नागपूर दि ७ (प्रतिनिधी)- नागपूरमध्ये पती दारू पिऊन सतत मारहाण करता म्हणून पीडित पत्नीने पतीची हत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. पत्नीने दारूच्या नशेत असलेल्या नवऱ्याने स्वतःचे डोके शिलाई मशीनवर आपटून आत्महत्या केल्याचा बनाव पत्नीने रचला होता. मात्र, शवविच्छेदन अहवालात पत्नीचा बनाव उघड झाला.त्यानंतर पोलिसांनी पुरावे जमवत आरोपी महिलेला अटक केली. नागपूरच्या वाजपेयी नगरमध्ये ही घटना घडली होती.
आरोपी महिलेचा नवरा रोज रात्री दारू पिऊन येत होता आणि घरात गोंधळ घालत होता. याला वैतागलेल्या बायकोने नवऱ्याच्या खून केला. पण आत्महत्येचा बनाव रचला. मात्र, शव विच्छेदन अहवालात डोक्याला मार आणि गळा आवळ्याच्या खुणा आढळल्याने पोलीसांना संशय आला.पत्नीचा बनाव फसला. ग्यानी यादव असे मृत पतीचे नाव आहे. त्याचे पत्नीशी १८ वर्षांपूर्वी लग्न झाले होते. मात्र, कुठलाही कामधंदा न करता पती दारू पिऊन घरी गोंधळ घालत होता. अखेर पतीच्या अशा वागण्याचा मुलांवर देखील परिणाम होत असल्याने संतापलेल्या पत्नीने त्याची गळा दाबून हत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो प्रयत्न यशस्वी झाला नाही. त्यानंतर आरोपी पत्नीने रॉडने डोक्यावर मारून त्याची हत्या केली.
पोलिसांनी आरोपी पत्नी राणीला ताब्यात घेतले. कलमना पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत, अशी माहिती कळमना पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांनी दिली. शिलाई काम करून घर चालवणाऱ्या पत्नीने पतीच्या जाचाविरोधात रितसर पोलीस तक्रार देण्याऐवजी हत्येचा चुकीचा मार्ग निवडला. मात्र, त्यामुळे त्रासातून सुटका होण्याऐवजी तिलाच अटक झाली आहे.