
पुणे ग्रामीण पोलीस दलातील राजगड पोलीस ठाण्याच्या हद्दीत दाखल असलेल्या खुनाच्या प्रयत्नातील आरोपीला स्वारगेट पोलिसांनी बेड्या (ठोकल्या आहेत. रोहन गौतम साळवे (वय-24 रा. कल्याण ता. हवेली जि. पुणे) असे अटक झालेल्या आरोपीचे नाव आहे. ही कारवाई गुलटेकडी परिसरात केली आहे. आरोपीवर राजगड पोलीस ठाण्यात आयपीसी 307, 353 नुसार गुन्हा दाखल आहे.राजगड पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या खुनाच्या प्रयत्नातील फरार आरोपी गुलटेकडी परिसरात आल्याची माहिती पोलीस अंमलदार अनिस शेख व रमेश चव्हाण यांना मिळाली. त्यानुसार पथकाने गुलटेकडी परिसरात शोध घेऊन रोहन साळवे याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. आरोपीला पुढील तपासकामी राजगड पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.
ही कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त प्रविण पवार, अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग प्रविणकुमार पाटील, पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील, सहायक पोलीस आयुक्त नंदिनी वग्यानी यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप फुलपगारे, पोलीस निरीक्षक गुन्हे गीता बागवडे यांच्या आदेशानुसार, सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत संदे, पोलीस उपनिरीक्षक येवले, पोलीस उपनिरीक्षक हनुमंत भोसले, पोलीस अंमलदार अनिस शेख, रमेश चव्हाण, सोमनाथ कांबळे, शिवा गायकवाड, फिरोज शेक, दिपक खेंदाड, प्रविण गोडस, संदीप घुले, सुरज पवार यांच्या पथकाने केली.