
रजेवर असलेल्या जवानाने जीवाची बाजी लावून 5 जणांचा वाचवला जीव, महाराष्ट्रात ह्या जवानाची चर्चा…बघा सविस्तर बातमी..!
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी – चंद्रपुरात मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस होत आहे. त्यामुळे नदी-नाले दुथडे भरुन वाहत आहेत. अशाच एका नाल्यावरील पूल ओलांडण्याच्या प्रयत्नाच असलेला एक ऑटो प्रवाशांसह वाहून जाऊ लागला. जीव वाचविण्यासाठी प्रवाशांनी टाहो फोडला. यावेळी लष्करातील एक जवान या प्रवाशांसाठी देवदूत बनून आला आणि आपल्या जीवाची पर्वा न करता या जवानाने पाच जणांचे प्राण वाचवले. निखिल सुधाकर काळे, असे या जवानाचे नाव आहे.
चंद्रपूर जिह्यातील टाकळी गावातील नाल्यात पूल ओलांडताना पानवडाळ्याकडे जाणारा ऑटो पाण्याचा प्रवाहात वाहून जाऊ लागला. त्या ऑटोमध्ये पाच प्रवाशी होते. मृत्यूला समीप बघून ते मदतीसाठी आरडाओरडा करू लागले. मात्र, पाण्याच्या प्रवाह खूप जोरदार असल्याने कुणीही त्यांना वाचविण्यासाठी हिम्मत केली नाही.अशात महिण्याभराच्या सूट्टीवर गावाकडे आलेले भारतीय लष्कराचे जवान निखिल सुधाकर काळे यांनी थेट पाण्यात उडी घेतली. आपला जीव धोक्यात टाकून या जवानाने पाच लोकांचा जीव वाचविला. देशासाठी सीमेवर लढणाऱ्या या जवानाने रजेवर असतांनाही आपले कर्तव बजावले.