चुकून कॅमेरा सुरू राहिला अन् महिलेच्या अंघोळ करत असतानाचा व्हिडीओ लाईव्ह झाला…,व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
व्हिडीओ कॉलच्या वापरामुळे आपल्या अनेक अडचणी सुटल्याचं दिसून येतंय. एखाद्या ठिकाणी न जाता आपण त्या ठिकाणी हजर राहू शकतो, एकाच वेळी अनेकांशी बोलू शकतो. पण जर त्यामध्ये थोडं जरी दुर्लक्ष झालं तरी त्याचा मोठा फटका बसू शकतो. असाच फटका एका महिलेला बसला आणि तिला आता जन्माची अद्दल घडली. एका अंतिम संस्काराच्या कार्यक्रमाला व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून उपस्थिती लावताना तिचा कॅमेरा तसाच सुरू राहिला आणि ती अंघोळ करतानाचा व्हिडीओचे लाईव्ह स्ट्रिमिंग झालं. उत्तर लंडनमध्ये ही घटना घडली.
ज्या लोकांना अंतिम संस्काराला उपस्थिती लावता येणार नव्हतं, त्यांच्यासाठी झूम व्हिडीओ कॉलची सोय करण्यात आली होती. त्यावेळी एका महिलेनेही त्यामध्ये सहभाग नोंदवला. चुकून तिने मोबाईलचा कॅमेरा सुरूच ठेवला आणि ती अंघोळीला गेली. त्यामुळे जे जे लोक त्या व्हिडीओ कॉलवर होते, त्यांनी त्या महिलेला विना कपडे पाहिलं. उत्तर लंडनमधील एका व्यक्तीचा कँसरमुळे मृत्यू झाला. त्याच्या अंतिम संस्काराचा कार्यक्रम सुरू होता. एका बिझनेस वूमेनला तिच्या मोबाईलचा कॅमेरा सुरू असल्याचं लक्षात आलं नाही. त्यानंतर ती अंघोळीला गेली. कॅमेराचा अँगल त्याच दिशेने होता ज्या दिशेला ती अंघोळ करत होती.चर्चमध्ये असलेल्या लोकांचं लक्ष हे त्या व्यक्तीच्या अंतिम संस्काराच्या कार्यक्रमाकडे होतं, त्यामुळे त्या लोकांनी हा व्हिडीओ पाहिला नाही. पण नंतर मात्र त्या महिलेचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला. अनेकांनी तो व्हॉट्सअॅपवर शेअर केला.