डोक्यावर अक्षदा पडण्यापुर्वीच तरूणीचा दुर्देवी मृत्यू
बहिणीच्या गावातील यात्रेला आली आणि अघटित घडल, आश्विनीचा करुण अंत
जळगाव दि १५(प्रतिनिधी)- जळगाव जिल्ह्यात झालेल्या एका अपघातात एका तरूणीचा दुर्दैवी मृत्यु झाला आहे. अश्विनी गुलाब भामरे असे मृत तरूणीचे नाव आहे. महत्वाचे म्हणजे आश्विनीचे नुकतेच लग्न ठरले होते. पण डोक्यावर अक्षता पडण्यापूर्वीच आश्विनीचा मृत्यू झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, धुळे जिल्ह्यातील मेहरगाव येथील आश्विनी अमळनेर येथील यात्रा पाहण्यासाठी बहिणीकडे आली होती. सध्याकाळी घरातील सर्वजन रिक्षाने यात्रेकडे चालले होते. पण मेहेरगाव फाट्याजवळ टाटा मॅजीकने रिक्षाला जोरदार धडक दिली. या धडकेत रिक्षात बसलेल्या अश्विनी हिच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन तिचा जागेवरच मृत्यू झाला. हा अपघात एवढा भयंकर होता की, यात अश्विनीच्या डोक्याची कवटी फुटली होती. तर रिक्षातील इतर दोनजणी जखमी झाल्या, त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरु आहेत. या अपघात प्रकरणी रविवारी दुपारी मयत अश्विनी हिचे मेव्हणे निलेश प्रवीण पाटील यांच्या फिर्यादीवरुन टाटा मॅजिल वाहनावरील चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अश्विनी हिचे बारावीपर्यंत शिक्षण झाले होते. १६ एप्रिल रोजी लग्नाची लग्न पक्के झाले होते. लग्नाची तारीख ठरणार तोच अपघाताच्या रुपाने अश्विनी हिच्यावर काळाने झडप घातली आणि लग्नापूर्वीच तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. लग्न जमलेल्या तरुणीचा लग्नापूर्वीच मृत्यू झाल्याच्या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. या अपघाताचा पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल संजय पाटील करत आहेत.