ॲड. कृपाल पलूसकर यांची भारत सरकारच्या केंद्रीय मध्य रेल्वे सल्लागार समितीच्या सदस्य पदी निवड
रेल्वे प्रवासी यांची सुखसुविधा व रेल्वेच्या प्रगतीसाठी सातत्याने कृतिशील कार्य करण्याचा मानस
पुणे २ (प्रतिनिधी)- डॉ. के. टी चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष ॲड. कृपाल पलूसकर यांची भारत सरकारच्या केंद्रीय मध्य रेल्वे सल्लागार समितीच्या सदस्यपदी महाराष्ट्र राज्यातून निवड करण्यात आली आहे. या निवडीचे पत्र मध्य रेल्वेचे उप महाप्रबंधक पियूष कांत चतुर्वेदी यांनी दिले.
निवडीनंतर ॲड. पलूसकर यांनी म्हटले आहे की, येणाऱ्या काळात रेल्वे प्रवासी यांची सुखसुविधा व रेल्वेच्या प्रगतीसाठी सातत्याने कृतिशील कार्य करण्यासाठी कायम प्रयत्नशील राहील. या समितीवर सदस्य म्हणून ३१ जानेवारी २०२५ पर्यंत कार्यरत राहणार आहे. या समितीवर महाराष्ट्र राज्यातून माझी वर्णी लागली ही माझ्यासाठी आनंदाची बाब आहे. माझ्यावर दिलेली जबाबदारी सकारात्मक कामे करत पार पाडेल.
पलुसकर यांचे सामाजिक, वैद्यकीय, शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्रात मोठे योगदान आहे. त्यांना सामाजिक क्षेत्रातील अनेक पुरस्कार मिळालेले आहेत, याचीच दखल घेऊन रेल्वे समितीने त्यांना सदस्य पदी काम करण्याची संधी दिली. त्यांच्या या निवडीबाबत शैक्षणिक, वैद्यकीय, राजकीय, सामाजिक, वकील व सर्वच स्तरातून स्वागत होत आहे.