
धंगेकरांच्या कार्यकर्त्यांना साड्या वाटप भोवलं; निवडणूक भरारी पथकाकडून गुन्हा दाखल
पुण्यातील महाविकास आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या नावाने साडया वाटप करणे आणि विनापरवानगी बॅनरबाजी करणे धंगेकर यांच्या समर्थकास भाेवले आहे. निवडणुक भरारी पथकाकडून याप्रकरणी यासंर्दभात दत्तवाडी पाेलीस ठाण्यात निवडणुक आचारसंहिता उल्लंघन केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांचेकडे भाजपच्या कार्यकर्त्या माधवी निगडे यांनी लेखी तक्रार केली आहे. सदर तक्रारीनुसार काँग्रेसचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांची हिंदमाता प्रतिष्ठान संस्था आहे. हिंदमाता प्रतिष्ठानच्या माध्यमातून पुणे शहरातील लाेकसभा मतदारसंघ अंतर्गत येणारे विविध विधानसभा मतदारसंघात संत महंत व शक्ती पीठाचे पादुकांचे दर्शनाचे व महाप्रसादचे कार्यक्रम आयाेजित केले होते .