Latest Marathi News
Ganesh J GIF

दिवसाढवळ्या गोळीबार, पोलीस स्टेशनच्या जवळच गोळीबार, बघा नेमकं काय घडलं?

शिर्डी – साईबाबांची नगरी आता वाढत्या गुन्हेगारीमुळे नेहमीच चर्चेत येत आहे. दरम्यान गुरुवारी भरदिवसा झालेल्या गोळीबारानंतर शिर्डीकरांनी पोलीस प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला आहे. दरम्यान साईबाबा मंदिर आणि शिर्डी पोलीस स्टेशनच्या जवळच झालेल्या या गोळीबारामुळे जरी कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी मात्र नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, २१ मार्च रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास फिर्यादी साईनाथ रवींद्र पवार आणि त्याचा भाऊ सचिन पवार बसले होते. तेवढ्यात तेथे संपत शंकर वायकर आणि त्याचा अनोळखी साथीदार असे दोघे जण मोटारसायकलने आले. संपत वायकर आणि त्याचा साथीदार यांनी साईनाथच्या दिशेने येऊन संपत वायकर याने त्याचे कमरेमधून गावठी कट्टा काढला. नंतर साईनाथला म्हणाला की, तुला एकदाच संपवून टाकतो. असे म्हणून त्याने फिर्यादीला जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने साईनाथच्या डोक्याच्या दिशेने गावठी कट्टाने फायर केला. तो फिर्यादीने चुकवला.

त्यानंतर त्याने पुन्हा आमच्या दिशेने फायर केला, परंतु तो फायर झाला नाही. फिर्यादीच्या सांगण्यावरुन शिर्डी पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास शिर्डी पोलीस करीत आहेत. दरम्यान काही दिवसांपूर्वी मंदिर परिसरामध्ये एका चहा विक्रेत्यावर काही टवाळखोरांनी चाकूचे वार केले होते. त्यात ते गंभीर जखमी झाले होते. त्यानंतर अशा अनेक छोटे-मोठे प्रकार घडले आहे. आता तर चक्क पालकमंत्र्यांच्या मतदारसंघात दिवसाढवळ्या गोळीबार झाल्याने शिर्डीत कायदा सुव्यवस्था राहिली की नाही? पोलीस प्रशासन करत काय? असाही प्रश्न सामान्य साई भक्तांसह नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!