
MAHARASHTRA KHABAR NEWS | सार्वजनिक रस्त्याने पायी जाणाऱ्या तरुणाला चुकून धक्का लागल्याच्या कारणावरून तिघांनी एकाला लाथाबुक्क्यांनी व दगडाने मारहाण करुन गंभीर जखमी केले. हा प्रकार मांजरी येथील महादेवनगर मध्ये गुरुवारी (दि.28) दुपारी साडे चार वाजण्याच्या सुमारास घडला. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी एकाला अटक केली आहे.
याबाबत जखमी शंतनु संतोष गायकवाड (वय-21 रा. मांजरी बु. पुणे) यांनी शनिवारी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी किरण सुरेश खलसे (वय-32 रा. महादेवनगर, मांजरी बु.) याला अटक केली आहे. तर किरण याच्या दोन अनोळखी मित्रांवर आयपीसी 324, 352, 504, 34 नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शंतनु गायकवाड हा सार्वजनिक रोडने पायी जात होता. त्यावेळी आरोपी किरण याच्या मित्राला शंतनु याचा चुकून धक्का लागला. त्यामुळे शंतनु याने त्याच्याकडे मागे वळून पाहिले. याचा राग आल्याने तिघांनी शंतनु याच्या अंगावर धावून जात शिवीगाळ केली. तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तर आरोपी किरण खलसे याने रस्त्याच्या कडेला पडलेला दगड शंतनुच्या कपाळावर मारून गंभीर जखमी केले. पुढील तपास पोलीस करीत आहेत.