्या सात दिवसापासून धनंजय कामठे व  संतोष हरपळे नियमित या कामाची पाहणी करीत होते. आज हे काम पूर्ण झाले. पुण्याचे खासदार  गिरीश बापट, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी तसेच नागरिकांनी केलेले सहकार्य यामुळेच हे शक्य होऊ शकले. यावेळी धनंजय कामठे, संतोष हरपळे, प्रथमेश जगताप, सचिन कामठे ,आकाश हरपळे इत्यादी उपस्थित होते

 

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!