आळंदी पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन वेगवेगळ्या कारवाईत पोलिसांनी ५ पिस्तूल आणि ११ जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. एका घटनेत आळंदी वडगाव रोडवर गुरुवारी (दि. १२) सायंकाळी सात वाजताच्या सुमारास खंडणी विरोधी पथकाने कारवाई केली.
दर्शन शिवाजी खैरनार (वय २५) याला अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून १ लाख २ हजार ५०० रुपये किमतीचे दोन देशी बनावटीचे पिस्तूल आणि चार जिवंत काडतुसे जप्त केली आहेत.
दुसऱ्या कारवाईत चऱ्होली खुर्द येथे मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाने कारवाई केली. प्रदीप उर्फ अक्षय बाळासाहेब ढगे (वय २८), सुरज अशोक शिवले (वय २४ ), मुकेश दरबार मुझालदे (वय २६), पवन दत्तात्रय शेजवळ (वय ३५) कमलेश उर्फ डॅनी महादेव कानडे (वय २९) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. आरोपींकडून १२ लाख रुपये किमतीची कार, एक लाख ५0 हजार रुपये किमतीचे तीन पिस्तूल, ७००० रुपये किमतीचे सात जिवंत काडतूस असा ऐवज जप्त केला आहे.