Latest Marathi News
Ganesh J GIF

मुंबईतील कुर्ला परिसरात दुर्घटना; चार मजली इमारत कोसळली, 20-25 जण ढिगाऱ्याखाली अडकले

मुंबईतील कुर्ला एल विभागातील नेहरुनगर येथील नाईकनगर सोसायटीतील एक इमारत कोसळली. या ढिगाऱ्याखाली अनेकजण दबल्याची माहिती मिळत आहे. या घटनेची माहिती मिळताच नेहरूनगर पोलीस ठाण्याचे कर्मचारी व चेंबूर अग्निशमन दलाचे कर्मचाऱ्यांनी बचावकार्य युद्धपातळीवर सुरु केले.

मिळालेली माहिती अशी, कुर्ला येथील नाईक नगरमध्ये रात्री उशिरा ही ४ मजली इमारत कोसळली असून, या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान आणि पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक रहिवाशांच्या मदतीने तेथे बचावकार्य सुरू करण्यात आले. अनेकांना यातून बाहेर काढण्यात आले. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याचे समोर आलेले नाही.

ढिगाऱ्या खालून आतापर्यंत ५ जणांना बाहेर काढण्यात आल्याची माहिती मिळत आहे, तर आणखी काहीजण यात अडल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. अग्निशमन दलाचे जवान ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न करत आहेत.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!