Latest Marathi News
Ganesh J GIF

एका महिलेचे २ पती आले समोर ; दोघांचे लागले पोलीस ठाण्यातच भांडण आणि…

(प्रतिनिधी – प्रियंका बनसोडे) – बिहारमधल्या वैशाली जिल्ह्यात गुरुवारी (१ ऑगस्ट) गौरोल पोलीस स्टेशनमध्ये हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. एका बायकोसाठी दोन नवरे भांडत होते. संबंधित महिला आपली पत्नी असल्याचा दावा दोघेही करत होते. हा गोंधळ बराच वेळ सुरू राहिला. शेवटी महिलेने दोन पतींपैकी एकाची निवड केली. पोलीस स्टेशनमध्ये दोन पुरुषांनी एकाच महिलेचा पती असल्याचा दावा केला. ही महिला तीन मुलांची आई आहे. तिला १८ आणि २० वर्षांची दोन मुलं आणि १३ वर्षांची एक मुलगी आहे. दोन्ही व्यक्तींचं म्हणणं ऐकून घेतल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाची उकल करण्यास सुरुवात केली.

मिळालेल्या माहितीनुसार, मुझफ्फरपूर जिल्ह्याच्या सकरा पोलीस स्टेशन हद्दीतल्या बखरी गावातला रहिवासी राम प्रसाद महतो यांचं साक्रा पोलीस स्टेशन हद्दीतल्या मझौली गावातल्या मुलीशी २२ वर्षांपूर्वी लग्न झालं होतं. लग्नानंतर त्यांना दोन मुलं आणि एक मुलगी झाली. दरम्यान, २०१८ मध्ये पती-पत्नीमध्ये वाद झाला. पत्नी आपल्या पाच वर्षांच्या मुलीसह घर सोडून हाजीपूरला गेली. तिथे ती एका कंपनीत काम करू लागली. दरम्यान, ही महिला कुढणी पोलीस स्टेशन हद्दीतल्या ढोडी गावात राहणाऱ्या बथू राय यांच्या पत्नीला भेटली आणि तिच्यासोबत ढोडी येथे आली. काही दिवसांनी ती ढोडीजवळ असलेल्या चैनपूर भटौलिया गावातले रहिवासी हरेंद्र राय यांच्यासोबत राहू लागली.

महिलेचा पहिला पती राम प्रसाद याने पोलिसांना सांगितलं, की तो सात वर्षांपासून पत्नीचा शोध घेत होता. गेल्या मंगळवारी आपली पत्नी भटौलिया गावात राहत असल्याची माहिती त्याला मिळाली. त्यानंतर हे प्रकरण पोलीस स्टेशनमध्ये गेलं. महिलेला आपल्यासोबत घेऊन जाण्यास दोन्ही पती तयार होते; मात्र महिलेने पुन्हा आपल्या पहिल्या पतीसोबत जाण्याचा हट्ट धरला. यानंतर तिला तिच्या पहिल्या पतीसोबत पाठवण्यात आलं.

 

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!