पुणे प्रतिनिधी – करुणा शर्मा हिच्यासह अजयकुमार देडेवर पुण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनैसर्गिक अत्याचार, कौटुंबीक छळ अशा विविध कलमान्वये करुणा शर्मा आणि अजय देडेवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुण्यातील येरवडा पोलीस स्टेशनमध्ये हा गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसात गुन्हा दाखल झाल्याने करुणा शर्माच्या अडचणी वाढल्या आहेत.
पीडित महिलेला तिच्या पतीकडून घटस्फोट दे म्हणून धमकवल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २३ वर्षीय पीडित महिलेने करुणा शर्मा आणि तिच्या पतीने धमकावत शस्त्राचा धाक दाखवत जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप केला आहे. घटस्फोटासाठी जीवे मारण्याची धमकी देऊन अनैसर्गिक शारीरिक संबंध ठेवून मानसिक व शारीरिक त्रास दिल्याचा आरोप पीडित महिलेने केला आहे. पोलिसात करुणा शर्मा आणि अजयकुमार देडे या दोघांवर गुन्हा दाखल झाल्याने त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत.