Latest Marathi News
Ganesh J GIF

गेम केला, मास्टरमाईंडला सांगा, शरद मोहोळ खून प्रकरणातील मुख्य आरोपीला संदेश

शरद मोहोळ याची हत्या झाली होती. या प्रकरणात आठ आरोपींना अटक करण्यात आली होती. त्यात दोन वकिलांचा सहभाग होतो. शरद मोहोळ याचा खून नामदेव कानगुडे सोबत असलेल्या जमिनीचा वादातून झाल्याचे सुरुवातीला सांगण्यात आले. या प्रकरणात साहिल उर्फ मुन्ना पोळेकर आणि त्याचा मामा नामदेव कानगुडे असल्याचे सांगितले जात होते. परंतु पोलिसांच्या तपासातून नवीन नाव समोर आले. मुन्ना पोळेकर याचे एक रेकॉर्डिंगवरुन या प्रकरणात मास्टर माइंड रामदास मारणे असल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्याच्यासह त्यांच्या सहा साथीदारांना मुंबईत अटक केली.

काय होते ते रेकॉर्डिंग

पोलिसांनी शरद मोहोळ याचा खून करणाऱ्या आरोपींना २४ तासांत अटक करण्यात आली होती. त्यानंतर या प्रकरणात अटक करण्यात आलेला आरोपी मुन्ना पोळेकर याचे एक रेकॉर्डिंग समोर आले. खून केल्यानंतर आरोपी मुन्ना पोळेकर कोल्हापूरच्या दिशेने जात होता. त्यावेळी त्याने एका व्यक्तीकडून सिम कार्ड घेतले. त्या सिम कार्डवरून त्याने संतोष कुरपे याला फोन केला. ते हे संभाषण आहे. त्यात मुन्ना म्हणतो, “गेम केला मास्टरमाईंडला सांगा.”

सहा जणांना अटक

पोलिसांच्या तपासात संतोष कुरपे याने रामदास मारणे याचे नाव घेतले. यामुळे शरद मोहोळ हत्याप्रकरणी मुख्य आरोपीस रामदास मारणे असल्याचे समोर आले. पनवेलमधील एका फार्महाऊसमधून त्याच्यासह सहा जणांना अटक केली आहे. सहापैकी तीन आरोपी आहेत तर तीन संशयतीत आहेत. त्यांना पुणे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. यामुळे या प्रकरणाने नवीन वळण घेतले आहे.

शरद मोहोळ खून प्रकरण मोहोळ टोळी आणि मारणे टोळी यांच्यातील वाद असल्याचे आता समोर येऊ लागले आहे. मारणे टोळीने संदीप मोहोळ याचा खून केला होता. त्यानंतर त्या खुनाचा बदला शरद मोहोळ याने घेतला. आता शरद मोहोळ याचा खून करण्यात आला आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!