Latest Marathi News
Ganesh J GIF

पुण्यात नाकाबंदीदरम्यान एका टेम्पोत सापडले १३८ कोटी रुपयांचे सोने ; हे सोनं कोणाचे ? कुठून आले ? पोलिसांनी दिली माहिती

 विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या आहेत. २० नोव्हेंबरला मतदान असणार आहे. त्यामुळे थोडे दिवस बाकी असल्याने राजकीय हालचालींना वेग आला आहे. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून वाहनांची तपासणी केली जात आहे. दरम्यान आज (दि.२५) पुण्यात सहकार नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत १३८ कोटी रुपयांचे सोने पकडण्यात आले आहे. त्यामुळे शहरात खळबळ उडाली आहे.

सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास तपासणीवेळी हा टेम्पो अडवण्यात आला. त्यामध्ये पांढऱ्या पोत्यात बॉक्स आढळले, त्यानंतर चालक आणि आणखी एक जण यामध्ये होता. त्यांच्याकडे चौकशी सुरु आहे, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

सहकार नगर परिसरातून ताब्यात घेतलेला हा टेम्पो एका खासगी लॉजिस्टिक कंपनीचा असून यामधील सोनं पुण्यातील कुठल्या व्यापाऱ्याकडे जात होतं, याचा तपास सध्या सुरू आहे. पोलिसांनी या संदर्भात सगळी माहिती आयकर विभाग तसेच निवडणूक आयोगाला कळवलेली आहे. पुण्यातील सहाय्यक पोलीस आयुक्त कार्यालयात हा टेम्पो सध्या आणलेला आहे. याबाबत, पुण्यातील डीसीपी स्मार्तना पाटील यांनी याबाबत माहिती दिली आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!