
पुणे शहरातील वाढती गुन्हेगारी घटनांमुळे चिंतेची परिस्थिती निर्माण झाली आहे. कधी गाड्यांची तोडफोड करण्यासाठी, कधी दोन गटातील राड्यासाठी तर कधी एकतर्फी प्रेमासाठी कोयता उगारला जातोय. पुण्यातील कोयता गँगचा पुन्हा धुडगूस घालणारा व्हिडीओ सध्या समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये पोलिसांसमोरच कोयता गँगने उच्छाद मांडला आहे. त्यामुळे शहरात पोलिसांचा धाक कमी होतोय का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
पुण्यातील वडगावशेरी परिसरात रात्री ही घटना घडली आहे. दोन गटात झालेल्या वादातून कोयत्यानं हल्ला केला आहे. दोन गटात झालेल्या गँगवॉरमुळे स्थानिकामध्ये दहशतीच वातावरण निर्माण झाले आहे. महत्त्वाचे म्हणजे हा प्रकार ज्यावेळी घडला त्यावेळी महिला पोलीस अधिकारी तिथे उपस्थित होती. मात्र पोलिसांना न जुमनता कोयता गँगने दुसऱ्या गटातील तरूणावर कोयत्याने वार केले आहेत.एकीकडे पोलीस आयुक्त रितेश कुमार गुन्हेगारांवर मोक्का कारवाई करत असताना ही गुन्हेगारांचां उच्छाद कायम आहे.
बघा व्हिडीओ