Latest Marathi News
Ganesh J GIF

उरुळी कांचन परिसरातील घटना ; योगा शिक्षकाकडून विद्यार्थिनीचा विनयभंग

नुकतीच बारावीची परीक्षा दिलेली १८ वर्षीय मुलगी उरुळी कांचन परिसरातील आपल्या आई-वडिलांकडे सुट्टीकरिता आली होती. शेजारी राहणाऱ्या एका योगा शिक्षकाने मुलीचा विनयभंग केला.पीडित मुलीने दिलेल्या तक्रारीनुसार उरुळी कांचन पोलिस ठाण्यात योगा शिक्षक भज्जूलाल रायकवार याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी (दि. ७) मुलीचे आई-वडील कामाला गेले होते. तर तिचा भाऊ शेजारी फोनवर बोलत होता. यावेळी शेजारी राहणारे भज्जूलाल रायकवार सकाळी १० वाजण्याच्या सुमारास मुलीच्या घरी आला होता व त्याने मुलीला विचारले की तुला योगासने येतात का? असे विचारले तेव्हा तिने काही माहीत नाही, असे सांगितले. त्यानंतर योगा शिक्षकाने पीडितेच्या घरात जाऊन त्या मुलीस पद्मासन, सुखासन, सिद्धासन हे योगासन शिकवले व २ योगासनांची माहिती असलेले कागद दिले व त्याच्या घरी गेला. त्यानंतर दुपारी दोनच्या सुमारास परत योगा शिक्षकाने त्या मुलीच्या घरी जाऊन माझे दिलेले २ योगासनांचे कागद घेऊन माझ्या घरी ये, असे सांगितले. त्यानुसार पीडित मुलगी तो शेजारी राहत असलेल्या घरी कागद घेऊन गेली. त्यानंतर शिक्षकाने पीडितेचा विनयभंग केला.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!