# Maharashtra Khabar > Latest Marathi News ## Posts - [नारीशक्तीचा नवा अध्याय!; २०२९ पासून देशात महिला राज, ३३% जागा आरक्षित!](https://maharashtrakhabar.com/a-new-chapter-of-women-empowerment-women-rule-in-the-country-from-2029-33-seats-reserved/): भारतीय राजकारणात महिलांच्या सहभागासाठी एक नवा अध्याय सुरू होत आहे. संसदेच्या गुरुवारपासून सुरू होणाऱ्या तीन दिवसीय विशेष अधिवेशनात ‘नारी शक्ती वंदन अधिनियमा’तील महत्त्वपूर्ण दुरुस्त्यांवर चर्चा होणार आहे. विशेष म्हणजे, जनगणनेची वाट न पाहता २०११ च्या डेटाच्या आधारे महिला आरक्षण लागू करण्याचा केंद्र सरकारचा विचार असून, यामुळे २०२९ च्या लोकसभा निवडणुकीतच महिलांना ३३ टक्के जागा मिळू शकतात. या ऐतिहासिक चर्चेचे साक्षीदार होण्यासाठी देशभरातील विविध स्तरांतील महिलांना दिल्लीला बोलावले आहे. शिवसेनेच्या वतीने ‘लाडकी बहीण’ योजनेचे लाभार्थी, स्वच्छता कर्मचारी, शेतमजूर आणि बचत गटाच्या महिलांना निमंत्रित केले आहे. यातील अनेक महिला पहिल्यांदाच विमानातून प्रवास करून दिल्ली गाठत आहेत. तसेच टीडीपीनेही आपल्या महिला नेत्यांना आणि […] - [मीरा-भाईंदरमध्ये 'झोंबी ड्रग्स'चा शिरकाव?](https://maharashtrakhabar.com/zombie-drugs-entering-mira-bhayander/): गोरेगावातील त्या कॉन्सर्टच्या नावाखाली रेव्ह पार्टी झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. तरुणांकडून अपलोड करण्यात आलेल्या व्हिडिओत रेव्ह पार्टीचा उल्लेख असल्याचं समोर आलं आहे. या पार्टीत ड्रग्सच्या ओव्हरडोसमुळे दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. तर एक गंभीर अवस्थेत असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना ताजी असतानाच पुन्हा एकदा टेन्शन वाढवणारी बातमी आहे. मुंबईला लागून असलेल्या मीरा-भाईंदर परिसरातून एक अतिशय धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शहरात चक्क झोंबी ड्रग्स पोहोचल्याची भीती व्यक्त केली जात आहे. एका तरुणाचा रस्त्यावर विचित्र वागण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून, या तरुणाने झोंबी ड्रग्स घेतल्याचा दाट संशय व्यक्त केला जात आहे. व्हायरल झालेल्या […] - [आता एकाच वेळी मिळणार तीन महिन्यांचे धान्य](https://maharashtrakhabar.com/now-you-will-get-three-months-of-food-grains-at-once/): राज्य शासनाने रेशनकार्डधारकांसाठी मोठा दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. एप्रिल, मे आणि जून या तीन महिन्यांचे धान्य एकाचवेळी एप्रिल महिन्यात वितरित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.त्यामुळे लाभार्थ्यांना पुढील दोन महिने रेशन दुकानावर जाण्याची गरज भासणार नाही. विशेषतः आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी हा निर्णय फायदेशीर ठरणार आहे. नव्या निर्णयानुसार, लाभार्थ्यांना एप्रिलमध्येच तीन महिन्यांचे धान्य दिले जाणार आहे. त्यामुळे वारंवार रेशन दुकानावर जाण्याची गरज कमी होईल. यामुळे वेळेची बचत होण्यासोबतच नागरिकांचा त्रासही कमी होणार आहे. धान्य वितरण प्रक्रिया सुरळीत पार पडावी यासाठी प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. सर्व रेशन दुकानदारांना आवश्यक सूचना देण्यात आल्या असून, पुरेसा धान्यसाठा उपलब्ध करून देण्यावर भर दिला जात […] - ['तुमचे व्हिडिओ व्हायरल करेन', चाकणकरांनी नेत्यांना दिली धमकी? ठोंबरेंच्या दाव्याने खळबळ](https://maharashtrakhabar.com/i-will-make-your-videos-viral-chakankar-threatened-leaders-thombres-claim-creates-a-stir/): गेल्या काही दिवसांपासून राज्यात लिंगपिसाट अशोक खरात हे प्रकरण चांगलेच चर्चेत आहे. या प्रकरणी दिवसेंदिवस नवनवीन खुलासे होताना दिसत आहे. अशोक खरातची सध्या SIT चौकशी सुरु आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) नेत्या रूपाली ठोंबरे पाटील यांनी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्यावर अत्यंत गंभीर आणि थेट आरोप केले आहेत. नाशिक येथील भोंदूबाबा कॅप्टन अशोक खरात यांच्या लैंगिक शोषण आणि सेक्स रॅकेट प्रकरणात चाकणकरांच्या माध्यमातून महिलांवर थेट लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप केला आहे. रुपाली ठोंबरे यांनी चाकणकरांवर आरोप करत म्हटले की, दहावी नापास कोंबडी चोराच्या भोंदू बाबाच्या ट्रस्ट वरती तुम्ही आहात. तुमच्या माध्यमातून महिलांवरती लैंगिक अत्याचार […] - [कोयता गँगचा पुन्हा हैदोस!; मध्यरात्री १८ वर्षांच्या तरुणाची निर्घृण हत्या](https://maharashtrakhabar.com/koyata-gang-strikes-again-brutal-murder-of-18-year-old-youth-in-the-middle-of-the-night/): पुणे शहरातील विश्रांतवाडी परिसरात मध्यरात्री घडलेल्या हत्येच्या घटनेने खळबळ उडाली आहे. 18 वर्षीय तरुणाची काही जणांच्या टोळीने निर्घृणपणे हत्या केल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गौरव गणेश तेलंगी असे मृत तरुणाचे नाव आहे. त्याच्यात आणि काही आरोपींमध्ये गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू होता. याच वादातून आरोपींनी त्याच्यावर हल्ला करण्याचा निर्णय घेतल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. घटनेच्या दिवशी मध्यरात्रीच्या सुमारास गौरव परिसरात असताना आरोपींनी त्याला अडवले. त्यानंतर 3 ते 4 जणांनी त्याच्यावर धारदार शस्त्राने वार केले. या हल्ल्यात तो गंभीर जखमी होऊन खाली पडला. त्यानंतर आरोपींनी दगडाने त्याच्यावर वार करत क्रूरतेची […] - [दिवसा काम, रात्री गुप्त हालचाली! नाशिकच्या कंपनीत २०२२ पासून नेमकं काय घडत होतं?](https://maharashtrakhabar.com/work-during-the-day-secret-activities-at-night-what-exactly-was-happening-in-the-nashik-company-since-2022/): नाशिक शहरातील एका नामांकित बहुराष्ट्रीय आयटी कंपनीत समोर आलेल्या महिलांचे लैंगिक शोषण आणि सक्तीच्या धर्मांतरण प्रकरणाने आता अधिक भीषण वळण घेतले आहे. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या विशेष तपास पथकाला एका माजी कर्मचाऱ्याने दिलेल्या माहितीमुळे तपासाची व्याप्ती वाढली आहे. आरोपी हे केवळ काम करण्यासाठी नाही, तर त्यांचे ‘विशिष्ट मनसुबे’ पूर्ण करण्यासाठी सुटीनंतरही कंपनीत संशयास्पद हालचाली करत असल्याची माहिती समोर आली आहे. एसआयटीला संशय आहे की, मुख्य आरोपींनी 2022 पासूनच कंपनीत कट्टरतेचे विचार रुजवण्यासाठी आणि विशिष्ट धर्माच्या प्रसारासाठी जाळे विणण्यास सुरुवात केली होती. केवळ कामाच्या नावाखाली कंपनीच्या मालमत्तेचा आणि वेळेचा वापर करून काही महिला कर्मचाऱ्यांना मानसिक दबावाखाली ठेवले जात होते. तर आपले […] - [रुपाली चाकणकरांच्या बहिणीचा खळबळजनक आरोप; खरात वादाच्या भोवऱ्यात](https://maharashtrakhabar.com/sensational-allegations-by-rupali-chakankars-sister-kharat-in-the-midst-of-controversy/): नाशिकच्या भोंदू अशोक खरात प्रकरणात चौकशीचा फास अधिक घट्ट होताना दिसत आहे. राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या बहीण प्रतिभा चाकणकर यांची सोमवारी शिर्डी पोलीस ठाण्यात तब्बल 8 तास चौकशी करण्यात आली. यावेळी त्यांचा आणि मुलगा चिन्मय याचाही जबाब नोंदवण्यात आला. समता संस्थेमध्ये आपल्या नावावर असलेले खाते हे बनावट असून आपण त्यावर एक रुपयांचा व्यवहारदेखील केला नाही, त्यातील सर्व सह्या बनावट असल्याचा दावा प्रतिभा चाकणकरांनी केला. नाशिकचा भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणी राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या बहीण प्रतिभा चाकणकर यांची चौकशी करण्यात येत आहे. प्रतिभा चाकणकर सोमवारी शिर्डी पोलीस ठाण्यात हजर झाल्या. समता पतसंस्थेतील […] - [गाडी मालकांनो लक्ष द्या! १५ एप्रिलपासून बदलतोय नियम; 'ही' नंबर प्लेट नसेल तर रस्त्यावर गाडी काढणं पडणार महागात](https://maharashtrakhabar.com/car-owners-pay-attention-rules-are-changing-from-april-15-if-you-dont-have-this-number-plate-it-will-be-expensive-to-drive-your-car-on-the-road/): वाहन सुरक्षेसाठी अनिवार्य असलेली हाय सिक्युरिटी नंबर प्लेट आता केवळ गरज नसून सक्तीची झाली आहे. 15 एप्रिल 2026 पासून प्रशासनाने घेतलेल्या नवीन निर्णयानुसार, जुन्या नंबर प्लेट असलेल्या वाहनांना अनेक सेवांपासून वंचित राहावे लागणार आहे. यामध्ये पीयूसी सर्टिफिकेट नाकारणे आणि भरमसाठ दंड आकारणे यांसारख्या कारवाईचा समावेश आहे. सुदैवाने, या कामासाठी तुम्हाला आरटीओ ऑफिसच्या फेऱ्या मारण्याची गरज नाही. तुम्ही मोबाईलवरून अवघ्या काही मिनिटांत तुमची प्लेट बुक करू शकता. जाणून घ्या याची नेमकी प्रक्रिया काय आहे. आतापर्यंत तुम्ही तुमच्या कारमध्ये हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवण्यात आळशी होत असाल तर जास्त वेळ शिल्लक नाही. खरं तर, 15 एप्रिलपासून जर तुमच्या कारवर साधी नंबर प्लेट […] - [मुख्यमंत्री सहाय्यता निधी: 'हॉस्पिटल टू मंत्रालय' थेट कनेक्टिव्हिटी; ८ तासांत मिळणार मदत](https://maharashtrakhabar.com/chief-ministers-relief-fund-hospital-to-ministry-direct-connectivity-help-will-be-available-within-8-hours/): राज्यातील गरजू आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील रुग्णांना उपचारासाठी आर्थिक सहाय्य अधिक वेगात मिळणार आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाची अद्यावत ऑनलाईन प्रणाली सुरू होणार आहे. या प्रणालीमुळे अर्ज मंजुरीची प्रक्रिया कार्यालयीन 8 तासांत पूर्ण होणार आहे. विशेष म्हणजे आता रुग्णाऐवजी थेट कक्षाशी संलग्न असणाऱ्या रुग्णालयामार्फत अर्ज सादर होणार आहेत. त्यामुळे रुग्णाला कोणत्याही प्रकारचा अर्ज भरावा लागणार नाही. त्यामुळे उपचार प्रक्रियेला गती मिळणार आहे. या प्रणालीचे येत्या काही दिवसातच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उदघाटन करण्यात येणार आहे अशी माहिती मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रूग्णालय मदत कक्षा कडून देण्यात आली आहे. गेल्या काही वर्षभरापासून मुख्यमंत्री सहाय्यता […] - [पोलिस दलात मोठी खळबळ! अशोक खरात केसमध्ये 'आयजी' रडारवर](https://maharashtrakhabar.com/big-stir-in-the-police-force-ig-on-the-radar-in-ashok-kharat-case/): नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण आता अधिकच गडद होत चालले आहे. रूपाली चाकणकर यांच्या राजीनाम्यानंतर आता या प्रकरणाची झळ थेट पोलीस प्रशासनाला बसली आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी नाशिक विभागाचे पोलीस महानिरीक्षक दत्ता कराळे यांच्यावर गंभीर आरोप करत या प्रकरणाला नवीन वळण दिले आहे. श्री दत्ता कराळे हे एक IG लेवल चे पोलिस अधिकारी असतांना खारतांसारख्या बाबांच्या कार्यक्रमात का गेले ? तेथे भाषण देखील दिले? हे जेव्हा सामान्य जनता ऐकते तेव्हा खारतांवर विश्वास का नाही बसणार ? त्यांची देखील चौकशी departmental vigilance कडून झाली पाहिजे त्यांचे देखील थोडे थोडके… pic.twitter.com/FWq0dHHpdT — Mrs Anjali Damania (@anjali_damania) April 13, 2026   […] - [लाडक्या बहिणींनो लक्ष द्या! नवीन नोंदणी बंद, पण 'हे' काम राहिलं तर पैसे अडकणार](https://maharashtrakhabar.com/dear-sisters-pay-attention-new-registrations-are-closed-but-if-this-work-continues-money-will-be-stuck/): जळगावमध्ये ईकेवायसीच्या नावाखाली महिलेकडे शरीरसुखाची मागणी केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला. यावर महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी संताप व्यक्त केला. तसेच महिलांना महत्त्वाचे आवाहन देखील आदिती तटकरे यांनी केले आहे. महिलांनी कोणत्याही आमिषाला बळी पडू नये, त्याशिवाय नव्याने लाडकी बहीण योजनेची नोंदणी सुरू नसल्याचेही त्यांनी सांगितले. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ईकेवायसी करून देण्याच्या नावाखाली महिलांची फसवणूक होत असल्याचे निदर्शनास आले असून, महिलांनी कोणत्याही आमिषाला बळी पडू नये, असे आवाहन महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी केले आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी नव्याने नोंदणी प्रक्रिया बंद करण्यात आलेली आहे. मात्र, ईकेवायसी करताना काही त्रुटी राहिल्यास […] - [स्वत:वरच ॲसिड ओतलं अन् संपूर्ण शहर हादरवलं!; पंढरपूरमधील त्या तरुणीचा खळबळजनक बनाव उघड](https://maharashtrakhabar.com/she-poured-acid-on-herself-and-shocked-the-entire-city-the-sensational-story-of-that-young-woman-from-pandharpur-is-revealed/): पंढरपूर शहरात काल एका तरुणीवर ॲसिड हल्ला झाल्याच्या बातमीने मोठी खळबळ उडाली होती. मात्र, पोलिसांनी रात्रभर केलेल्या सखोल तपासानंतर या प्रकरणात एक अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे. संबंधित तरुणीवर कोणताही हल्ला झाला नसून, तिने स्वतःच हा ॲसिड हल्ल्याचा बनाव रचल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले आहे. प्राथमिक माहितीनुसार, हा सर्व प्रकार घरगुती वादातून आणि वैयक्तिक कारणातून घडला आहे. या तरुणीने स्वतःच घरातील टॉयलेट साफ करण्याचे ॲसिड घेतले आणि एका अंधाऱ्या ठिकाणी जाऊन ते स्वतःच्या अंगावर ओतून घेतले. त्यानंतर आपल्यावर अज्ञाताने ॲसिड हल्ला केल्याचा बनाव तिने रचला होता. घटनेचे गांभीर्य ओळखून पंढरपूरचे सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे यांनी तातडीने तपासाची चक्रे […] - [रेस्क्यू फाऊंडेशनमधून १३ तरुणींचं पलायन! १० बांगलादेशी तरुणींचाही समावेश](https://maharashtrakhabar.com/13-young-women-escape-from-rescue-foundation-10-bangladeshi-girls-included/): मोहम्मदवाडीतील ससाणे वस्ती परिसरातील रेस्क्यू फाउंडेशनमधून १० बांगलादेशी तरुणींसह १३ जणींनी थरारक पद्धतीने पलायन केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना २३ मार्च रोजी सकाळी ७ वाजता घडली असून, याबाबतचा एक व्हिडिओही समोर आला आहे.याप्रकरणी नुकताच काळेपडळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. यातील दोन तरुणी काही अंतरावरच आढळल्या असून त्यांना ताब्यात घेतले आहे. या प्रकारामुळे संस्थेच्या सुरक्षेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. पळून गेलेल्या सर्व तरुणी विविध पोलीस ठाण्यांमध्ये दाखल असलेल्या अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक कायदा अंतर्गत पीडित आहेत. या तरुणींवर दिघी, फरासखाना, शिरूर, देहूरोड, जेजुरी, कोंढवा व नगर येथील पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे नोंद आहेत. या घटनेनंतर काळेपडळ पोलीस […] - [गर्भवती महिलेलाही सोडलं नाही; नराधम अशोक खरातचा थरकाप उडवणारा प्रताप](https://maharashtrakhabar.com/even-a-pregnant-woman-was-not-spared-the-shocking-story-of-the-murderer-ashok-kharat/): दैवी शक्ती आणि तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलांचे लैंगिक शोषण करणाऱ्या अशोककुमार खरात उर्फ ‘कॅप्टन’ याच्या काळ्या साम्राज्यातील आणखी एक धक्कादायक रहस्य उघड झाले आहे. एसआयटीने खरातच्या ‘ओकस प्रॉपर्टीज’ कार्यालयाची झडती घेतली असता, तेथे हिरव्या मळकट रंगाचे एक संशयास्पद द्रव्य सापडले आहे. हेच ते गुंगीकारक औषध आहे का, ज्याचा वापर करून खरात महिलांना आपल्या जाळ्यात ओढत असे? याचे उत्तर आता फॉरेन्सिक अहवालातून मिळणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जप्त करण्यात आलेले हे द्रव्य अत्यंत संशयास्पद आहे. महिलांना बेशुद्ध करण्यासाठी किंवा त्यांच्यावर मानसिक नियंत्रण मिळवण्यासाठी खरात या द्रव्याचा वापर करत असल्याचा प्राथमिक अंदाज तपास यंत्रणांनी वर्तवला आहे. एसआयटीने हे नमुने तातडीने रासायनिक विश्लेषणासाठी प्रयोगशाळेत पाठवले […] - [सुनेत्रा पवारांची एक तक्रार अन् फडणवीसांनी विषय गांभीर्याने घेत दिले 'हे' आदेश](https://maharashtrakhabar.com/a-complaint-from-sunetra-pawar-and-fadnavis-took-the-matter-seriously-and-gave-this-order/): एकीकडे बारामतीत विधानसभेच्या पोटनिवडणुकीची धामधुम सुरू असतानाच दुसरीकडे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहलं आहे. पुणे महापालिका प्रशासनाने केलेल्या क्षेत्रीय कार्यालयांच्या पुनर्रचनेच्या पार्श्वभूमीवर सुनेत्रा पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्र लिहून एक तक्रार केली आहे. सुनेत्रा पवार यांनी देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहित विविध आरोप केले आहेत. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून पुणे महापालिकेकडून बदलण्यात आलेल्या क्षेत्रीय कार्यालयांच्या रचनेची तक्रार केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही तक्रार पुणे महापालिकेकडे पाठवली असून याबाबत खुलासा विचारला आहे. प्रभागरचनेत केलेल्या बदलामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला प्रभाग समित्यांमध्ये कमी प्रतिनिधित्व मिळणार असल्याने ही तक्रार करण्यात आली आहे. […] - [माझं मरण इथेच...!" चौकशीत अशोक खरातला दिसू लागला स्वतःचा काळ](https://maharashtrakhabar.com/i-will-die-here-ashok-kharat-began-to-see-his-own-time-during-the-interrogation/): धार्मिक विधी आणि श्रद्धेच्या नावाखाली महिलांचं लैंगिक शोषण करणाऱ्या भोंदू अशोक खरातच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. आता पर्यंत त्याच्याविरोधात एकूण १५ गुन्हे दाखल झाले आहेत. सध्या एसआयटीकडून त्याच्याविरोधात दाखल असलेल्या तिसऱ्या गुन्ह्याचा तपास करत आहेत. त्याच्यावर शिर्डीसह नगर जिल्ह्यात देखील गुन्हे दाखल झाले आहेत. एवढ्या मोठ्य संख्येनं गुन्हे दाखल झाल्याने खरात कायदेशीर कचाट्यात सापडला आहे. दरम्यान, दैवी शक्ती असल्याचं सांगून अनेकांचं भविष्य सांगणाऱ्या खरातने आता स्वत:चं भविष्य सांगितलं आहे. त्याने आपल्या मृत्यूबाबत मोठी भविष्यवाणी केली आहे. पोलीस चौकशीत त्याने हतबल प्रतिक्रिया दिली आहे. ‘मी इथून बाहेर पडेन, असं वाटत नाही. माझं मरणं इथेच (जेलमध्ये) आहे’ असं वक्तव्य खरात याने […] - [झिरवाळ व्हिडिओ प्रकरण: अटकेची टांगती तलवार टाळण्यासाठी आरोपीची धडपड](https://maharashtrakhabar.com/jirwal-video-case-accused-struggles-to-avoid-arrest/): राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) नेते आणि मंत्री नरहरी झिरवाळ यांच्याशी संबंधित कथित आक्षेपार्ह व्हिडिओ प्रकरणाने आता कायदेशीर वळण घेतले आहे. या प्रकरणात ज्या व्यक्तीवर व्हिडिओ लीक केल्याचा आरोप आहे, त्याने आता थेट मुंबई हायकोर्टाचा दरवाजा ठोठावला असून, आपल्यावरील एफआयआर रद्द करण्याची मागणी केली आहे. या नव्या घडामोडीमुळे हे प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, ज्यामध्ये मंत्री नरहरी झिरवाळ एका ट्रान्सजेंडर व्यक्तीसोबत आक्षेपार्ह स्थितीत असल्याचा दावा करण्यात आला होता. याप्रकरणी मुंबईतील कफ परेड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. ही तक्रार त्याच ट्रान्सजेंडर व्यक्तीने दाखल केली होती, जिने आरोपीला आपला […] - ['वारकरी संप्रदायात प्रतिगाम्यांची घुसखोरी'; शरद पवारांच्या विधानाने चर्चेला उधाण](https://maharashtrakhabar.com/infiltration-of-anti-gamas-into-the-warkari-sect-sharad-pawars-statement-sparks-debate/): ज्येष्ठ नेते आणि राज्यसभा खासदार शरद पवार यांनी वारकरी संप्रदायात प्रतिगामी विचारसरणीच्या लोकांची घुसखोरी झाल्याचा मोठा दावा केला आहे. महिला शासकीय अधिकाऱ्यांच्या अखिल भारतीय साहित्य संमेलन निमित्त प्रकाशित स्मरणिकेत त्यांनी याबाबत भाष्य केले आहे. पवार यांनी नमूद केले की, वारकरी संप्रदायसारख्या समतेच्या चळवळीतही काही धर्मांध प्रवृत्ती शिरकाव करत आहेत. त्यांच्या मते, संप्रदायातील सुमारे 60 टक्के लोकांची मांडणी ही धर्मांध शक्तींना बळ देणारी असल्याचे दिसून येते. त्यामुळे अशा प्रवृत्तींची नोंद घेण्याचे काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. शरद पवारांनी केलेल्या या दाव्याचे राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात काय पडसाद उमटतात हे पाहणे महत्वाचे असणार आहे. याचबरोबर वारकरी परंपरेत पुरोगामी विचार मांडणाऱ्या लोकांची गरज […] - [मराठी येत नाही तर परवाना नाही!; १ मे पासून रिक्षाचालकांसाठी नवीन नियम](https://maharashtrakhabar.com/if-you-dont-know-marathi-you-dont-have-a-license-new-rules-for-rickshaw-drivers-from-may-1/): संपूर्ण महाराष्ट्रात रिक्षा चालवण्यासाठी मराठी भाषा येणे बंधनकारक करण्यात आले आहे. १ मे २०२६ पासून या नियमाची कडक अंमलबजावणी होणार असून, मराठी न येणाऱ्या चालकांचा परवाना थेट रद्द केला जाणार आहे अशी माहिती राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे. हा निर्णय केवळ मीरा-भाईंदरपुरता मर्यादित नसून संपूर्ण महाराष्ट्र राज्यासाठी लागू असेल. १ मे पर्यंत सर्व रिक्षाचालकांची तपासणी केली जाईल. ज्यांना मराठी बोलता किंवा समजता येत नाही, त्यांच्यावर कठोर कारवाई करत त्यांचा वाहन परवाना रद्द केला जाईल असे सरनाईक यांनी सांगितले. बेकायदेशीरपणे चालणाऱ्या बाईक टॅक्सी सेवांवर सरकारने कडक भूमिका घेतली आहे. ओला, उबर आणि रॅपिडो यांच्या परवान्यांना तात्पुरती स्थगिती देण्यात […] - [महाराष्ट्र हादरला! ५ जिल्ह्यांमध्ये भूकंपाचे धक्के; भीतीपोटी नागरिक रस्त्यावर](https://maharashtrakhabar.com/maharashtra-shaken-earthquake-tremors-felt-in-5-districts-citizens-on-the-streets-in-fear/): महाराष्ट्रातील मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना शनिवारी सकाळी सौम्य भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. ज्यामुळे नागरिकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. अनेक भागांतील घरांना हलके हादरे बसल्याने लोक घाबरून घराबाहेर पडले. या भूकंपाच्या धक्क्यांचा परिणाम परभणी, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यांतील काही भागांत जाणवला. विशेषतः हिंगोली शहर, वसमत आणि कळमनुरी परिसरात भूकंपाचे धक्के स्पष्टपणे जाणवले. सकाळी 8 वाजून 46 मिनिटांनी सौम्य भूकंपाचे धक्के जाणवल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे काही घरांतील भांडी खाली पडली, तर अनेक नागरिक घाबरून रस्त्यावर आले. लहान मुलांमध्येही भीतीचे वातावरण दिसून आले. दरम्यान, काही दिवसांपूर्वी दिल्ली, जम्मू काश्मिर आणि चंदीगढ येथेही भूकंपाचे धक्के जाणवले होते. त्या भूकंपाचा केंद्रबिंदू अफगाणीस्तान […] - [अशोक खरातच्या 'त्या' कोडवर्ड्सचा अर्थ लागला!](https://maharashtrakhabar.com/ashok-kharats-those-codewords-made-sense/): नाशिकमधील भोंदू अशोक खरात प्रकरणात काल काही धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. अशोक खरात विरोधात पुरावे संकलित करण्याच्या कामाने वेग घेतला आहे. अशोक खरातच्या तपासात तब्बल १६० GB डिजिटल पुरावे तपास यंत्रणांनी गोळा केल्याची माहिती समोर आली आहे. डिजिटल पुराव्यातून खरातच्या काळ्या कारनाम्यांचा भांडाफोड होणार आहे. फॉरेन्सिक अहवाल एसआयटीकडे सादर केल्यानंतर आता तपासाला आणखी वेग आला आहे. एकूण ४ डिजिटल उपकरणांची तपासणी पूर्ण झाली आहे. पुराव्यांमुळे खरातभोवतीचा कारवाईचा फास अधिक घट्ट झाला आहे. प्रत्येक पुराव्याला A, B, C कोडवर्ड, ‘A’ मध्ये लैंगिक अत्याचाराचे गंभीर संकेत दिले आहे. नोव्हेंबर 2023 ते डिसेंबर 2024 कालावधीतील हालचालींचा तपशील हा कॅनडा कॉर्नर कार्यालयातून जप्त […] - [लग्नाआधी नवरीसोबत नेमकं काय घडलं? अशोक खरातचं 'ते' काळं कृत्य समोर](https://maharashtrakhabar.com/what-really-happened-to-the-bride-before-marriage-ashok-kharats-that-black-act-exposed/): भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी रोज नवीन खुलासे होत आहे. लोकांची भक्ती आणि विश्वासाचा फायदा घेत त्याने अनेक उद्योजकांना फसवलं आहे, तर अनेक महिलांचं लैंगिक शोषण केलं आहे. भोंदूबाबाचे काळे कृत्य समोर आल्यानंतर अनेकांचा विश्वासच बसत नाहीये की, ज्याच्या पायाची धूळ कपाळावर लावायचो… ती व्यक्ती सर्वांच्या भावनांसोबत खेळत आहे… भोंदूबाबा बद्दल अनेक खुलासे होत असताना अन्य एका महिलेने भोंदूबाबाचा खरा चेहरा समोर आणला आहे. महिलेचं लग्न ठरलं होतं, पण लग्नाच्या आधी अशोक खरात याने तिला ऑफिसमध्ये बोलावलं आणि तिच्यावर बलात्कार केला. त्या काही मिनिटांत काय काय झालं… यावर महिलेने धक्कादायक खुलासा केला आहे. पीडितेने कॅप्टन बाबा उर्फ ​​अशोक खरातविरुद्ध पहिला एफआयआर […] - ["निधी नसेल तर योजना कशाला?"; हायकोर्टाचा राज्य सरकारला थेट दणका](https://maharashtrakhabar.com/if-there-is-no-fund-why-have-a-scheme-high-courts-direct-blow-to-the-state-government/): राज्यातील महायुती सरकारसाठी अतिशय महत्वाकांक्षी ठरलेली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक अतिशय महत्वपूर्ण बातमी समोर आली आहे . मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमुळेच महायुतीनं विधानसभा निवडणुकांमध्ये बाजी मारल्याचं अनेक नेत्यांनी उघडपणे बोलूनही दाखवलं आहे . मात्र याच योजनेचा परिणाम आता इतर मूलभूत योजनां च्या निधी वाटपा वर होत असल्याचे चित्र आहे . याच मुद्दयांवर बोट ठेवत आता लाडकी बहीण योजनेवरून मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला तीव्र शब्दात फटकारले आहे . सातव्या वेतन आयोगानुसार शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना निवृत्तीवेतन तसेच अन्य लाभ देण्यास राज्य सरकारकडे पैसे नसतील, तर लाडकी बहीण योजना बंद करावी, असं महत्वपूर्ण निरीक्षण मुंबई उच्च न्यायालय ने नोंदवलं […] - [सुनेत्रा पवारांच्या प्रचाराला जाणार का? सुप्रिया सुळेंनी स्पष्टच सांगितलं!](https://maharashtrakhabar.com/will-sunetra-go-to-pawars-campaign-supriya-sule-made-it-clear/): बारामतीच्या पोटनिवडणुकीत माझा रोल मतदानाला जाण्याचा आहे. शेवटी रिश्तेही मायने रखते है. सुनेत्रा पवारांच्या प्रचाराला जाणार का? या प्रश्नावर उत्तर देताना हा प्रश्न त्यांनी विचारायला हवा असे सांगत अजित पवार गटाकडून बोलावणे आल्यास बारामतीत सुनेत्रा वहिनींचा प्रचार करण्याचे थेट संकेत सुप्रिया सुळे यांनी दिले आहे. तुम्ही हा प्रश्न अजित पवार गटाच्या वतीने विचारत असाल तर त्याचे उत्तर माझ्याकडे तयार असल्याचेही त्यांनी यावेळी म्हटले आहे. तर बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध का झाली नाही याबाबतचे उत्तर तुम्ही अजित पवार गटालाच विचारा कारण यासाठीची सर्व मॅनेजमेंट तेच पाहत होते, असे सांगत बिनविरोध निवडणूक पूर्ण होण्यामागे अजित पवार गटाचे अपयश असल्याचे संकेतही त्यांनी दिले. काल […] - [८ खासदार, एक गुप्त बैठक आणि शिंदेंचं 'ऑपरेशन टायगर'](https://maharashtrakhabar.com/8-mps-a-secret-meeting-and-shindes-operation-tiger/): राज्याच्या राजकीय वर्तुळातून पुन्हा एकदा भुकंपाचे संकेत मिळत आहेत. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार फोडण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून ‘ऑपरेशन टायगर’ अंतर्गत हालचाली वाढल्यची माहिती समोर आली आहे. त्यांतर्गत बुधवारी रात्री ठाण्यात एक गुप्त बैठक पार पडल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. ठाण्यात एकनाथ शिंदे आणि ठाकरे गटाच्या काही खासदारांमध्ये गुप्त चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. ‘ऑपरेशन टायगर’ यशस्वी करण्यासाठी शिंदे पडद्यामागे वेगाने हालचाली सुरू आहेत. पण त्याचवेळी दिल्लीतील नेतृत्वाकडून अद्याप हिरवा कंदील मिळाला नसल्याचेही बोलले जात आहे. पण एकनाथ शिंदे वैयक्तिक पातळीवर ठाकरे गटाच्या खासदारांशी सातत्याने संपर्कात असल्याची माहिती आहे. काही दिवसांपूर्वीच उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर सर्व खासदारांकडून निष्ठेची […] - [राज्यात आता इच्छा मृत्यूपत्राला मान्यता](https://maharashtrakhabar.com/wills-and-testaments-are-now-recognized-in-the-state/): गंभीर आजार किंवा अपघातामुळे एखादी व्यक्ती जीवन-मरणाच्या संघर्षात असेल आणि जीवनरक्षक यंत्रणांवर अवलंबून असेल, अशा परिस्थितीत पुढील उपचारांबाबत निर्णय घेण्याचा अधिकार देणाऱ्या ‘इच्छा’ मृत्यूपत्राला राज्य सरकारने मान्यता दिली आहे. या निर्णयामुळे रुग्णाच्या इच्छेनुसार उपचार सुरू ठेवायचे की थांबवायचे, याबाबत स्पष्ट मार्गदर्शक तत्त्वे उपलब्ध होणार आहेत. सर्वोच्च न्यायलायाने नुकतीच ‘लिव्हिंग विल’ला कायदेशीर मान्यता दिली होती. त्यानुसार राज्य सरकारनेही हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे रुग्णाच्या स्वातंत्र्याला आणि त्याच्या वैद्यकीय इच्छांना अधिक महत्त्व देण्यात आले आहे.एखादी व्यक्ती सुदृढ असताना भविष्यात गंभीर आजार किंवा अपघात झाल्यास उपचारांबाबत कोणते निर्णय घ्यायचे, हे आधीच लेखी स्वरूपात नोंदवू शकते. यालाच ‘लिव्हिंग विल’ किंवा ‘अॅडव्हान्स मेडिकल […] - [संतोष देशमुखांच्या पत्नी सरपंचपदाच्या शर्यतीत; मस्साजोगमध्ये बिनविरोधची जोरदार चर्चा](https://maharashtrakhabar.com/santosh-deshmukhs-wife-in-the-race-for-the-post-of-sarpanch-strong-discussion-about-unopposed-in-massajog/): बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या क्रूर हत्येने संपूर्ण राज्य हादरले होते. यानंतर राज्यभरातून तीव्र संताप व्यक्त करण्यात आला होता.संतोष देशमुख यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या सरपंच पदाची पोटनिवडणूक होत आहे. या निवडणुकीसाठी संतोष देशमुख यांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार आहेत. मस्साजोग येथील ग्रामपंचायतीत सरपंच पदासाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. ०७ ते १३ एप्रिल या दरम्यान अर्ज भरले जाणार आहेत. तर १५ एप्रिल रोजी या अर्जांची छाननी केली जाणार आहे. १७ एप्रिल रोजी अर्ज मागे घेण्याची मुदत असणार आहे. तर, २८ एप्रिल रोजी मतदान होऊन निकाल २९ एप्रिल रोजी लागणार आहे. मस्साजोगचा नवा सरपंच कोण याची उत्सुकता सर्वांनाच […] - [PF विड्रॉअलचा टेन्शन संपलं!; गुगल पे सारख्या सोप्या स्टेप्समध्ये काढा पैसे](https://maharashtrakhabar.com/pf-withdrawal-tension-is-over-withdraw-money-in-simple-steps-like-google-pay/): डिजिटल इंडियाच्या दिशेने पाऊल टाकत EPFO आता UPI आधारित PF विड्रॉवल सुविधा आणण्याच्या तयारीत आहे. या नवीन सुविधेमुळे PF काढण्याची जुनी आणि किचकट पद्धत इतिहास जमा होईल. लवकरच लाँच होणाऱ्या या नवीन मोबाईल ॲपमुळे PF सेटलमेंटचा वेग वाढणार असून, गरज पडल्यास तात्काळ पैसे बँक खात्यात जमा होण्यास मदत होईल. चला तर मग, या नवीन ॲपचे फीचर्स आणि ते कसे काम करेल, याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. EPFO चे नवीन मोबाइल अ‍ॅप PF काढणे पूर्णपणे डिजिटल आणि युजर्ससाठी सोपे करण्यावर लक्ष केंद्रित करेल. हे अ‍ॅप थेट युजर्सच्या बँक खात्याशी जोडले जाईल आणि भीमसह इतर UPI अ‍ॅप्ससह समाकलित होईल. यासह, युजर्स प्रथम त्यांच्या […] - [मरणाची भीती दाखवली अन् १६ एकर जमीन लाटली!; अशोक खरातचा १४ वा गुन्हा दाखल](https://maharashtrakhabar.com/showed-fear-of-death-and-destroyed-16-acres-of-land-ashok-kharats-14th-case-registered/): धार्मिक कार्याचा आणि अध्यात्माचा खोटा बुरखा पांघरून शेकडो भाविकांना गंडा घालणाऱ्या भोंदू अशोक खरातच्या अडचणींत दिवसेंदिवस वाढ होत आहे. अशोक खरातविरोधात 14वा गुन्हा दाखल झाला आहे. सिन्नर तालुक्यातील मिरगाव येथील ईशान्येश्वर महादेव मंदिराची साडेसोळा एकर जमीन फसवणुकीने बळकावल्याचे उघड झाले आहे. जमीन बळावल्या प्रकरणी खरातसह त्याची पत्नी कल्पना खरात हिच्यावरही फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आतापर्यंत अशोक खरातविरोधात एकूण 14 गुन्हे दाखल झाले आहेत. मिरगावमधील माळी कुटुंबाला जाळ्यात ओढून खरातने हा काळा कारनामा केला. माळी कुटुंबातील सदस्यांना मरणाची भीती घालून खरातने साडेसोळा एकर जमीन कवडीमोल भावात स्वतःच्या नावावर करून घेतली. धक्कादायक बाब म्हणजे या जमिनीवर खरातने ईशान्येश्वर महादेव मंदिर […] - [काँग्रेसने उमेदवारी अर्ज मागे घ्यावा; रोहित पवारांचं काँग्रेसला थेट साकडं](https://maharashtrakhabar.com/congress-should-withdraw-its-nomination-rohit-pawars-direct-appeal-to-congress/): बारामती पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज 9 एप्रिल शेवटचा दिवस असून, आतापर्यंत सहा जणांनी उमेदवारी अर्ज माघारी घेतले आहेत. त्यानुसार 47 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत. काँग्रेसकडून आकाश मोरे यांना उमेदवारी मिळाली. काँग्रेस निवडणूक लढवण्यावर ठाम आहे. राष्ट्रवादीकडून ही निवडणूक बिनविरोध करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यासोबत दुसऱ्यांदा संवाद साधण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. अशातच आता शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार ही निवडणूक बिनविरोध होण्यासाठी मैदानात उतरले आहेत. त्यांनी मुंबईत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची भेट घेतली आहे. या भेटीत रोहित पवारांनी काँग्रेसने उमेदवारी मागे घ्यावी, अशी विनंती केली आहे. […] - [रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा ढिगारा!; पोलिसांवर 'त्या' नेत्यांचा दबाव](https://maharashtrakhabar.com/a-pile-of-checks-in-ravindra-erandes-office-pressure-from-those-leaders-on-the-police/): अत्याचार तसेच अश्लील व्हिडीओ काढल्याप्रकरणी संशयित आरोपी रवींद्र एरंडे याच्या चौकशीतून त्याने अश्लिल व्हिडीओ कुठून काढले याचा उलगडा झाला आहे. धक्कादायक बाब म्हणजे एरंडेच्या हस्तलिखित नोंदी, पीडितांशी संबंधित काही इसमांच्या नावांचे धनादेश एरंडेच्या कार्यालयात आढळून आल्याने लैंगिक अत्याचारप्रमाणेच आर्थिक व्यवहारासंदर्भातही तपास सुरू करण्यात आला असल्याची माहिती सहायक पोलिस आयुक्त सचिन बारी यांनी दिली. संशयित एरंडेची बैंक खाती तपासली जात असून, यातून त्याचे आर्थिक कारनामे समोर येऊ शकतात. एरंडेच्या कार्यालयातून इतर काही महत्त्वाचे दस्तऐवजदेखील ताब्यात घेण्यात आले आहेत. काही पैसे मी संबंधितांची जाहिरात करण्यासाठी घेतले होते, अशी माहिती एरंडेने पोलिसांना दिली आहे. तपासणीत सापाची कात, पक्ष्यांचे अवयव, कवडी असे अंधश्रद्धा पसरविणारे […] - [सुनेत्रा पवार vs करुणा मुंडे! बारामतीचा पेच वाढला; उमेदवारी अर्ज वैध](https://maharashtrakhabar.com/sunetra-pawar-vs-karuna-munde-baramatis-dilemma-increases-nomination-papers-valid/): बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी 6 एप्रिल 2026 रोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. या वेळी त्यांच्यासमेवत पक्षाचे कार्याध्यक्ष प्रफुल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उपस्थिती होती. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाती निधनानंतर ही जागा रिक्त झाली असून त्यासाठी पोटनिवडणूक होत आहे. दुसरीकडे काँग्रेसनेही या निवडणुकीसाठी रणशिंग फुंकले असून, आकाश मोरे यांना उमेदवारी देऊ केली आहे. त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल करत सुनेत्रा पवारांना थेट आव्हान दिले आहे. अर्ज भरण्यापूर्वी बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, प्रत्यक्षात चित्र वेगळे झाले आहे. विशेष म्हणजे या […] - [मालाडच्या गल्लीबोळात बिबट्याचा वावर; काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडीओ समोर](https://maharashtrakhabar.com/leopard-roaming-in-the-alleys-of-malad-heartbreaking-video-in-front-of-us/): गेल्या काही महिन्यांपासून राज्यातील वेगवेगळ्या भागात बिबट्याने धुमाकूळ घातल्याचे समोर आले होते. बिबट्याच्या हल्ल्यात काही नागरिकांसह अनेक पाळीव प्राण्यांचा मृत्यू झाल्याचे समोर आले होते. अशातच आता शहरी भागातही बिबट्याने शिरकाव केल्याचे समोर आहे. राजधानी मुंबईतील मालाड पूर्व भागात बिबट्या आढळला आहे. एका रहिवासी सोसायटीमध्ये बिबट्या दिसल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात. मुंबईच्या मालाड पूर्व भागातील रहेजा हाइट्स सोसायटीमध्ये बिबट्या दिसल्याने परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पहाटे सुमारे 3 ते 4 वाजण्याच्या दरम्यान सोसायटीच्या डी विंग परिसरात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये एक बिबट्या फिरताना दिसला. फुटेजमध्ये बिबट्या पार्किंग परिसरात फिरताना स्पष्टपणे दिसत असून, त्यामुळे रहिवाशांच्या […] - [अशोक खरातच्या ४,६५० अश्लील लिंक सायबर पोलिसांनी उडवल्या](https://maharashtrakhabar.com/cyber-police-take-down-4650-pornographic-links-of-ashok-kharat/): भोंदू अशोक खरातवर ६० दिवसांत दोषारोपपत्र दाखल करण्यात येणार आहे. ३० साक्षीदार तपासले असून त्यांची साक्ष महत्त्वाची ठरेल, अशी माहिती एसआयटी प्रमुख तेजस्वी सातपुते यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली. खरातशी संबंधित ४,६५० अश्लील लिंक सायबर टिमने डिलीट केल्या, तर सोशल मीडियावरील ४५० अकाउंट देखील कायमची डिलीट केली आहेत. खरातच्या मालमत्तेसंबंधी कागपदपत्रे ईडीकडे सोपविण्यात आल्याचेही सातपुते यांनी सांगितले. खरात प्रकरणानंतर एसआयटी पथक प्रथमच माध्यमांसमोर आले. मात्र माध्यम प्रतिनिधींच्या अनेक प्रश्नांवर सातपुते यांनी मौन बाळगले. महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचे खरातशी आर्थिक संबंध, लीक झालेला सीडीआर, खरातचे राजकीय कनेक्शन अशा अनेक प्रश्नांवर सातपुते यांनी उत्तर देणे टाळले. तपासाबाबत अधिक माहिती […] - [पवारांना मोठा धक्का! 'हा' बडा नेता आज भाजपचा झेंडा हाती घेणार](https://maharashtrakhabar.com/big-shock-for-pawar-this-big-leader-will-take-up-the-bjp-flag-today/): राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते समरजीत घाटगे यांनी पक्षाची साथ सोडली असून ते आज भाजपचे कमळ हाती घेणार आहेत.विधानसभा निवडणूकीत तिकिट न मिळाल्याने शेवटच्या क्षणी त्यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटात पक्षप्रवेश करत विधानसभा निवडणूक लढवली होती. मात्र, आता समरजीत घाडगे अवघ्या काही महिन्यातच भाजपमध्ये घरवापसी करणार आहेत. समरजीत घाटगे आज मुंबईत भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थित भाजपात पक्षप्रवेश करत आहेत. मात्र यामुळे पश्चिम महाराष्ट्रात शरद पवार गटाला धक्का बसला आहे. समरजीत घाटगे भाजपमध्ये जाणार अशी चर्चा गेल्या अनेक दिवसांपूर्वी सुरू होती. या चर्चांवर त्यांनी शिक्कामोर्तब केला होता. त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले होते की, […] - [करुणा मुंडेंनी बारामतीच का निवडली? उमेदवारी अर्ज भरण्यामागचं 'असलं' मोठं कारण समोर](https://maharashtrakhabar.com/why-did-karuna-munde-choose-baramati-the-real-reason-behind-filing-nomination-papers-is-out/): बारामती पोटनिवडणूक बिनविरोध होणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. मात्र, प्रत्यक्षात तसे झाले नाही. राष्ट्रवादी काँग्रेसकडून उभ्या असलेल्या दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्याविरोधात तब्बल 55 उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.त्यापैकी एक उमेदवारी अर्ज करुणा मुंडे यांचाही आहे. त्यांनी काल 6 एप्रिल या दिवशी बारामती पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. करुणा मुंडे यांनी स्वराज्य शक्ती सेना पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. उमेदवारी अर्ज भरल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधत प्रतिक्रिया दिली. पोटनिवडणूक बिनविरोध होऊ नये आणि लोकशाही वाचण्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल केल्याचे करुणा मुंडे म्हणाल्या. तसेच मुंबईमधून फॉर्म भरण्यासाठी बारामतीला आल्याचे त्यांनी सांगितले. - [गॅस सिलिंडर स्वस्त होणार?; एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मोठी मागणी](https://maharashtrakhabar.com/will-gas-cylinders-become-cheaper-there-is-a-huge-demand-to-make-lpg-and-png-tax-free/): अमेरिका आणि इराणमधील युद्धामुळे जागतिक स्तरावर इंधनाचे संकट ओढवले असून भारतातही एलपीजी आणि पीएनजी गॅसच्या दरात मोठी वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर, चेंबर ऑफ ट्रेड अँड इंडस्ट्री या व्यापारी संघटनेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून एलपीजी आणि पीएनजी गॅस पूर्णपणे ‘करमुक्त’ करण्याची मागणी केली आहे. गॅसवरील कर हटवल्यास सर्वसामान्यांचे बजेट सावरण्यास मोठी मदत होईल, असा दावा संघटनेने केला आहे. एलपीजी आणि पीएनजीवर सध्या केंद्र आणि राज्य सरकारांकडून खालीलप्रमाणे कर आकारला जातो. घरगुती एलपीजी सिलिंडर : ५% जीएसटी. कमर्शियल सिलिंडर (हॉटेल/रेस्टॉरंट) : १८% जीएसटी. पीएनजी (पाईप गॅस) : हा गॅस जीएसटीच्या कक्षेत नसल्याने राज्य सरकारे त्यावर ३% ते १४.५% पर्यंत […] - ['शेंडीसाठी' ऋषिकेश वैद्यची कोर्टात धाव!; पुणे न्यायालयाने दिला अजब निकाल](https://maharashtrakhabar.com/rishikesh-vaidya-runs-to-court-for-shendi-pune-court-gives-strange-verdict/): एकीकडे नाशिकमधील भोंदु अशोक खरात प्रकरण गाजत असतानाच दुसरीकडे वसईतील आपण महादेवाचा अवतार असल्याचं सांगून पुण्यातील एका विवाहित महिलेवर अत्याचार करणार्‍या ऋषिकेश वैद्य या भोंदुबाबाचे बिंग फुटले. एका महिलेने दिलेल्या फिर्यादीनंतर पोलीस त्याचा शोध घेत होते. गुन्हा दाखल झाल्याची माहिती समजताच तो पसार झाला. पुणे शहर पोलिसांच्या विशेष पथकांसह मांजरी पोलिसांनी त्याचा शोध घेऊन त्याला पिंपरी परिसरातून अटक केली आहे. प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी लष्कर न्यायालयाने दोन्ही पक्षांकडून युक्तिवाद ऐकल्यानंतर त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनवण्यात आली आहे. यावेळी ऋषिकेश वैद्यच्या वकिलांनी अजब मागणी केली होती. तुरुंगामध्ये वैद्य याचे केशवपन करू नये, अशी मागणी वैद्यच्या वकिलांनी केली होती, त्या मागणीबाबत […] - [खरातने गुन्ह्याची कबुली दिली! SIT प्रमुखांची महत्त्वाची पत्रकार परिषद](https://maharashtrakhabar.com/kharat-confesses-to-the-crime-important-press-conference-of-sit-chief/): बहुचर्चित भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणाकडे राज्याचे लक्ष आहे. या प्रकरणात गेल्या काही दिवसांपासून धक्कादायक माहिती समोर येत होती. अशातच आता एक मोठी माहिती समोर आली आहे. अखेर एसआयटी चौकशीत अशोक खरातने चमत्कार आणि वशीकरण नव्हे तर हातचलाखीने महिलांना धमकवल्याची तसेच शोषण केल्याची माहिती दिली असल्याची सूत्रांची माहिती आहे. दुनिया झुकती है, झुकानेवाला चाहिए, असं म्हणत भोंदू अशोक खरातने एसआयटीच्या चौकशीत केलेल्या काळ्या कारनाम्याची कबुली दिल्याची सूत्रांची माहिती आहे. महिलांना जाळ्यात ओढण्यासाठी वापरलेल्या ट्रिक्सला विज्ञानानाचे नाव दिल्याचे समोर आले आहे. या काळया कारनाम्यात खरातला अन्य कुणाची मदत होती का? याचा तपास सुरू आहे. अशोक खरातला नाशिक न्यायालयाने 8 एप्रिलपर्यंत न्यायालयीन […] - [बारामतीत तुम्ही नाही, म्हणजे पंढरीत विठ्ठल नाही!"; मिटकरींचे दादांसाठी भावूक पत्र](https://maharashtrakhabar.com/if-you-are-not-in-baramati-then-there-is-no-vitthal-in-pandhari-mitkaris-emotional-letter-to-dada/): अजित पवार यांच्या निधनानंतर आमदार अमोल मिटकरी यांनी देखील सातत्याने अपघाताबाबत संशय व्यक्त केला. यानंतर काल अमोल मिटकरी यांनी ज्या ठिकाणी अजित पवार यांच्या विमानाचा अपघात झाला, त्या गोजुबावी ‌या ठिकाणी जाऊन दर्शन घेतले.तसेच त्या ठिकाणी मिटकरी यांनी दिवंगत अजित पवार यांना लिहिलेले एक पत्र देखील ठेवलं आहे. बारामतीत तुम्ही नाही म्हणजे पंढरीत विठ्ठल नाही, आता हा शेवटचा पत्रव्यवहार तुमच्या बलिदान स्थळी असा उल्लेख मिटकरींनी केला आहे. पत्रात नेमकं काय म्हणाले अमोल मिटकरी? आदरणीय दादा, 28 जानेवारी 2026 च्या काळ्या दिवसानंतर आज आद‌र‌णीय सुनेत्रा वहिनींच्या बारामती पोटनिवडणुकीच्या निमित्ताने दुसयोध गोजुबावी ‌ह्या दुर्देवी स्थळी आलोय. बारामती मधे तुम्ही नाही म्हणजे पंढरीत […] - [विखे पाटील आणि रवींद्र चव्हाणांची तनपुरेंच्या कार्यालयात एन्ट्री; राहुरीत युतीची नवी खेळी?](https://maharashtrakhabar.com/vikhe-patil-and-ravindra-chavan-enter-tanpures-office-a-new-move-by-the-alliance-in-rahuri/): अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण दिवसेंदिवस तापत चालले आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर विविध पक्षांच्या हालचालींना वेग आला असून, नेत्यांच्या भेटीगाठींमुळे चर्चांना अधिक उधाण आले आहे. आजच्या घडामोडींनी मात्र या निवडणुकीत नवा ट्विस्ट निर्माण केला आहे. भाजपकडून उमेदवार म्हणून चर्चेत असलेले अक्षय कर्डीले आज उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती समोर येत होती. त्यासाठी त्यांच्या प्रचाराची तयारी देखील जोरात सुरू होती. या पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे राहुरी येथे दाखल झाले होते. कर्डीले यांच्या प्रचाराला बळ देण्यासाठी त्यांच्या ही भेट महत्वाची मनाली जात होती. मात्र, याच वेळी घडलेल्या एका अनपेक्षित घटनेने सर्वांचे लक्ष […] - [खरात प्रकरणात नाशिकच्या एका मोठ्या महिला अधिकाऱ्याचे कनेक्शन?](https://maharashtrakhabar.com/connection-of-a-senior-female-officer-from-nashik-in-the-kharat-case/): राज्यात खळबळ उडवून देणाऱ्या अशोक खरात प्रकरणात अनेक धक्कादायक खुलासे होत आहेत. अशोक खरातने केलेले महिलांचे लैगिंक शोषण, आर्थिक फसवणुकीनंतर आता आणखी एक बाब समोर आली आहे. भोंदूगिरीच्या जोरावर अनेकांना लुटणाऱ्या अशोक खरातच्या प्रकरणाने आता थेट प्रशासकीय वर्तुळाचे वाभाडे काढले आहेत. प्रकरणाचा तपास करणाऱ्या ‘SIT’च्या हाती अशा काही धक्कादायक गोष्टी लागल्या आहेत, ज्यामुळे नाशिकमधील एका तत्कालीन महिला अधिकाऱ्याचे धाबे दणाणले आहेत. भोंदू अशोक खरात प्रकरणात आता एक अत्यंत धक्कादायक वळण समोर आले आहे. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या विशेष तपास पथकाच्या हाती महत्त्वपूर्ण पुरावे लागले आहेत. नाशिकमध्ये कार्यरत असलेली एक तत्कालीन महिला अधिकारी आता पोलिसांच्या रडारवर आली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, या […] - [लोकसभा खासदार आता ५४३ नाही, तर ८१६? ; विधानसभेचं गणितही बिघडणार ?](https://maharashtrakhabar.com/lok-sabha-mps-are-now-816-not-543-will-the-assemblys-math-also-get-messed-up/): लोकसभेत 33 टक्के महिला आरक्षण लागू करण्यासंदर्भात होणाऱ्या विशेष अधिवेशनात घटना दुरुस्ती विधेयक मांडण्यात येणार असून महिला आरक्षण विधेयक मंजूर करण्यासाठी संसदेचे चालू अर्थसंकल्पीय अधिवेशन वाढवण्यात आले आहे. परिणामी, पुढील आठवड्यात होणाऱ्या विशेष अधिवेशनात घटना दुरुस्ती विधेयक मांडण्यात येणार असून लोकसभा आणि राज्यसभेचे पुढील अधिवेशन 16 एप्रिल रोजी होणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही सभागृहे 16 ते 18 एप्रिल दरम्यान तीन दिवस कामकाज करण्याची शक्यता आहे. पूर्वीच्या नियोजनानुसार, अर्थसंकल्पीय अधिवेशन गुरुवारी संपणार होते. सूत्रांनी असेही सूचित केले आहे की, सरकार चालू अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पुढील तीन दिवसांत महिला आरक्षणाशी संबंधित ‘नारी शक्ती वंदन कायद्या’त सुधारणा करणारे विधेयक सादर करू शकते, ज्यामुळे […] - [जहीर शेख अपहरण प्रकरण; तपासात नवा ट्विस्ट, मुलीच्या एका तक्रारीने पोलीसही चक्रावले](https://maharashtrakhabar.com/zaheer-sheikh-kidnapping-case-new-twist-in-the-investigation-a-complaint-from-the-girl-also-confused-the-police/): भिगवण अपहरण प्रकरणात पुन्हा एकदा मोठा ट्विस्ट आला असून मुलीने जहीर शेख या तरुणाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. जहीर शेखने आपलं अपहरण केल्याची तक्रार मुलीने दाखल केली आहे. या आधी याच मुलीने जहीर शेखसोबत प्रेमसंबंध असल्याचं सांगितलं होतं आणि स्वतःच्या मर्जीने त्याच्यासोबत गेल्याचं सांगितलं होतं.त्यानंतर या मुलीने तिचा जबाब बदलला. आता जहीर शेख या तरुणावर अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील तरुणीने तिच्या तक्रारीत म्हटलंय की, 17 फेब्रुवारीला आई सोबत आणि भावासोबत लग्नाची खरेदी करण्यासाठी गेली असताना आपलं अपहरण करण्यात आलं. यामध्ये तिने जहीर शेखचं नाव घेतलं आहे. याआधी तरुणीने शपथपत्रात काय म्हटलं होतं? संबंधित तरुणीने एक प्रतिज्ञापत्र […] - [बारामतीकरांनो, आता तुमचं एक मतच ठरेल दादांना खरी श्रद्धांजली ; रोहित पवारांची 'भावनिक' साद](https://maharashtrakhabar.com/people-of-baramati-now-your-one-vote-will-be-a-true-tribute-to-dada-rohit-pawars-emotional-message/): गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात चर्चेत असलेल्या बारामती विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीला बिनविरोध करण्याचे प्रयत्न अखेर अपयशी ठरले आहेत. अजित पवार यांच्या निधनानंतर राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी स्वतः बारामती पोटनिवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. महायुतीकडून ही निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी सुरुवातीपासून प्रयत्न करण्यात आले होते. त्याच पार्श्वभूमीवर सुनेत्रा पवार यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना दूरध्वनीद्वारे पाठिंब्याची विनंती केली होती. मात्र, या प्रयत्नांना यश आले नाही. काँग्रेसने रविवारी दिल्लीतून बारामती पोटनिवडणुकीसाठी आपल्या उमेदवाराची घोषणा केली. काँग्रेसकडून आकाश मोरे यांना सुनेत्रा पवार यांच्या विरोधात उमेदवारी देण्यात आली आहे. आज सुनेत्रा पवार आणि आकाश मोरे हे […] - [रिक्षात प्रवासी भरण्यावरून वाद ; चालकाला लाथाबुक्क्यांनी मारहाण](https://maharashtrakhabar.com/argument-over-loading-passengers-into-rickshaw-driver-beaten-with-sticks/): प्रवाशांवरून झालेल्या वादातून रिक्षा चालकाला मारहाण करून त्याच्या डोक्यात सिमेंटचा गट्टू घालण्यात आला. कात्रज परिसरात ही घटना घडली. याप्रकरणी दोन रिक्षा चालकांसह चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. शेखर गोविंद पुजारी (वय ४९, रा. घुंगरवाली चाळ, संतोषनगर, कात्रज) असे जखमी झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी कुणाल कांबळे (रा. बिबवेवाडी), एस. मिसाळ ऊर्फ टायगर यांच्यासह चौघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पुजारी यांनी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रिक्षा चालक पुजारी हे कात्रज परिसरात थांबले होते. त्यावेळी रिक्षात प्रवासी भरण्यावरून त्यांचा आरोपींशी वाद झाला. वादातून आरोपींनी पुजारी यांना शिवीगाळ करून मारहाण केली. रस्त्यात पडलेला सिमेंटचा गट्टू पुजारी यांच्या […] - [शिवरायांच्या पुतळ्यावरून सुरू असलेल्या वादाचा शेवट गोड](https://maharashtrakhabar.com/the-controversy-over-shivajis-statue-has-finally-been-resolved/): माढा तालुक्यातील अंजनगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसवण्यावरून निर्माण झालेल्या वादावर अखेर तोडगा निघाला असून चौथ्या दिवशी गाव तणावमुक्त झालं आहे. पुतळा बसवण्यावरून निर्माण झालेला संघर्ष टाळण्यायासाठी कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांच्या उपस्थितीत मोहोळ पोलीस ठाण्यात शुक्रवारी रात्री झालेल्या दोन्ही समाजाच्या नेत्यांची बैठक पार पडली. फुलारी यांच्या समवेत अंजनगाव येथील धनगर समाज व मराठा समाजाच्या शिष्टमंडळाबरोबर बैठक घेण्यात आली. या बैठकीत छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसवण्यात आलेली जागा ही खेलोबा देवस्थानची असल्याबाबत दोन्ही समाजाचे एकमत झालं असून आता या पुतळ्याचं स्थलांतर केलं जाणार आहे. यासाठी दोन्ही समाजाचे प्रतिनिधी मिळून नवी जागा शोधणार असल्याची माहिती भाजप […] - [CBSE चा मोठा निर्णय; सहावीपासून 'या' ३ भाषा शिकाव्याच लागणार](https://maharashtrakhabar.com/cbses-big-decision-these-3-languages-will-have-to-be-learned-from-class-6/): केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने नवीन शैक्षणिक धोरण जाहीर केले असून त्यानुसार इयत्ता सहावीपासून विद्यार्थ्यांसाठी तीन भाषा शिकणे अनिवार्य करण्यात आले आहे. या नव्या बदलामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षण पद्धतीत महत्त्वपूर्ण परिवर्तन होणार आहे. नवीन नियमानुसार, सहावीपासून शिकवल्या जाणाऱ्या तीन भाषांपैकी दोन भाषा भारतीय असणे आवश्यक आहे, तर तिसरी भाषा विद्यार्थ्यांना उपलब्ध 42 भाषांमधून निवडावी लागणार आहे. मात्र, परदेशातून भारतीय शाळांमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना या नियमातून सूट देण्यात आली आहे. आतापर्यंत बहुतांश शाळांमध्ये फक्त दोन भाषा अनिवार्य होत्या. आता तिसरी भाषा समाविष्ट केल्यामुळे विद्यार्थ्यांचा अभ्यास अधिक व्यापक होणार आहे. नवीन भाषा शिकण्यामुळे त्यांच्या विचारशक्तीचा विकास होईल आणि विविध संस्कृतींबद्दलची समज अधिक सखोल होईल, […] - [अशोक खरातवर नाशिकमध्ये १२ वा गुन्हा दाखल](https://maharashtrakhabar.com/12th-case-registered-against-ashok-kharat-in-nashik/): स्वतःला अध्यात्मिक गुरू म्हणवून घेणाऱ्या भोंदू अशोक खरातच्या पापाचा घडा आता भरत चालला असून, त्याच्याविरोधात नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात फसवणुकीचा आणखी एक गुन्हा दाखल झाला आहे. एका कांदा व्यापाऱ्याला प्लॉट विक्री व्यवसायात गुंतवणुकीचे आमिष दाखवून तब्बल 85 लाख रुपयांना गंडा घातल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या नव्या गुन्ह्यामुळे खरातच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित कांदा व्यापाऱ्याची 60 लाख रुपये किमतीची जागा वृद्धाश्रमाच्या नावे केवळ 22 लाख 25 हजार रुपयांच्या अल्प दरात खरेदी करून खरातने व्यापाऱ्याचा विश्वास संपादन केला. त्यानंतर, या बदल्यात दुसऱ्या एका चांगल्या लोकेशनवर जागा मिळवून देण्याचे आणि प्लॉट विक्रीच्या व्यवसायातून मोठा नफा मिळवून देण्याचे […] - [सुनेत्रा पवारांचा थेट उद्धव ठाकरेंना फोन](https://maharashtrakhabar.com/sunetra-pawar-directly-calls-uddhav-thackeray/): बारामती पोट निवडणुकीच्या अनुषांगाने राज्याच्या राजकीय वर्तुळात घडामोडींना वेग आला आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा आणि राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी शिवसेना ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरेंना फोन केल्याची माहिती समोर आली आहे. फोन करून सुनेत्रा पवारांनी उद्धव ठाकरेंना बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत पाठिंबा देण्याची विनंती केली असल्याची माहिती समोर आली आहे. काँग्रेसच्या नेत्यांनाही पाठिंब्यासाठी सुनेत्रा पवार विनंती करणार असल्याची माहिती समोर आली आहे.तर बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्याच्या दृष्टीने राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रयत्न सुरू झाले आहे. सुनेत्रा पवार सोमवारी (6 एप्रिलला) आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार असून यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते, मंत्री उपस्थित राहणार आहेत. बारामती पोटनिवडणुकीमध्ये काँग्रेस पक्ष आपला उमेदवार […] - ['खोक्या' उर्फ सतीश भोसलेची वर्षभरानंतर निर्दोष मुक्तता](https://maharashtrakhabar.com/khokya-alias-satish-bhosale-acquitted-after-a-year/): बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणाचे राज्यभरात पडसाद उमटत असतानाच गेल्या वर्षी सोशल मीडियावर सतीश उर्फ खोक्या भोसले याचा एका व्यक्तीला बॅटीने अमानुषपणे मारहाण करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. या प्रकरणात खोक्या भोसले याला अटक करण्यात आली. पुराव्याअभावी शिरुर कासार तालुक्यातील ठाकणे पिता पुत्र मारहाण प्रकरणातून निर्देाष त्याची निर्देाष मुक्तता करण्यात आली आहे. तसेच वन्य प्राण्यांची शिकार करून हरणाचे मांस घरात आढळून आल्याने त्याच्यावर गुन्हा दाखल झाला होता. बीड न्यायालयात मारहाण प्रकरणाची सुनावणी पार पडली. न्यायालयाने दिलेल्या निकालामुळे सतीश उर्फ खोक्या भोसले याला मोठा दिलासा मिळाला आहे. तो काल संधाकाळी एका वर्षानंतर छत्रपती संभाजीनगर कारागृहातून बाहेर आला आहे. कारागृहातून बाहेर पडताच […] - [अशोक खरातच्या अघोरी साम्राज्यामागचा असली मास्टरमाईंड सापडला](https://maharashtrakhabar.com/the-real-mastermind-behind-ashok-kharats-aghori-empire-has-been-discovered/): भोंदूगिरी आणि फसवणुकीच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या अशोक खरात प्रकरणी नवनवीन अपडेट समोर येत आहे. अशोक खरातच्या विविध कृत्यांचा तपास जसा पुढे सरकत आहे, तसे नवनवीन खुलासे होताना दिसत आहेत. समता पतसंस्थेतील १०० खात्यांचा तपास सुरू असतानाच आता सिन्नर येथील जगदंब पतसंस्थेचे संस्थापक नामकरण आवारे हे पोलिसांच्या रडारवर आले आहेत. शिर्डी पोलिसांनी या प्रकरणाचा तपास आता आवारे यांच्याकडे वळवला असून त्यांच्या आर्थिक व्यवहारांची सखोल चौकशी सुरू केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अशोक खरात याने नामकरण आवारे यांच्या जगदंब पतसंस्थेचा वापर मोठ्या प्रमाणावर आर्थिक व्यवहारांसाठी केला होता. या एकाच पतसंस्थेत खरातची ३२ विविध खाती असल्याचे निष्पन्न झाले आहे. प्राथमिक तपासात या खात्यांमधून कोट्यवधी […] - [सुनेत्रा पवारांची खुर्ची धोक्यात? प्रफुल्ल पटेल आणि तटकरेंच्या 'त्या' सहीने वाढलं टेन्शन](https://maharashtrakhabar.com/sunetra-pawars-chair-in-danger-tension-increased-with-that-signature-of-praful-patel-and-tatkare/): अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अंतर्गत संघर्ष वाढत चालल्याचे दिसत आहे. राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे यांच्याकडून पक्षावर ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप होत आहे. दुसरीकडे पक्षाच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांनी २८ फेब्रुवारीनंतरचा कोणताही पत्रव्यवहार ग्राह्य धरला जाऊ नये असे स्पष्ट पत्र निवडणूक आयोगाला पाठवल्याने पटेल-तटकरेंची कोंडी झाली होती. मात्र आता याच पत्रामुळे सुनेत्रा पवार यांचे राष्ट्रीय अध्यक्षपद आणि पार्थ पवारांची खासदारकी धोक्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची अध्यक्षपदाच्या निवडीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होणार असल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. सोशल मीडियावर सुनेत्रा […] - ["मातृत्व की क्रौर्य? मुलाच्या आयुष्यासाठी पोटच्या लेकीचा बळी](https://maharashtrakhabar.com/motherhood-or-cruelty-the-sacrifice-of-a-mother-for-the-life-of-a-child/): झारखंडमधील हजारीबाग येथून एक भयंकर घटना समोर आली आहे. हजारीबाग येथे एका १३ वर्षीय मुलीच्या मृत्यूने खळबळ उडाली होती. सुरुवातीला या मुलीवर अत्याचार करुन हत्या केल्या झाल्याचा संशय पोलिसांना होता. मात्र याप्रकरणी तपासात अत्यंत धक्कादायक अपडेट समोर आली असून आईनेच मुलीचा नरबळी दिल्याचे उघड झाले आहे. पुत्रप्रेम आणि अंधश्रध्देत बुडालेल्या आईने पोटच्या लेकीचाच बळी दिल्याने सर्वत्र संताप व्यक्त होत आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, मुलीचं अपहरण करून तिची हत्या झाल्याचा आरोप करत मुलीच्या आईने सुरुवातीला पोलिसांत तक्रार दाखल केली होती. मात्र, पोलिसांनी सखोल तपास करून तांत्रिक पुरावे गोळा केल्यावर या प्रकरणाला पूर्णपणे वेगळे वळण लागले. विशेष तपास पथकाच्या (एसआयटी) तपासात असे […] - [पुण्याला निघाले अन् गोव्याला पोहोचले!](https://maharashtrakhabar.com/left-for-pune-and-reached-goa/): पुणे शहर आणि जिल्ह्याला सलग चौथ्या दिवशी पावसाने झोडपून काढले आहे. गुरुवारी सायंकाळपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे रस्ते वाहतुकीसोबतच आता हवाई वाहतुकीवरही परिणाम झाला आहे. लोहगाव विमानतळ परिसरात पावसाचा जोर आणि ढगाळ हवामानामुळे दृश्यमानता अत्यंत कमी झाल्याने सुरक्षिततेचा उपाय म्हणून इंडिगोचे विमान गोव्याला वळवण्यात आले. अहमदाबादहून पुण्याच्या दिशेने झेपावलेले इंडिगोचे 6E522 हे विमान आपल्या नियोजित वेळेनुसार पुण्यात उतरणार होते. मात्र, पुण्यात पावसाचा जोर इतका प्रचंड होता की वैमानिकाला धावपट्टी स्पष्ट दिसत नव्हती. एअर ट्रॅफिक कंट्रोल आणि वैमानिकाने प्रवाशांच्या सुरक्षिततेचा विचार करून विमान पुण्यात उतरवण्याचा धोका न पत्करता ते थेट गोव्याच्या दिशेने वळवले. विमान अचानक दुसऱ्या राज्यात वळवल्यामुळे प्रवाशांमध्ये गोंधळ उडाला. […] - [सुनेत्रा पवारांच्या पत्राने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ](https://maharashtrakhabar.com/sunetra-pawars-letter-creates-a-stir-in-political-circles/): राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे. राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी निवडणूक आयोगाला पाठवलेल्या पत्रात दोनच पदांचा उल्लेख, आहे. सुनेत्रा पवार राष्ट्रीय अध्यक्ष, तर शिवाजीराव गर्जे खजीनदार असा या पत्रामध्ये दोनच पदांचा उल्लेख आहे. या पत्रांमध्ये सुनेत्रा पवार यांच्या नावापुढे राष्ट्रवादीचे अध्यक्ष असा उल्लेख आहे. तर शिवाजीराव गर्जे यांचा खजीनदार म्हणून उल्लेख आहे. सुनेत्रा पवार यांनी निवडणूक आयोगाला लिहिल्या पत्रात 14 पदाधिकाऱ्यांच्या नावाचा उल्लेख आहे. मात्र त्यांच्या नावापुढे पदाचा उल्लेख नाही, प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्या नावापुढे कोणत्याही पदाचा उल्लेख या पत्रात नाहीये, त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. दरम्यान अजित पवार यांच्या काळात […] - [हा तर दुसरा 'कॅप्टन खरात' ; खेडच्या 'गवळी बाबा'चा पर्दाफाश](https://maharashtrakhabar.com/this-is-the-second-captain-kharat-kheds-gawli-baba-exposed/): पुण्याच्या खेड तालुक्यातील चांडोलीतून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अध्यात्माच्या नावाखाली महिलांचे लैंगिक शोषण करणाऱ्या एका भोंदू बाबाचा खरा चेहरा आता चव्हाट्यावर आला आहे. शिवदत्त आश्रमातील नवनाथ गवळी नावाच्या या भोंदूने महिलांच्या अगतिकतेचा आणि अंधश्रद्धेचा फायदा घेत त्यांना आपल्या जाळ्यात ओढल्याचे समोर येत आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, पुणे ग्रामीणमधील खेड तालुका सध्या एका भयंकर कृत्याने हादरला आहे. चांडोली येथील शिवदत्त आश्रमात ‘महाराज’ म्हणून मिरवणारा नवनाथ गवळी हा प्रत्यक्षात वासनांध भोंदू असल्याचे उघड झाले आहे. एका ३४ वर्षीय महिलेने या गवळीबाबा विरुद्ध धारिष्ट्य दाखवून खेड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. ​मे २०२५ पासून पीडित महिला कुटुंबासह आश्रमात दर्शनासाठी जात […] - [खरातच्या पापात डॉक्टरांचाही हात; गर्भपाताच्या गोळ्यांचा धक्कादायक उलगडा](https://maharashtrakhabar.com/doctors-also-involved-in-kharats-sin-shocking-revelation-about-abortion-pills/): नाशिकचा स्वयंघोषित ज्योतिषी आणि भोंदूबाबा अशोक खरात याच्या काळ्या कारनाम्यांची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत चालली आहे. पहिल्या गुन्ह्यात १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतर, आज (२ एप्रिल) त्याला पुन्हा न्यायालयात हजर केले जाणार आहे. दरम्यान, एसआयटीच्या तपासात अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक माहिती समोर आली आहे. यामध्ये नाशिकमधील काही बड्या डॉक्टरांचे संगनमत असल्याचे उघड झाले आहे. एसआयटीनं चौकशी केलेल्या एका डॉक्टरला राजकीय पाठबळ असल्याचे सांगण्यात येते. तर, आणखी एक डॉक्टर हा पंचवटीमधील बडा डॉक्टर असल्याची माहिती समोर आली आहे. भोंदू खरात हा महिलांना जाळ्यात ओढण्यासाठी आपल्याकडे दैवी शक्ती असल्याचा दावा करत असे. तुझ्या शरीरातील दोष दूर करण्यासाठी माझ्याशी शारीरिक संबंध ठेवावे लागतील,” असा […] - [संसार तुटला पण आनंद गगनात मावेना!; घटस्फोटासाठी नवस, अन ९ किमी दंडवत!](https://maharashtrakhabar.com/the-family-broke-up-but-happiness-never-reached-the-sky-vows-for-divorce-and-a-9-km-long-prayer/): एका तरुणाने घटस्फोट मिळविण्यासाठी थेट देवाला साकडं घातलं आहे. पत्नीसोबतच्या सततच्या वादामुळे त्रस्त झालेल्या या पतीने ‘जर मला घटस्फोट मिळाला तर मी दंडवत यात्रा करेन’, असा नवस माता बैडवा मंदिरात केला होता.शेवटी घटस्फोट मिळाल्यानंतर आनंदी झाल्याने तरुणाने आपला नवस पूर्ण केला. या तरुणाचं लग्न होऊन केवळ दोनच वर्ष झाली होती. मात्र या काळात पती-पत्नीमध्ये सतत वाद होत होता. मानसिक त्रासाला कंटाळून या तरुणाने कोर्टात घटस्फोटासाठी अर्ज केला होता. अखेर दोन वर्षांच्या कायदेशीर लढाईनंतर कोर्टाने त्याला घटस्फोट मंजूर केला. आपला नवस पूर्ण करण्यासाठी या तरुणाने पहाटे आपल्या गावापासून ते भानपुर येथील मंदिरापर्यंत सुमारे ९ किलोमीटर अंतर दंडवत घातले. विशेष म्हणजे, या […] - [बारामती पोटनिवडणुकीचा 'क्लायमॅक्स' सुरू! ३० जणांनी अर्ज नेले](https://maharashtrakhabar.com/the-climax-of-the-baramati-by-election-begins-30-people-have-filed-their-applications/): बारामतीत दिवंगत अजित पवार यांच्या निधनानंतर पोटनिवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे येत्या 6 एप्रिल रोजी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत सुनेत्रा पवार आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीने बारामती शहर व तालुक्यात आजपासून घोंगडी बैठकांना सुरुवात झाली असून कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. गावागावात जाऊन मतदारांशी थेट संवाद साधत सुनेत्रा पवार यांना प्रचंड बहुमताने विजयी करण्यासाठी रणनिती आखली जात आहे. या निवडणुकीत सुनेत्रा पवार यांना अजित पवारांपेक्षा जास्त मताने मतांनी निवडून आणण्याचा निर्धार कार्यकर्त्यांनी केला आहे. तर एकीकडे ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी प्रयत्न सुरू असतानाच बारामती पोट निवडणुकीसाठी 30 जणांनी अर्ज […] - [आजपासून खिशाला कात्री; पॅन कार्डपासून फास्टॅगपर्यंत 'हे' मोठे बदल लागू](https://maharashtrakhabar.com/pocket-scissors-from-today-these-big-changes-will-be-implemented-from-pan-card-to-fastag/): नवीन आर्थिक वर्षाची सुरुवात म्हणजेच 1 एप्रिल हा दिवस केवळ कॅलेंडर बदलण्यापुरता मर्यादित नसेल. कारण या दिवसापासून तुमच्या दैनंदिन आयुष्यावर परिणाम करणारे मोठे बदल होणार आहेत. पगार, इनकम टॅक्स, बँक, पास्टॅगसह अनेक महत्त्वाच्या आर्थिक नियमांमध्ये 1 एप्रिलपासून बदल होणार आहेत. बँकिंग, करप्रणाली आणि डिजिटल व्यवहारांशी संबंधित काही मोठे निर्णय लागू बुधवारपासून लागू होत आहेत. याचा थेट परिणाम सामान्य नागरिकांवर होणार आहे. त्यामुळे या बदलांची माहिती आधीच जाणून घेणं अत्यंत गरजेचं आहे. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने 2026-27 या आर्थिक वर्षासाठी FASTag वार्षिक पासच्या शुल्कात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. नवीन दर 1 एप्रिल 2026 पासून लागू होणार आहेत. त्यामुळे महामार्गावर प्रवास […] - [भोंदू बाबा अशोक खरातला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी](https://maharashtrakhabar.com/impostor-ashok-kharat-sent-to-14-days-judicial-custody/): राज्यभरात खळबळ उडालेल्या नाशिकमधील भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणाला आता नवीन वळण मिळाले आहे. गेल्या दोन आठवड्यांपासून पोलीस कोठडीत असलेल्या अशोक खरातची मुदत आज संपल्याने त्याला कडक पोलीस बंदोबस्तात नाशिक न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने या प्रकरणातील गांभीर्य लक्षात घेत अशोक खरातला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यामुळे त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली जाणार आहे. न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर पोलिसांनी अशोक खरातला तातडीने जिल्हा रुग्णालयात नेले आहे. तेथे त्याची सविस्तर वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आता त्याची रवानगी नाशिक मध्यवर्ती कारागृहात केली जाणार आहे. गेल्या १४ दिवसांपासून विशेष तपास पथक या प्रकरणाचा सातत्याने पाठपुरावा […] - [कोल्हापुरात बिबट्याच्या कातड्यांची तस्करी; रत्नागिरी कस्टम विभागाची मोठी कारवाई](https://maharashtrakhabar.com/smuggling-of-leopard-skins-in-kolhapur-ratnagiri-customs-department-takes-major-action/): कोल्हापूर शहरानजीकच्या महामार्गावर कस्टम विभागाने (सीमा शुल्क विभाग) रविवारी पहाटेच्या सुमारास धाडसी कारवाई करत बिबट्याच्या कातड्यांची अवैध तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला. या कारवाईत दोन मौल्यवान कातडी आणि एक आलिशान कार जप्त केली आहे. याप्रकरणी चाैघांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये दाेघे कुडाळ (जि. सिंधुदुर्ग) आणि दाेघे सातारा व लातूरमधील रहिवासी आहेत. समीर तातू तेजम व राकेश रमेश बांदेकर (दाेघेही रा. कुडाळ), शेख नसरुद्दीन हबीब (रा. लातूर), विजय विष्णू जमदाडे (रा. सातारा), अशी अटक केलेल्या चाैघांची नावे आहेत. काही व्यक्ती बिबट्याच्या कातड्यांची बेकायदेशीरपणे वाहतूक करून त्यांची विक्री करण्याच्या तयारीत असल्याची गुप्त माहिती सीमा शुल्क विभागाच्या ‘प्रतिबंधक व गुप्तचर’ शाखेला मिळाली […] - [जैसे थे दर, आनंदी घर! रेडीरेकनरच्या दरात यंदा 'नो चेंज'](https://maharashtrakhabar.com/as-the-price-is-the-house-is-happy-no-change-in-the-price-of-ready-reckoner-this-year/): सर्वसामान्यांसह फडणवीस सरकारव् बांधकाम व्यावसायिकांना मोठा दिलासा दिला. सध्याची जागतिक परिस्थिती व बांधकाम क्षेत्रातील मंदी लक्षात घेऊन राज्य शासनाने रेडीरेकनरबाबत मोठा निर्णय घेतला. 1 एप्रिल पासून सुरू होणार्‍या नवीन आर्थिक वर्षात रेडी रेकनरच्या दरात कोणतीच वाढ करण्यात आलेली नाही. राज्यात सर्व ठिकाणी नवीन आर्थिक वर्षासाठी रेडी रेकनरचे दर २०२६ -२७ या वर्षाचेच कायम ठेवण्यात आले आहेत. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी याविषयीची घोषणा केली आहे. कॉन्फेडरेशन्स ऑफ रिअल इस्टेट डेव्हलपर्स असोसिएशन्स ऑफ इंडिया (क्रेडाई), दस्त लेखनिक यांच्या सूचना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मान्य केल्या आहेत. मुख्यमंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल विभागात काम करत असताना मालमत्तेचा रेडीरेकनरची घोषणा करण्याचा कालचा दिवस होता. […] - [अशोक खरातला मोठा झटका; केस लढण्यास सरकारी वकिलांचा नकार](https://maharashtrakhabar.com/big-blow-to-ashok-kharat-government-prosecutors-refuse-to-fight-the-case/): नाशिकचा भोंदू बाबा अशोक खरात याचे एका मागून एक कारनामे पुढे येत आहेत. हजारोंच्या घरात महिलांचा त्याने लैगिंक अत्याचार केला. काही गुन्हे त्याच्यावर दाखल करण्यात आली. अशोक खरात याच्या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओने खळबळ उडाली. अनेक संसार उद्धवस्थ होण्याच्या परिस्थितीत आहेत. अनेक वर्षांपासून हा खरात महिलांवर अत्याचार करत. हेच नाही तर राजकीय लोकांचा हात असल्याने त्याला कोणीही धक्का लावू शकत नव्हते. भोंदू अशोक खरात याचे पाय धुताना रूपाली चाकणकर दिल्यानंतर खळबळ उडाली. रूपाली चाकणकर यांच्या हे प्रकरण इतके जास्त अंगलट आले की, त्यांना राज्य महिला आयोग आणि महिला प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा द्यावा लागला. भोंदू अशोक खरात याने लोकांना धमकावून, भीती घालून […] - [अशोक खरातच्या लेकीच्या लग्नाची पत्रिका व्हायरल!; एकनाथ शिंदेंसह आणखी कोणते ३ बडे मंत्री?](https://maharashtrakhabar.com/ashok-kharats-daughters-wedding-card-goes-viral-which-3-other-big-ministers-along-with-eknath-shinde/): नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरात याच्या काळ्या कारनाम्यांचे पाश आता थेट मंत्रालयापर्यंत पोहोचल्याचे असल्याची चर्चा सुरू आहे. एसआयटीच्या चौकशीतही तसेच संकेत दिसू लागले आहेत. अशोक खरातचे संबंध राजकीय नेत्यांसोबत असल्याचा दावा केला जात आहे. त्याच्याकडे काही राजकीय मंडळींची रांग लागली असल्याचे सांगण्यात येते. शिवसेना शिंदे गटाचे मंत्री दीपक केसरकर यांनीदेखील ३९ आमदार खरातकडे येत असे म्हटले. त्यानंतर आता आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. खरातच्या मुलीची लग्नपत्रिका समोर आली असून त्यात प्रमुख पाहुणे म्हणून बड्या नेत्यांची नावे आहेत. अशोक खरातच्या मुलीच्या लग्नपत्रिकेने महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडवून दिली आहे. राज्यातील बड्या नेत्यांची नावे या भोंदूच्या ‘खास पाहुण्यांच्या’ यादीत असल्याचे उघड […] - ["नाशिकला जात होत्या तेव्हा तुम्ही महिला नव्हत्या का?"; सुषमा अंधारेंचा रुपाली चाकणकरांवर थेट हल्ला](https://maharashtrakhabar.com/sushma-andhares-direct-attack-on-rupali-chakankar/): नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात याच्याशी संबंध असल्याच्या आरोपांमुळे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागलेल्या रुपाली चाकणकर यांच्यावर आता चौकशीची टांगती तलवार आहे. अशोक खरात प्रकरणात एसआयटीकडून चौकशीसाठी रुपाली चाकणकर यांना पाचारण करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली होती. यासाठी त्यांना समन्सही पाठवण्यात आल्याचे सांगितले जात होते. मात्र, त्या चौकशीसाठी हजर राहिल्या नाहीत. या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी रुपाली चाकणकर यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय. तसेच, सिन्नर एमआयडीसीचे चेअरमन नामकर्ण आवारेयांच्यावर देखील सुषमा अंधारे यांनी गंभीर आरोप केलाय. सुषमा अंधारे म्हणाल्या की, निव्वळ हुल्डबाजी करायची म्हणून शिंदेच्या कार्यकर्त्यांनी टीका करणाऱ्या पोस्ट केल्या. पण आम्ही […] - [आता रांगेत उभं राहण्याची गरज नाही; 'छोटू सिलेंडर' घ्या आणि थेट घरी जा!](https://maharashtrakhabar.com/no-need-to-stand-in-queues-anymore-grab-a-chhotu-cylinder-and-go-straight-home/): राज्यातच नव्हे तर देशातील अनेक भागात अजूनही गॅस एजन्सीबाहेर ग्राहकांची गर्दी झाली आहे. त्यातच इंडियन ऑईल कॉर्पोरेशनने ग्राहकांसाठी हलक्या वजनचा छोटू सिलेंडर आणला आहे. ही सिलेंडरची संकल्पना जुनीच आहे. शहरात विविध भागातील विद्यार्थी, कामगार राहण्यासाठी येतात. विविध प्रशिक्षणासाठी अनेक जण शहरात दाखल होता. काही जण कामाच्या निमित्ताने शहरात येतात. अशा लोकांसाठी हा छोटू सिलेंडर फायद्याचा ठरतो. छोटू सिलेंडर हा 5 किलो वजनाचा आहे. विशेष म्हणजे हा छोटू सिलेंडर बुक करावा लागत नाही. त्यासाठी कुठलंही वेटिंग नाही. वाट पाहावी लागत नाही. थेट गॅस एजन्सीवर जाणून अथवा अधिकृत वितरकाकडे जाऊन ग्राहकांना गॅस सिलेंडर हंडी खरेदी करता येते. इंडियन ऑईलने याविषयी ट्वीट केले […] - [खरातच्या ऑफिसवर धाड; काळे पेढे, काळी फळं आणि बरंच काही....](https://maharashtrakhabar.com/raid-on-kharats-office-black-trees-black-fruits-and-much-more/): भविष्य सांगण्याच्या बहाण्याने महिलांचं लैंगिक शोषण आणि भाविकांची आर्थिक लूट करणाऱ्या भोंदू अशोक खरात याच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. एसआयटीच्या तपासात खरातच्या काळ्या कारनाम्यांचे एकामागून एक धक्कादायक पुरावे समोर येत आहेत. सोमवारी फॉरेन्सिक टीमने खरातच्या ऑफिसची झडती घेतली. यात अनेक संशयास्पद गोष्टी आढळल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे त्याची पोलीस कोठडी आणखी वाढण्याची शक्यता आहे. कोर्टाने त्याला १ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. उद्या त्याला कोर्टात हजर केलं जाईल, यानंतर त्याची कोठडी आणखी वाढण्याची शक्यता आहे.ऑफिसमध्ये सापडले संशयास्पद साहित्य तपासाचा भाग म्हणून पोलिसांनी खरातच्या सील केलेल्या ऑफिसची फॉरेन्सिक टीमद्वारे झाडाझडती घेतली. यावेळी पथकाला अनेक संशयास्पद वस्तू आढळल्या. यामध्ये […] - [१ एप्रिलपासून बदलणार घरमालक-भाडेकरूंचे नियम](https://maharashtrakhabar.com/landlord-tenant-rules-to-change-from-april-1/): घरभाडे भत्ता क्लेम करण्याच्या प्रक्रियेत आता महत्त्वाचे बदल होणार असून, ती पूर्वीइतकी सोपी राहणार नाही. नव्या आयकर नियमांनुसार, भाडे सवलत घेणाऱ्या करदात्यांना घरमालकाशी असलेले नाते स्पष्टपणे जाहीर करणे बंधनकारक करण्यात येणार आहे.नवीन आयकर अधिनियम २०२५ अंतर्गत हे बदल प्रस्तावित असून १ एप्रिल २०२६ पासून हे नियम लागू होण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारने यासाठी सुधारित मसुदा नियम आणि नवीन फॉर्म जाहीर केले आहेत. अंतिम अधिसूचना लवकरच प्रसिद्ध होणार असून, त्यानंतर हे नियम अंमलात येतील. या बदलांमध्ये सर्वाधिक चर्चेत असलेला मुद्दा म्हणजे ‘फॉर्म १२४’ची अंमलबजावणी. या नव्या फॉर्मनुसार, HRA क्लेम करताना कर्मचाऱ्यांना ज्या व्यक्तीला भाडे दिले जाते, त्या घरमालकाशी आपले कौटुंबिक किंवा […] - [रायगडच्या 'त्या' व्यवहारांमध्ये चाकणकरांचा सहभाग?](https://maharashtrakhabar.com/chakankars-involvement-in-those-raigad-transactions/): अशोक खरात प्रकरणानंतर रुपाली चाकणकर आणि सुनील तटकरे यांना टीकेचे लक्ष केले जात असताना दोन दिवसांपूर्वी ठाकरे सेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी पत्रकार परिषद घेत चाकणकर आणि चौधरी यांचे व्यावसायिक कनेक्शन उघड करीत थेट सुनील तटकरे यांच्यावर आरोप केले होते. याबाबत आता मोठी माहिती पुढे आली आहे. तटकरे यांचे होमग्राऊंड असलेल्या रायगड मधील रोह्यात निलेश चाकणकर आणि आकाश चौधरी हे बांधकाम व्यवसायात एकत्र असल्याची माहिती उघड झाली आहे. आकाश चौधरी आणि निलेश चाकणकर यांनी पार्टनरशिपमध्ये कर्मा कन्स्ट्रक्शन LLP च्या माध्यमातून रोह्याच्या रोठ खुर्द येथे बहुमजली इमारत उभी केली आहे. आकाश चौधरी यांच्या नावावर ओशन पर्ल मेरिटाइम प्रायव्हेट लिमिटेड, कोलाड रिव्हर […] - [वारीच्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडणार?](https://maharashtrakhabar.com/maulincha-palkhicha-visawa-badalnar/): आषाढी वारीसाठी आळंदीहून प्रस्थान केल्यानंतर ज्ञानेश्वर महाराजांची पालखी दोन दिवस पुण्यातील पालखी विठोबा मंदिरात मुक्कामाला असते.मात्र वर्षानुवर्षांची परंपरा मोडीत काढून ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीच्या मुक्कमाचे ठिकाण बदलण्याचा प्रयत्न देवस्थानच्या विश्वस्तांकडून केला जातोय. मागीलवर्षी पालखी मंदिरात मुक्कामी असताना आळंदी देवस्थानचे एक विश्वस्त आणि पालखी विठोबा मंदिराचे विश्वस्त यांच्यामध्ये झालेल्या वादामुळे पालखीच्या मुक्कमाचे ठिकाण बदललं जात असल्याचं बोललं जातंय. मात्र आळंदी देवस्थानच्या विश्वस्तांकडून पालखी विठोबा मंदिर आणि परिसराची जागा गर्दीसाठी कमी पडत असल्याचं कारण दिलंय.मात्र महत्त्वाची बाब म्हणजे, मागील आठवड्यात सादर करण्यात आलेल्या पुणे महापालिकेच्या अर्थसंकल्पात पालखी विठोबा मंदिराच्या परिसरातील जागा अधिग्रहित करुन भाविकांसाठी मोठी जागा उपलब्ध करून देण्यासाठी दहा कोटींची तरतूद करण्यात […] - [१५०० कोटींचा काळा पैसा!](https://maharashtrakhabar.com/ashok-kharat-1500-crore-fraud/): स्वयंघोषित ‘कॅप्टन’ अशोक खरात याच्या काळ्या कारनाम्यांचा तपास आता त्याच्या आर्थिक साम्राज्यापर्यंत पोहोचला आहे. लैंगिक अत्याचाराच्या आरोपाखाली गेल्या दोन आठवड्यांपासून पोलीस कोठडीत असलेल्या खरातची आता विशेष तपास पथकाकडून आर्थिक नाकेबंदी सुरू झाली आहे. खरातचे सर्व आर्थिक व्यवहार सांभाळणारा त्याचा चार्टर्ड अकाउंटंट आता पोलिसांच्या रडारवर आला असून, त्याच्या चौकशीतून 1500 कोटींच्या मालमत्तेचे गूढ उकलण्याची शक्यता आहे. तपासादरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार, अशोक खरातने सामान्य लोकांना फसवून आणि लुबाडून कोट्यवधींची माया जमवली आहे. त्याची एकूण मालमत्ता 1500 कोटी रुपयांपेक्षा जास्त असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. खरातच्या या अवाढव्य आर्थिक व्यवहारांची सर्व सूत्रे संबंधित सीएच्या हाती होती. हा सीए केवळ खरातचेच नव्हे, तर ‘शिवनिका ट्रस्ट’च्या […] - [काँग्रेसचे खासदार प्रशांत पडोळेंच्या गाडीचा भीषण अपघात ; कारला ट्रकची धडक](https://maharashtrakhabar.com/mp-prashant-padole-accident-nagpur/): काँग्रेस पक्षाचे भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांच्या गाडीचा सोमवारी पहाटे भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. दिल्लीत सुरु असलेल्या संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी प्रशांत पडोळे दिल्लीला निघाले असताना हा अपघात झाला. दिल्लीला जाण्यासाठी नागपूर एअरपोर्टकडे निघालेल्या भंडारा – गोंदियाचे खासदार डॉक्टर प्रशांत पडोळे यांच्या वाहनाला एका ट्रकने जबर धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की, प्रशांत पडोळे यांच्या कारच्या पुढील भागाचा पूर्णपणे चक्काचूर झाला आहे. परंतु, सुदैवाने प्रशांत पडोळे या अपघातामधून थोडक्याच बचावले आहेत. प्राथमिक माहितीनुसार, दिल्लीला जाण्यासाठी खासदार प्रशांत पडोळे हे सुरक्षारक्षक आणि चालकासह पहाटे नागपूर एअरपोर्टकडे निघाले होते. त्यावेळी नागपूर जिल्ह्यातील हल्दीरामसमोर ट्रकने त्यांच्या […] - [आयडी घोटाळ्यात भोंदू अशोक खरातचे नाव; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश?](https://maharashtrakhabar.com/ashok-kharat-id-ghotala/): राज्यात सर्वत्र एकच नाव चर्चेत आहे आणि ते म्हणजे भोंदू बाबा अशोक खरात… त्यांच्याबद्दल आता नवीन अपडेट समोर आली आहे. भोंदू अशोक खरातच्या शिवनिका संस्थांच्या सर्व आजी-माजी सदस्यांची चौकशी होणार आहे. यामध्ये महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष रूपाली चाकणकर यांची देखील चौकशी होण्याची शक्यता आहे. भोंदू अशोक खरात सोबत निगडित व्यक्ती आणि त्याच्या संस्थांच्या सदस्यांची चौकशी होणार असल्याची माहिती देखील समोर येत आहे. परभणीच्या सेलू तालुक्यातील खवणेपिंपरीमध्ये रुही इंडियन गॅस एजन्सी मधून 56 गॅस सिलेंडर चोरीला गेल्याची माहिती समोर येत आहे. पाथरी पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपी विरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून अज्ञात आरोपीचा शोध सुरु आहे. या प्रकरणात […] - ["दिलासा की धक्का? ...तर तीन महिन्यांत गॅस सिलेंडर बंद होणार](https://maharashtrakhabar.com/chhagan-bhujbal-on-gas-cylinder/): मध्य पूर्वेतील युद्धामुळे एलपीजी संकट निर्माण झालं आहे. केंद्र सरकारकडून एलपीजी गॅसचा पुरेसा साठा असल्याचं सांगण्यात येतय. पण गॅस वितरकांच्या कार्यालयाबाहेर रांगा लागल्याचं चित्र आहे. भारताचा एलपीजीचा मोठा भाग आखाती देशांमधून येतो. स्ट्रेट ऑफ हॉर्मुजमधून इराण सहजासहजी जल वाहतुकीची परवानगी देत नाहीय. त्यामुळे ही स्थिती निर्माण झाली आहे. “मुंबई, नाशिक, पुणे येथे पीएनजी सुरु आहे, तिथे त्यांनी घ्यावं. पीएनजी जिथे काम सुरु झालेलं आहे. फार लांबच्या ठिकाणी अजून तिथे लाइन गेली नाही तिथे तुम्हाला सिलेंडर मिळणार” असं मंत्री छगन भुजबळ म्हणाले. “तिथे तुम्ही पीएनजीघेऊ शकता आणि तरी सुद्धा घेतला नाही तर तुमचं सिलिंडर बंद. मी ज्या बिल्डिंगमध्ये राहतो त्या इमारतीत […] - [तसले हिXXXडे धंदे करत नाही... तुमच्या घरात चौकशी करा](https://maharashtrakhabar.com/mla-sanjay-gaikwad-on-shweta-mahale/): सध्या बुलढाणा जिल्ह्यात भाजप आणि शिंदे सेनेत धुसफुस सुरू आहे. गेल्या दोन दिवसांपासून वाद विकोपाला गेल्याचे दिसते. शिंदे सेनेचे शिलेदार संजय गायकवाड हे त्यांच्या वक्तव्याने कायम चर्चेत असतात. तर त्यांचं आणि चिखलीच्या आमदार श्वेता महाले यांच्यातील वाद चांगलाच चव्हाट्यावर आला आहे. एका सभेत आमदार संजय गायकवाड यांची पुन्हा एकदा आमदार श्वेता महाले यांच्यावर टीका केली आहे. आमचे सरळ काम आहे, छातीला छाती भिडवायचे आणि विषय खातम करायचा,मागून पाठीत खंजीर खुपसायचे आम्हाला जमत नाही . तर आम्ही पण पाहणार , कोणाला धमकी देणार, कोणाला जेलमध्ये घालणार,आमच्या पण कानावर आहे आमदार काय करतात, मी काही घरातला आमदार नाही असे आव्हान त्यांनी महाले […] - [काही लोक या भोंदूबाबाचा प्रचार करतात](https://maharashtrakhabar.com/dattamama-bharne-on-rupali-chakankar/): नाशिकचा विकृत भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण उघडकीला आल्यानंतर सुरुवातीला रुपाली चाकणकर यांची ठामपणे पाठराखण करणारे राज्याचे कृषीमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दत्तात्रय भरणे यांचा सूर पूर्णपणे बदलला आहे. रुपाली चाकणकर यांनी काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना भेटून राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. या प्रकरणात दबाव वाढल्यानंतर रुपाली चाकणकर यांनी शुक्रवारी रात्री उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना पत्र पाठवून राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामाही दिला होता. यानंतर शनिवारी पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना रुपाली चाकणकर यांचा विषय आल्यानंतर दत्तात्रय भरणे यांचा सूर एकदम बदलल्याचे दिसून आले.आम्ही कुठलाही महाराज आणि बुवाबाजीच्या विरोधात असतो. अजितदादांनी आम्हाला तशी शिकवण दिली आहे. आम्ही भोंदूबाबांना कधी […] - [पडद्यावरचा 'नायक', खऱ्या आयुष्यात 'खलनायक'](https://maharashtrakhabar.com/tv-actor-kill-made/): मनोरंजनसृष्टीतून धक्कादायक बातमी समोर येत आहे. ठाणे जिल्ह्यातील मिरा रोड परिसरात एका अभिनेत्याने आपल्याच घरात काम करणाऱ्या मोलकरणीची हत्या केल्याचं समोर येत आहे. महिलेचा खून करून आरोपी टीव्ही अभिनेता आशिष मेश्राम याला मीरा रोड पोलिसांनी शुक्रवारी विशाखापट्टणम येथून अटक केली आहे. शरीरसुखाची मागणी महिलेने नाकारल्यामुळे आशिषने तिचा जीव घेतलाच प्राथमिक तपासात उघड झाले आहे. आशिष मेश्राम हा टीव्ही अभिनेता असून काही नावाजलेल्या मालिकांमध्ये तो झळकला आहे. या प्रकरणाने संपूर्ण मनोरंजनसृष्टीत एकच खळबळ उडाली आहे.संबंधित मृत महिलेच्या पश्चात तिचा पती आणि चार मुलं असा परिवार आहे. तिचा पती चप्पल दुरुस्तीचे काम करतो, तर मोठा मुलगा खाजगी कंपनीत कामाला आहे. आठ नऊ […] - ['या' तीन नेत्यांना खरातप्रकरणात सहआरोपी करा; खरातवरून दोन्ही राष्ट्रवादीत जुंपली](https://maharashtrakhabar.com/ashok-kharat-case-ncp-3-leader/): भोंदू बाबा अशोक खरातवरून आता दोन्ही राष्ट्रवादी आमनेसामने आल्या आहेत. शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी या प्रकरणात रुपाली चाकणकर यांच्यासह अजितदादा पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना सहआरोपी करण्याची मागणी केली आहे. त्यावर अजितदादा गटाच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते आनंद परांजपे यांनी जशास तसं प्रत्युत्तर दिलं आहे. भोंदूबाबा खरातला पाणी दिलं त्यावेळी जलसंपदा मंत्री जयंत पाटील होते. जयंत पाटील यांचे भोंदू खरातसोबत असंख्य फोटो असल्याने आधी जयंत पाटलांनाच याप्रकरणात सहआरोपी करा, अशी मागणी आनंद परांजपे यांनी केली आहे.विकास लवांडे गांडूळासारखी आपली वळवळ बंद करा. माननीय मुख्यमंत्र्यांनी विधानसभेमध्ये अत्यंत विस्तृतपणे भोंदू बाबा कॅप्टन अशोक खरात याच्यावर कडक कारवाई महायुतीचे सरकार […] - [खुशखबर ! लाडक्या बहिणींच्या खात्यात येणार थेट 4500 रुपये](https://maharashtrakhabar.com/ladki-bahin-yojana-maharashtra/): राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, त्यांच्या आरोग्य-पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजना राबवली जात आहे. या योजनेच्या माध्यमातून थेट लाभ हस्तांतरण द्वारे आर्थिक सहाय्य दिले जाते. मात्र, निकषात न बसणाऱ्या महिला सुद्धा योजनेचा लाभ घेत असल्याचं इतकंच नाही तर काही पुरुषांनीही योजनेचा लाभ घेतल्याचं उघड झालं. यानंतर सरकारने सर्व लाडक्या बहिणींना ई-केवायसी करणे अनिवार्य केले. महिला व बाल विकास विभागाकडून e-KYC माध्यमातून लाभार्थींचे आधार प्रमाणीकरण केले जात आहे. ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ या योजनेमध्ये पारदर्शकता येण्यासाठी व लाभार्थ्यांना नियमितपणे आर्थिक लाभ मिळावा याकरिता https://ladakibahin.maharashtra.gov.in या वेबसाईटवर e-KYC ची सुविधा उपलब्ध करण्यात आली होती. मात्र, […] - ["बळजबरी केलीच नाही, तो तर विधीचा भाग"](https://maharashtrakhabar.com/ashok-kharat-aghori-puja-ajab-statement/): अनेक महिलांचे लैंगिक शोषण आणि फसवणूक करणाऱ्या स्वयंघोषित ज्योतिषी अशोक खरात याच्या दुष्कृत्याचा पाढा आता वाचला जात आहे. २९ मार्चपर्यंत पोलीस कोठडीत असलेल्या खरातची एसआयटी कडून कसून चौकशी सुरू आहे.तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. स्वतःला वाचवण्यासाठी खरात आता ‘विधी’ आणि ‘अध्यात्म’ या नावाखाली केलेल्या कृत्यांचे समर्थन करण्याचा केविलवाणा प्रयत्न करत असल्याची माहिती समोर आली आहे. खरातच्या चौकशीत अनेक धक्कादायक माहिती समोर येण्याची दाट शक्यता आहे. चौकशीदरम्यान खरातने पोलिसांसमोर अत्यंत अजब दावे केले आहेत. “माझ्या अंतर्मनाने मला धोका दिला, ज्यांचे मी भले केले तेच आज माझ्यावर उलटले आहेत,” अशी प्रतिक्रिया त्याने दिली आहे. आता आपण यापुढे आपल्या मेंदूचेच ऐकणार असल्याचे […] - [टँकर चालकांना नागरिकांनी पैसे देऊ नये !](https://maharashtrakhabar.com/water-tanker-pune-manpa/): शहरात उन्हाळा वाढल्याने आता पाण्याची मागणी देखील वाढण्यास सुरूवात झाली आहे. शहरातील काही भागात अपुरा आणि कमी दाबाने पाणी पुरवठा होत असल्याने या भागातील नागरिकांची गरज भागवण्यासाठी महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या वतीने अतिरिक्त टँकर दिले जात आहेत. ‘शहरातील काही भागांमध्ये महापालिकेच्या वतीने टँकरने पाणीपुरवठा केला जातो. हा पाणीपुरवठा करताना टँकरचालक तसेच टँकरमालकांनी नागरिकांकडून पैशांची मागणी करू नये. पाण्याच्या टँकरसाठी पैसे मागितल्यास नागरिकांनीदेखील त्यांना पैसे देऊ नयेत,’ असे आवाहन महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून करण्यात आले आहे.महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख नंदकुमार जगताप यांनी हे आवाहन केले आहे. ‘जे टँकरचालक तसेच टँकरमालक नागरिकांकडून पैसे घेतील त्यांना पाच हजार रुपये दंड ठोठावण्यात येईल,’ असा इशाराही जगताप […] - [अशोक खरातच्या मंदिराचा निधी स्थानिक स्तरावरच वितरित](https://maharashtrakhabar.com/ashok-kharat-temple/): भोंदू अशोक खरातच्या इशान्येश्वर मंदिरासाठी पर्यटन विभागाकडून तब्बल १ कोटी ५ लाख रुपयांचा निधी देण्यात आल्याने प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. सिन्नर तालुक्यातील या मंदिराच्या विकासासाठी सभा मंडप, भक्तनिवास, प्रसाधनगृह, चेंजिंग रूम, पेव्हर ब्लॉक आदी कामांवर मोठा खर्च करण्यात आला. हा निधी स्थानिक प्रशासनाच्या स्तरावर वितरित करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.तत्कालीन पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी हा निर्णय जिल्हा प्रशासनाच्या अखत्यारीतील असल्याचे स्पष्ट केले. २०१८ मध्ये निधी वितरित होताना बी. राधाकृष्णन जिल्हाधिकारी, तर नितीन मुंडावरे पर्यटन विभागाचे प्रादेशिक अधिकारी होते. या निधी वाटपावर संशय व्यक्त होत आहे.सिन्नर तालुक्यातील वावी येथील ऐतिहासिक वैजेश्वर मंदिर पाडण्याचा भोंदू अशोक खरातचा अजब सल्ला ग्रामस्थांनी वेळेत […] - [स्वतःला समजायचा महादेवांचा अवतार](https://maharashtrakhabar.com/nashik-pune-aghori-puja-case/): नाशिकपाठोपाठ मुंबईतही भोंदू बाबाचा अघोरी खेळ - [हवेली भूमिअभिलेखमधील ४६ जणांची विभागीय चौकशी](https://maharashtrakhabar.com/haweli-land-records/): जमीन मोजणीत झालेल्या गैरव्यवहारामुळे तत्कालीन हवेली उपअधीक्षक अमरसिंह पाटील यांना निलंबित केल्यानंतर त्यांच्या कामकाजाचीही चौकशी करण्यात आली आहे. या चौकशीत गैरप्रकार आढळल्याने पाटील यांच्यासह तब्बल ४६ सहकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांची विभागीय चौकशी करण्याची शिफारस करण्यात आली आहे. राज्य सरकारकडून परवानगी मिळाल्यानंतर या सर्वांची चौकशी सुरू होणार आहे. या चौकशीमुळे या सर्वांना या काळात पदोन्नतीचा लाभ मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. या ४६ जणांपैकी काहीजणांची बदली झाली आहे, तर हवेली कार्यालयात सध्या ३९ कर्मचारी कार्यरत आहेत. त्यातील २८ जणांची चौकशी होणार आहे. जिल्ह्यात जमिनीच्या मोजणीत मोठ्या प्रमाणावर आर्थिक गैरव्यवहार होत असल्याच्या तक्रारी थेट महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे गेल्या होत्या. त्यात बावनकुळे […] - [पुढचे तीन ते चार दिवस संकटाचे](https://maharashtrakhabar.com/rain-yellow-alert/): मार्च महिन्याचा शेवटचा आठवडा सुरू असून घामाच्या धारांनी सध्या राज्यभरात नागरिक त्रस्त आहेत. उन्हाचा तडाखा अनेक ठिकाणी बसत असून नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. मात्र असं असलं तरी काही ठिकाणी हवामानीच टोकाची परिस्थिती जाणवत आहे. याचदरम्यान आता हवामान विभागाने नवा अलर्ट जारी केला आहे. त्यानुसार, राज्यात पुढील काही दिवस पावसाचे असून काही भागांना तर यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि कोल्हापूर घाट विभाग, सातारा आणि सातारा घाट विभाग, सांगली, सोलापूर, परभणी, बीड, नांदेड, लातूर आणि धाराशिव, तसेच विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली आणि यवतमाळ आदी भागातील तुरळक ठिकाणी […] - [एलपीजी बुकिंगविषयी मोठी अपडेट](https://maharashtrakhabar.com/lpg-booking-update/): एलपीजी बुकिंगविषयी अनके वृत्त समोर येत आहे. त्यात सरकारने गॅस बुकिंग नियमात मोठा बदल केल्याचा दावा करण्यात येत आहे. ज्या ग्राहकांकडे दोन सिलेंडर म्हणजे डबल बॉटल कनेक्शन आहे, त्यांना नवीन गॅस सिलेंडर बुकिंगसाठी 35 दिवस लागतील असा दावा करण्यात आला होता. पूर्वी हा कालावधी 25 दिवसांचा होता. हा नियम शहरी-ग्रामीण आणि दुर्गम भागासाठी लागू असेल असे सांगण्यात येत होते. पण आता सरकारने या वृत्तांचे खंडन केले आहे. शहरी भागांसाठी 25 दिवस तर ग्रामीण क्षेत्रासाठी 45 दिवस याप्रमाणे गॅस सिलेंडर बुकिंगचा नियम जैसे थे असल्याचे स्पष्टीकरण केंद्र सरकारने दिले आहे. अनेक बातम्या आणि सोशल मीडियातील दाव्यानुसार एलपीजी कनेक्शनवर सरकारने मोठा फैसला […] - [आता त्यांना कोणीच वाचवू शकणार नाही](https://maharashtrakhabar.com/anjali-damania-parth-pawar-mundhwa/): पुण्यातील मुंढवा जमीन गैरव्यवहार आणि नियमांना बगल देऊन केलेली खरेदी वादात सापडली आहे. यामध्ये पार्थ पवार आणि दिग्विजय पाटील हे अडचणीत आले आहेत. आता याप्रकरणात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया या चांगल्याच संतापल्या आहेत. त्यांनी खरगे समितीच्या अहवालाचा दाखला देत पुढील कारवाई करण्याची मागणी केली आहे. त्यांनी भोंदू अशोक खरात याच्या परदेश वारीविषयी सुद्धा मोठा खुलासा केला आहे.खरगे समितीचे अहवालात प्रथमतः अमेडिया कंपनी ही जी जमीन विकत घेणारी कंपनी होती ती दोषी आहे असं सरळ सरळ अहवालात नमूद केले आहे. तर समितीने फौजदारी बाबींसाठी योग्य विभागाकडे शिफारस केली आहे. सर्वप्रथम चौकशी समिती हे स्पष्टपणे नमूद करू इच्छिते की सदरील प्रकरणांमध्ये शासकीय […] - [राष्ट्रवादीच्या आणखी एका नेत्याच्या राजीनाम्याची मागणी](https://maharashtrakhabar.com/rashtrawadi-politician-resign/): राज्याचे अन्न व औषधी प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ हे पुन्हा एकदा अडचणीत सापडले आहेत. झिरवाळ यांचा कथित आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल झाला असून, ज्यात त्यांच्यासोबत एक तृतीयपंथी व्यक्ती असल्याचा दावा त्या व्यक्तीच्या भावाने पत्रकार परिषदेत केला आहे. झिरवळ यांच्या या व्हिडिओनंतर राजकीय वातावरणात पुन्हा एकदा खळबळ उडाली असून, विरोधकांकडून त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. सध्या नरहरी झिरवाळ हे नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार, मंत्री आहेत.दरम्यान, नरहरी झिरवाळ यांच्या या व्हिडिओनंतर विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहेत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांनी नरहरी झिरवाळ यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. हर्षवर्धन सपकाळ यांनी पोस्टमध्ये लिहिले की, ‘राज्याचे मंत्री नरहरी […] - [17 वर्षीय पुतण्याने काकीच्या बेडरूममध्ये शिरून गोळी झाडून केली हत्या ! बघा नेमकं प्रकरण काय?](https://maharashtrakhabar.com/17-year-old-nephew-enters-aunts-bedroom-and-shoots-her-dead-see-whats-the-real-story/): उत्तर प्रदेशातील मेरठ येथून नातेसंबंधांना काळीमा फासणारी धक्कादायक बातमी समोर आली आहे. काकीसोबतच्या रोजच्या भांडणाला कंटाळून 17 वर्षीय पुतण्याने तिची गोळू झाडून हत्या केल्याचं वृत्त आहे. वृत्तानुसार, आरोपी तरुण घरात घुसला आणि आपल्या काकीवर अगदी जवळून गोळी झाडली. पुतण्याने केलेल्या या हल्ल्यात पीडित महिलेला जागीच मृत्यू झाल्याची माहिती आहे. या घटनेनंतर, अल्पवयीन आरोपी तरुण घटनास्थळीवरून फरार झाला. मात्र, काही वेळानंतर त्याने स्वत: पोलीस ठाण्यात जाऊन आत्मसमर्पण केलं. शिवा त्यागी असं आरोपी तरुणाचं नाव समोर आलं असून पूजा त्यागी अशी मृत महिलेची ओळख आहे. संबंधित प्रकरणाची माहिती मिळताच, पोलिसांनी महिलेचा मृतदेह ताब्यात घेऊन तो पोस्टमॉर्टमसाठी पाठवला. या घटनेनंतर, परिसरात दहशतीचं वातावरण […] - [सुनेकडून हवी होती 'ती' गोष्ट, नवऱ्यानेही तेच सांगितलं.. विवाहितेने सगळ्यांनाच दिला धक्का!](https://maharashtrakhabar.com/the-that-thing-she-wanted-from-her-daughter-in-law-the-husband-also-told-her-the-same-thing-the-married-woman-shocked-everyone/): पंजाबच्या लुधियानामध्ये एका औद्योगिक शहरात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला. पती आणि सासरच्या लोकांनी मिळून 30 वर्षीय विवाहितेचा छळ केला. याच छळाला कंटाळून पीडितेनं जीवन संपवलं. मृत महिलेचं नाव पिंकी राणी असे आहे. तिचा मृतदेह हा घरात फासाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला होता. सासरच्या मंडळींनी विवाहितेला मुल जन्माला घालण्यावरून तिचा मानसिक आणि शारीरिक छळ केल्याचा आरोप आहे, याच त्रासाला कंटाळून महिलेनं टोकाचं पाऊल उचललं. संबंधित घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तपासानंतर पोलिसांनी तिचा पती कुलविंदर सिंगविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. शवविच्छेदनानंतर पोलिसांनी तिचा मृतदेह ताब्यात घेऊन कुटुंबीयांच्या ताब्यात दिला होता. वृत्तमाध्यमाने दिलेल्या माहितीनुसार, पिंकी राणीचा विवाह 2 ऑक्टोबर […] - [ज्याला मेहूणा समजला तोच बायकोचा नवरा निघाला...! खतरनाक प्लॅनिंग, खतरनाक उलगडा !](https://maharashtrakhabar.com/the-one-who-was-mistaken-for-a-brother-in-law-turned-out-to-be-the-wifes-husband-dangerous-planning-dangerous-revelation/): मॅट्रिमोनियल साईटवरून जोडीदार शोधताना फसवणूक झाल्याच्या अनेक घटना समोर येतात. मात्र मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये एक अत्यंत धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका वकिलाने ज्या महिलेशी विवाह केला तिनेच त्याला फसवले आहे. या फसवणुकीत ती एकटी नव्हती. तर तिचा पहिला पती ही तिच्या सोबत होता. तिने तिने आपल्या पहिल्या पतीला तिचा ‘भाऊ’ असल्याचे वकिल नवऱ्याला सांगितले. शिवाय त्याला आपल्या घरात प्रवेश ही मिळवन दिला. त्यानंतर या दोघांनी मिळून जो काही कांड केला तो पाहून पोलीस ही हादरून गेले आहेत. त्याचीच चर्चा सध्या मध्य प्रदेशातील प्रत्येक घरात आणि गावात रंगली आहे. खुडैल पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका वकिलाची मॅट्रिमोनियल साईटच्या माध्यमातून निर्मला […] - [आजीचा संयम सुटला आणि उकळते पाणी ओतले ४ वर्षांच्या नातवावर.. होळीच्या दिवशी नात्याला लागले ग्रहण](https://maharashtrakhabar.com/grandmother-loses-patience-and-pours-boiling-water-on-4-year-old-grandson-relationship-ends-on-holi/): होळीच्या आनंदोत्सवाला धक्का देणारी धक्कादायक घटना नागपूरच्या कोराडी परिसरात घडली आहे. खेळता खेळता अंगावर रंग उडाल्याच्या क्षुल्लक कारणावरून संतप्त झालेल्या आजीने आपल्या चार वर्षीय नातवावर उकळते पाणी ओतल्याची घटना समोर आली आहे. या घटनेत चिमुकला गंभीर जखमी झाला असून तो सुमारे 45 टक्के भाजला आहे. सध्या त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, कोराडी परिसरातील रहिवासी चार वर्षीय ओम हरीश वांगे हा घराबाहेर इतर मुलांसोबत पिचकारीने होळी खेळत होता. त्याचवेळी त्याची आजी सिंधू ठाकरे या होळीच्या लाकडावर तापवलेले गरम पाणी बादलीत भरून घराकडे घेऊन जात होत्या. दरम्यान, खेळताना ओमने पिचकारीतील रंग नकळत आजीच्या अंगावर उडवला. या घटनेमुळे सिंधू ठाकरे […] - [अजित पवार यांच्या विमान अपघाताबद्दल अत्यंत मोठी अपडेट](https://maharashtrakhabar.com/a-very-big-update-about-ajit-pawars-plane-crash/): राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार 28 जानेवारी 2026 रोजी मुंबईहून बारामतीकडे निघाले असता त्यांच्या विमानाचा मोठा अपघात झाला. सकाळी 8.10 ला अजित पवार मुंबई विमानतळाहून VSR कंपनीच्या विमानाने निघाले.त्यानंतर 8.45 ला बारामती विमानतळाच्या शेजारी असलेल्या शेतात त्यांचे विमान कोसळले. या विमान अपघातानंतर मोठी खळबळ उडाली. धक्कादायक व्हि़डीओही पुढे आले. एका सीसीटीव्ही फुटेजमध्ये अजित पवार यांचे विमान एका बाजूला झुकताना स्पष्टपणे दिसले. अजित पवार यांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार यांनी चार दिवसात उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. अजित पवार यांचे निधन झाल्यानंतर सर्वांनाच मोठा धक्का बसला. अजित पवार यांना शेवटचा निरोप देण्याकरिता लोकांनी मोठ्या संख्येने बारामतीकडे धाव घेतली. अजित पवार यांच्या निधनानंतर पवार कुटुंब एकत्र […] - [अख्खं गाव हादरलं, स्फोटाने संपूर्ण फॅक्टरी उद्ध्वस्त 18 जणांचा मृत्यू](https://maharashtrakhabar.com/the-entire-village-was-shaken-the-explosion-destroyed-the-entire-factory-18-people-died/): आंध्र प्रदेशमधील काकीनाडा जिल्ह्यातील वेतलापलेम गावामध्ये स्फोट झाल्याची घटना घडली आहे. एक फटाखा फॅक्टरीमध्ये हा स्फोट झाला आहे. या स्फोटामध्ये १८ जणांचा मृत्यू झाल्यााची माहिती समोर आली आहे. अनेक जण जखमी झाले आहे. जखमींना तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल केलं आहे. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.मिळालेल्या माहितीनुसार, आंध्र प्रदेशमधील काकीनाडा जिल्ह्यातील वेतलापलेम गावामध्ये दुपाराच्या सुमारास ही घटना घडली. अचानक एका फटाका उत्पादक कंपनीमध्ये भीषण स्फोट झाला. हा स्फोट इतका भीषण होता की, अख्ख गाव हादरलं. गृहमंत्री वंगालपुडी अनिता यांनी घटनास्थळाचा आढावा घेतला असून स्फोटामध्ये १८ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली आहे. या स्फोटामध्ये मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. […] - [शरद पवारांची राज्यसभेची जागा धोक्यात ? बघा सविस्तर बातमी](https://maharashtrakhabar.com/sharad-pawars-rajya-sabha-seat-in-danger-thackerays-mla-slapped-with-fine/): राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका संपल्यानंतर आता राजकीय वर्तुळात राज्यसभा आणि विधान परिषदेच्या निवडणुकांची चर्चा तापली आहे. विशेषतः एप्रिल २०२६ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे सर्वेसर्वा शरद पवार यांचा राज्यसभा कार्यकाळ संपत असल्याने त्यांच्या पुनर्निवडीची शक्यता जोर धरत आहे.गेल्या काही दिवसांत ते रुग्णालयात असल्याने प्रकृतीच्या कारणाने ते उमेदवारी सोडतील की पुन्हा लढतील, याबाबत उत्सुकता आहे. मात्र, महाविकास आघाडीतील एका राज्यसभा जागेवर तीनही पक्षांकडून दावा केला जात आहे. आदित्य ठाकरेंनंतर आता ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार वरुण सरदेसाई यांनी स्पष्ट भूमिका घेतली आहे. वरुण सरदेसाई म्हणाले, “राज्यसभेच्या जागेसाठी कुठल्याही परिस्थितीत आम्ही आमचा दावा सोडणार नाही. आमच्या पक्षातील आमदारांनी उद्धव ठाकरेंसमोर हे मत […] - [भिगवण अपहरण प्रकरणात नवा ट्विस्ट, मुलीची पलटी, बारामती कोर्टातून मोठी अपडेट](https://maharashtrakhabar.com/new-twist-in-bhigwan-case-girls-comeback-big-update-from-baramati-court/): भिगवणमध्ये  तरुणीचे अपहरण झाल्याच्या घटनेने खळबळ उडाली होती. याप्रकरणी हिंदुत्ववादी संघटनांनी आक्रमक भूमिका घेतली होती. मात्र माझे अपहरण झाले नसून आमचे एकमेकांवर प्रेम आहे, मी माझ्या मर्जीने आल्याचे तरुणीने सांगितले होते. याप्रकरणी आता सर्वात मोठी अपडेट समोर आली असून पिडीत तरुणीने बारामती कोर्टाकडे घरी जाण्याची इच्छा व्यक्त केली आहे. तरूणीने दिलेल्या या जबाबानंतर प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. आज बारामती कोर्टात व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणी झाली त्यावेळी कोर्टाकडे तरूणीने ही इच्छा व्यक्त केली. पुणे जिल्ह्यातल्या भिगवणमध्ये एका तरुणीचे अपहरण केल्याचा दावा केला जात होता, विशेष म्हणजे या मुलीचं लग्न दोन दिवसांवर असताना तिचं अपहरण झाल्याची माहिती समोर आली होती. लग्नाची खरेदी […] - [अजित पवारांच्या अपघातानंतर डीजीसीएची व्हीएसआरवर कारवाई बघा सविस्तर बातमी](https://maharashtrakhabar.com/dgcas-action-against-vsr-after-ajit-pawars-accident-see-detailed-news/): आत्ताची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अजित पवार यांच्या अपघातानंतर डीजीसीएने व्हीएसआरवर कारवाई केली आहे. डीजीसीए व्हीएसआर एव्हिएशनच्या 4 विमानांना ग्राउंड करणार असल्याची माहिती समोर येत आहे. या विमानांच्या सुरक्षा लेखापरीक्षणात त्रुटी आढळल्यानंतर डीसीजीएकडून ही कारवाई केली जाणार आहे. यासंदर्भात डीजीसीए लवकरच अधिकृत निवेदन जारी करण्याची शक्यता आहे. ज्या कंपनीच्या विमानातून प्रवास करताना अजित पवार यांचा अपघात झाला त्या ‘व्हीएसआर एव्हिएशन’विरोधात डीजीसीएने कडक पावले उचलली आहेत. या कंपनीच्या ताफ्यातील 4 विमानांचे उड्डाण तातडीने रोखण्याचे आदेश देण्यात आले आहेत. विमानाच्या सेफ्टी ऑडिटदरम्यान या विमानांमध्ये गंभीर तांत्रिक त्रुटी आणि सुरक्षा मानकांचे उल्लंघन आढळल्याने ही कारवाई करण्यात आली […] - [जन्मदात्या बापाचा कारनामा,अल्पवयीन मुलींना ओढलं वेश्याव्यवसायात](https://maharashtrakhabar.com/the-act-of-the-biological-father-dragging-minor-girls-into-prostitution/): नवी मुंबईत माणुसकीला काळीमा फासणारी एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. कोपरखैरणे परिसरात एका नराधम पित्याने आपल्याच दोन अल्पवयीन मुलींना वेश्याव्यवसायात ढकलल्याचे उघडकीस आले आहे. पोलिसांनी या प्रकरणी कारवाई करत मुलींची सुटका केली असून, एका दलालाला अटक केली आहे. नवी मुंबई पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने या प्रकरणी तातडीने कारवाई करत दोन्ही मुलींची सुटका केली आहे. नवी मुंबईच्या बेलापूर परिसरात काही अल्पवयीन मुलींकडून वेश्याव्यवसाय करून घेतला जात असल्याची गुप्त माहिती अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तातडीने सापळा रचून छापेमारी केली. छापेमारीदरम्यान 14 आणि 16 वर्षांच्या दोन अल्पवयीन मुलींकडून वेश्याव्यवसाय करवून घेतला जात […] ## Pages - [All Blocks](https://maharashtrakhabar.com/bs-all-blocks/): Support for women in leadership is high. A majority of Americans say that there should be more female leaders in politics ... - [Newsletter](https://maharashtrakhabar.com/bs-newsletter/): Support for women in leadership is high. A majority of Americans say that there should be more female leaders in politics ... - [About Us](https://maharashtrakhabar.com/bs-about-us/): Support for women in leadership is high. A majority of Americans say that there should be more female leaders in politics ... - [Contact Us](https://maharashtrakhabar.com/bs-contact-us/): Support for women in leadership is high. A majority of Americans say that there should be more female leaders in politics ... - [Injection Location: After Header News Ticker](https://maharashtrakhabar.com/bs-injection-location-after-header-news-ticker/): Support for women in leadership is high. A majority of Americans say that there should be more female leaders in politics ... - [Front Page](https://maharashtrakhabar.com/): Support for women in leadership is high. A majority of Americans say that there should be more female leaders in politics ... - [Sample Page](https://maharashtrakhabar.com/sample-page/): This is an example page. It’s different from a blog post because it will stay in one place and will show up in your site navigation (in most themes). Most people start with an About page that introduces them to potential site visitors. It might say something like this: Hi there! I’m a bike messenger by day, aspiring actor by night, and this is my website. I live in Los Angeles, have a great dog named Jack, and I like piña coladas. (And gettin’ caught in the rain.) …or something like this: The XYZ Doohickey Company was founded in 1971, […] [comment]: # (Generated by Hostinger Tools Plugin)