Just another WordPress site

पोलिसाचा तो एक शब्द लागला जिव्हारी; महिलेनं विष प्राशन करत उचललं टोकाचं पाऊल

बघा नेमक काय घडल..?

0 412

लखनऊ प्रतिनिधी – उत्तर प्रदेशातील पिलीभीत जिल्ह्यात एका महिलेने विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना उघडकीस आली आहे. माधोतांडा येथील प्रभारी पोलीस निरीक्षक यांनी चारित्र्यहीन म्हटल्याने गी गोष्ट महिलेला खटकली. यानंतर तिने आत्महत्येचा प्रयत्न केला (Woman Attempt Suicide). पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार महिलेला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून तिची प्रकृती सध्या स्थिर आहे.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आपल्या मुलीवर झालेल्या अत्याचाराची तक्रार करण्यासाठी महिला शुक्रवारी माधोतांडा पोलीस ठाण्यात गेली होती. इन्स्पेक्टरने चारित्र्यहीन म्हटल्यानंतर पीडित महिलेने घरी येऊन विष प्राशन केल्याचा आरोप आहे. महिलेला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तिची प्रकृती स्थिर आहे. ही बाब पोलीस अधीक्षक (एसपी) यांच्या निदर्शनास आल्यानंतर संपूर्ण प्रकरणाचा तपास तात्काळ परिमंडळ अधिकारी (सीओ) पुरणपूर यांच्याकडे सोपविण्यात आला. माधोतांडा येथे पोहोचल्यानंतर सीओने तपास सुरू केला आहे.

पिलीभीतचे पोलीस अधीक्षक दिनेश प्रभू यांनी शनिवारी पत्रकारांना सांगितलं की, महिलेच्या कुटुंबीयांनी माधोतांडा पोलीस स्टेशनच्या प्रभारींना लेखी तक्रार दिली. त्यानंतर या प्रकरणाचा तपास सीओ पुरनपूर यांच्याकडे सोपवण्यात आला असून ते तपास करत आहेत. पुढील चौकशीनंतर कारवाई केली जाईल. महिलेच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचं त्यांनी सांगितलं. पोलिसांनी यांनी जिल्हा रुग्णालयात दाखल पीडितेची भेट घेऊन या प्रकरणाची माहिती घेतली. संपूर्ण घटनेची माहिती घेतल्यानंतर त्यांनी पत्रकारांना सांगितलं की, या प्रकरणाची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आली आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!