Latest Marathi News
Ganesh J GIF

रवी राणा यांच्या मुंबईतील घरात चोरी, किती रक्कम पळवली ?

आमदार रवी राणा यांच्या मुंबईतील घरात चोरी झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. रवी राणा यांच्या खार येथील फ्लॅटमधून दोन लाखांची रोकड पळवण्यात आली आहे. धक्कादायक गोष्ट म्हणजे घरातील नोकरानेची ही चोरी केली असून तो फरार झाला आहे.अर्जुन मुखिया असे आरोपीचे नाव आहे. या चोरीप्रकरणी खार पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपासाला सुरूवात केली आहे.अमरावतीचे अपक्ष आमदार असलेले रवी राणांचे स्वीय सहायक असलेल्या संदीप ससे यांचे दोन लाख रुपये पळवले. रवी राणा यांच्या खार येथील फ्लॅटमधून नोकराने चोरी केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. तक्रारदार संदीप सुभाष ससे आमदार रवी राणा यांच्याकडे स्वीय साहाय्यक म्हणून काम करतात.मिळालेल्या माहितीनुसार, खार येथील लाव्ही अपार्टमेंटच्या आठव्या मजल्यावर राणा यांच्या मालकीचे घर आहे. या फ्लॅटमध्ये अर्जुन मुखिया हा घरगडी म्हणून काम करतो. राणा यांनी त्यांचे स्वीय सहाय्यक ससे यांच्याकडे फेब्रुवारी महिन्यात दोन लाख रुपये दिले होते. ही रक्कम त्यांनी कपाटात ठेवली होती. .

आरोपी अर्जुन हा मूळचा बिहारचा असून त्याला १० महिन्यांपूर्वी राणा यांनी कामावर ठेवले होते. खारमधील फ्लॅटमध्ये तो नोकरांसाठीच्या खोलीत रहायचा. मात्र घरातील बेडरूममध्ये ठेवलेल्या रकमेवर त्याची नजर पडली आणि त्याची नियत फिरली. दोन लाखांची रक्कम घेऊन तो मार्चमध्येच दुसऱ्याआठवड्यात होळीचे कारण सांगून गावाला गेला. तो परतलाच नाही.काही दिवसांपूर्वी ससे हे खार येथील घरात आले. मात्र त्यांना तेथे ठेवलेल पैस सापडले नाहीत. ससे यांनी रवी राणा यांनी ही माहिती दिली. नोकर अर्जुन यानेच रक्कम चोरल्याची खात्री पटताच त्यांनी खार पोलिसांत जाऊन तक्रार दाखल केली. याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!