Latest Marathi News
Ganesh J GIF

१७ वर्षीय मुलाने घेतला दाेघांचा बळी

शहरातील कल्याणीनगर परिसरात शनिवारी मध्यरात्री भीषण अपघात झाला. बड्या बिल्डरच्या १७ वर्षीय मुलाने आलिशान पोर्शे कार भरधाव वेगात चालवत दुचाकीला धडक दिल्याने दोघांचा जागीच मृत्यू झाला.अनिस अवधिया आणि अश्विनी कोस्टा अशी मृत्युमुखी पडलेल्या दोघांची नावे आहेत.

दुचाकीवरील अनिस व अश्विनी दूरवर फेकले गेले. त्यात दोघांचाही जागीच मृत्यू झाला. दुचाकीला धडक दिल्यानंतर कार चालकाने कार घेऊन पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, नागरिकांनी त्याला चोप देत पोलिसांकडे सुपूर्द केले. बिल्डर असलेल्या अल्पवयीन आरोपीच्या वडिलांनी अपघातानंतर एका आमदारामार्फत हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला. मुलाऐवजी दुसरा व्यक्ती गाडी चालवत होता, हे दाखवायचे होते. प्रत्यक्षदर्शींमुळे हा प्रयत्न फसला.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!