![Ganesh J GIF](https://maharashtrakhabar.com/wp-content/uploads/2022/08/gif-advt.gif)
निवडणुकीच्या काळातच प्रशासकीय अधिकारी मिठु मिठु बोलत आहेत – माधव काळभोर
लोणी काळभोर प्रतिनिधी चंद्रकांत दुंडे
यशवंत सहकारी साखर कारखान्याची निवडणूक जाहीर झाली.त्या अनुषंगाने इच्छुक उमेदवार हे साखर कारखानाच्या सभासदांच्या भेटीगाठी घेण्यास सध्या व्यस्त आहेत, यशवंत साखर कारखान्यात ज्यावेळी शासनाने प्रशासक नेमला त्यावेळी यशवंत सहकार साखर कारखाना हा चालू अवस्थेत होता. प्रशासक नेमण्याची कोणतीही गरज नव्हती.नेमणुक झाल्यानंतर यशवंत साखर कारखाना हा प्रचलित कायद्याला फाटा देऊन मनमानी पद्धतीने चालवला गेल्याने प्रशासकाच्या नियुक्ती नंतर अवघ्या तीन महिन्यात यशवंत साखर कारखानाला घरघर लागली व तो कारखाना बंद करावा लागला होता.साखर कारखाना बंद झाल्यानंतर तेरा वर्षाच्या कालावधीत साखर कारखान्यातील साखर तयार करण्यासाठी उपयोगी असलेल्या मोटारी, व इतर मशिनरी चोरीला गेल्या व बऱ्याच मशीन खराब झाल्या व इतर वस्तू भंगार अवस्थेत धुळ खात पडून आहेत असेही माधव काळभोर यांनी माध्यमाशी बोलताना सांगितले
साखर कारखान्यावर तेरा वर्षा पूर्वी नियुक्तीस असलेला प्रशासक हा अचानक जागा होवून या निवडणुकीत स्वतःचा बेजबाबदारपणा लपवून इतर काही राजकीय लोकांशी मिळून बिन बुडाचे आरोप करुन सुडाचे राजकारण करीत आहेत.प्रशासक पदाचा कार्यभार सांभाळलेले व भ्रष्टाचाराचा चारा गिळंकृत केलेले प्रशासकीय अधिकारी हे राजकीय लोकांशी संगणमताने निवडणुकीच्या काळातच पोपटासारखे मिठु मिठू करीत असल्याचे यशवंत सहकार साखर कारखान्याच्या सभासदांमध्ये चर्चा रंगताना दिसत आहे.