कर्नाटकमध्ये काँग्रेसचीच सत्ता, एक्झिट पोलचे अंदाज समोर
भाजप पिछाडीवर, जनता दल गेमचेंजर, कर्नाटक ती परंपरा कायम राखणार, पहा अंदाज
बेंगलोर दि १०(प्रतिनिधी)- कर्नाटकमध्ये विधानसभेच्या २२४ जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडली आहे. आता १३ मे रोजी निकाल लागणार आहेत. मतदान संपल्यानंतर कर्नाटकमध्ये कोण सरकार स्थापन करणार? याचे एक्झिट पोल समोर आले असून यात जवळपास सर्वच पोलमध्ये काँग्रेस जिंकण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर जनता दल किंग मेकर ठरणार आहे.
कर्नाटकमधील २२४ जागांसाठी राष्ट्रीय, प्रादेशिक राजकीय पक्षांसह विविध संघटना आणि अपक्षांसह २६१५ उमेदवार रिंगणात आहेत. बहुतांश पोलमध्ये काँग्रेसला बहुमत दाखवण्यात आले आहे. तर काही पोलमध्ये भाजपाला बहुमत दाखवण्यात आले आहे. पण सगळ्या पोलनुसार जनता दल किंगमेकरच्या भूमिकेत असणार आहे.
काही पोलचे अंदाज खालील प्रमाणे
सी-वोटर्सच्या एक्झिट पोल
भाजपा : ८३ – ९५
काँग्रेस : १०० – ११२
जेडीएस : २१ – २९
अन्य : २ – ६
सुवर्ण न्युज – जन की बात
भाजप : ९४ ते ११७ जागा
काँग्रेस : ९१ ते १०६ जागा
जेडीएस :१४ ते २४ जागा
इतर :० ते २ जागा
टीव्ही ९ भारतवर्ष – पोलस्ट्रॅट
भाजपा : ८८ – ९८
काँग्रेस : ९९ – १०९
जेडीएस : २१ – २६
अन्य : ० – ४
झी न्यूज आणि मॅट्राईज
भाजपा : ७९ – ९४
काँग्रेस : १०३ – ११८
जेडीएस : २५ – ३३
अन्य : २-५
रिपब्लिक टीव्ही- पीएमएआरक्यू
भाजपा : ८५ – १००
काँग्रेस : ९४ – १०८
जेडीएस : २४ – ३२
अन्य : २ – ६