
पुणे प्रतिनिधी – कोपर्डी गावचे माजी सरपंच कै. माणिकराव सुद्रिक यांचे चिरंजीव अनिल सुद्रिक यांनी पुण्यात जाऊन सात वर्षांपूवी शाळा सुरू केली होती. या शाळेला आज पुण्यातील टॉप १० शाळा असा पुरस्कार मिळाल्या मुळे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.
पुण्यातील मांजरी बुद्रुक साईरामनगर मधील वंडर वर्ल्ड प्रि-स्कुल ला पुण्यातील टॉप १० प्रि-स्कुलचा पुरस्कार आज मिळाला आहे. ग्लोबल ट्रायंप फाउंडेशन च्या वतीने हॉलीडे इन येथे इंडिया एज्युकेशन समीट २०२२ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमात स्कुलच्या प्रिसिपल सौ. सोनिया सुद्रिक यांनी हा पुरस्कार स्विकारला.मांजरी बुद्रुक परिसरात कमीत कमी फि मध्ये उत्कृष्ट दर्जाचे शिक्षण व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून स्कुलने हा पुरस्कार पटकावला. हा पुरस्कार प्रिसिपल व सर्व स्टाफ यांच्या मेहनतीचा परिणाम आहे असे मत स्कुल चे फाउंडर श्री. अनिल सुद्रिक यांनी व्यक्त केले