Latest Marathi News
Ganesh J GIF

पुणे अपघात: …तर अल्पवयीन आरोपीला अटक करणार; पोलिसांनी दिली मोठी माहिती

पुणे पोर्श कार अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीबाबत पुणे पोलिसांनी मोठी भूमिका घेतली आहे. बालहक्क न्यायालयाकडून त्याच्यावर सज्ञान म्हणून खटला चालवण्याची परवानगी मिळण्यासाठी पुणे पोलिसांनी याचिका दाखल केलीय.जर न्यायालयाने त्याला सज्ञान म्हणून खटला चालवायची परवानगी दिली तर त्याला तातडीने अटक केली जाणार असल्याचं पुणे पोलिसांनी म्हटलंय.पुणे पोलिसांकडून अल्पवयीन आरोपीला बाल हक्क न्यायालयासमोर हजर राहण्यासाठी वकिलांकरवी नोटीस पाठवण्यात आलं आहे. जर न्यायालयात अल्पवयीन आरोपी हजर राहिला नाही तर त्याला फरार घोषित करण्याची कारवाई करणार असल्याचा उल्लेख नोटीसीत करण्यात आला आहे.

‘कोर्टाची भूमिका आश्चर्यकारक आणि लोकांच्या मनात शंका निर्माण करणारी आहे. याच ऑर्डरविरोधात पुणे पोलीस वरच्या कोर्टात गेले होते, पण त्यांनी पुन्हा ज्युवेनाईल बोर्डालाच रिव्ह्यू घ्यायला सांगितलं. पुणे पोलीस या केसमध्ये शेवटपर्यंत लढत राहतील. ज्युवेनाईल जस्टिस बोर्डचा आदेश येईल, त्यानंतर कारवाईची दिशा ठरवू.’ अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली होती.’या अल्पवयीन आरोपीच्या वडिलांविरोधात पोलिसांनी कारवाईकरून त्यांना ताब्यात घेतलं आहे, कारण अल्पवयीन मुलांना बिना नंबरची गाडी चालवायला देणं हादेखील गुन्हा आहे. इथून पुढे ड्रंकन ड्राईव्हविरोधात मोठी मोहिम हाती घेणार आहे’, असं फडणवीसांनी काल सांगितलं.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!