
संपूर्ण देशाचं लक्ष लागून असलेल्या निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद अखेर पार पडली आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. महाराष्ट्रासाठी महत्त्वाचा असलेल्या 48 जागांसाठी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्यानुसार, या दिवशी मतदान होईल आणि या दिवशी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रामध्ये मागील अडीच वर्षांमध्ये राजकीय उलथापालथ झाली. आधी महाविकास आघाडी सत्तेतं आलं आणि त्यानंतर शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली. त्यानंतर आता महायुती सरकार स्थापन झालं आहे. राज्यात एकूण लोकसभा जागा आहे. त्यासाठी निवडणूक होणार आहे. निवडणूक आयोगाने महाराष्ट्रासाठी असा असेल कार्यक्रम? – लोकसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता लागू झाली असून यामध्ये काय सुरु राहणार आणि बंद राहणार हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे. देशात 7 टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे. 19 एप्रिल रोजी मतदान सुरू होणार आहे. महाराष्ट्रात एकूण 5 टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे. 26 एप्रिलला पहिला तर 25 मे रोजी शेवटचा टप्पा असेल. 26 एप्रिल, 7 मे, 13 मे, 20 मे, 25 मे अशा तारखा आहेत. पूर्व विदर्भातील पाच लोकसभा मतदारसंघात पहिल्या टप्प्यात मतदान होणार नागपूर, रामटेक, भंडारा गोंदिया, गडचीरोली, चंद्रपूर मतदारसंघात पहिल्या टप्प्यात मतदान पहिल्या टप्प्यात 19 एप्रिलला पूर्व विदर्भातील पाच लोकसभा मतदारसंघात मतदान दुसऱ्या टप्प्यात वर्धा, अमरावती, बुलडाणा, अकोला आणि यवतमाळ वाशिम मतदारसंघात 26 एप्रिलला मतदान
आचारसंहिता लागू झाल्यानंतरही ही 10 कामं सुरूच राहणार
1. पेंशनचं काम
2. आधारकार्ड बनवणं
3. जाती प्रमाण पत्र बनवणं
4. वीज आणि पाण्यासंबंधी काम
5. साफसफाई संबंधी काम
6. वैद्यकीय उपचारासंबंधी मदत घेणं
7. रस्त्याच्या दुरुस्तीचं काम
8. सुरू असलेला प्रकल्पही थांबणार नाही
9. आचारसंहितेचं कारण पुढे करून अधिकारी तुमची ही कामं टाळू शकणार नाहीत
10. ज्या लोकांनी घराच्या आराखड्यासाठी आवेदन दिलंय, त्यांचे आराखडे पास होतील. पण नवीन आवेदनं स्वीकारली जाणार नाहीत.
आचारसंहितेमुळे या गोष्टींवर बंदी –
1. सार्वजनिक उद्घाटन, भूमिपूजन बंद
2. नव्या कामांचा स्वीकार बंद
3. सरकारी कामांचे होर्डिंग्ज लावले जाणार नाहीत
4. मतदार संघांत राजकीय दौरे नाहीत
5. सरकारी वाहनांना सायरन नाही
6. सरकारी कामकाजाचे होर्डिंग्ज काढून टाकले जातील
7. सरकारी भवनांमध्ये पंतप्रधान, मुख्यमंत्री, मंत्री राजकीय व्यक्ती यांचे फोटो चालणार नाहीत.
8. वर्तमानपत्र, इलेक्ट्रॉनिक आणि इतर मीडियात सरकारी जाहिराती देता येणार नाहीत
9. कुठल्याही लाचखोरीपासून स्वत:ला बाजूला ठेवा. घेऊ नका, देऊ नका.
10. सोशल मीडियावर पोस्ट करण्याआधी या गोष्टींचा विचार करा. तुमची एक पोस्ट तुम्हाला तुरुंगात पोचवू शकते. म्हणून कुठलीही पोस्ट शेअर करण्याआधी आचारसंहितेचा विचार करा. हे नियम सर्वसाधारण व्यक्तींनाही लागू होणार