Latest Marathi News
Ganesh J GIF

पुणे पोर्शे कार अपघात प्रकरण तपास अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करा; रवींद्र धंगेकर आक्रमक

पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणाला आता राजकीय वळण आल्याचं पाहायला मिळत आहे. त्यातच अपघाताच्या पहिल्यादिवसांपासून पुणे पोलिसांच्या चौकशीवर रवींद्र धंगेकरांनीस टीका केली आणि अनेक प्रश्न उपस्थित केले.त्यानंतर ट्विट करत त्यांनी पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची तात्काळ बदली करण्याची मागणी केली. त्यानंतर आता कल्याणी नगर अपघात प्रकरणामधील तपास अधिकारी यांना निलंबित करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत, या मागणीसाठी रवींद्र धंगेकर आयुक्त कार्यालयाच्या समोर ठिय्या आंदोलन करत आहे.

तपास आधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल केला नाही तर मी शहरात विविध ठिकाणी ठिय्या आंदोलन करेन , असा इशारा त्यांनी पोलिसांना दिला आहे. या प्रकरणात दोन एफआयआर काढण्यात आले. त्यानंतर देवेंद्र फडणवीसांना पुण्यात येऊन पुणेकरांची समजूत काढावी लागली. मात्र दोन एफआयआर का काढले?, याची माहिती दिली पाहिजे आणि या प्रकरणातील तपास अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे. या प्रकरणात करोडो रुपयांचा व्यवहार एका रात्रीत झाला आहे. बिल्डरचं पोरगं पिझ्झा पार्टी करतो आणि रेड कार्पेट टाकून पोरगं घरी जातो. पालक पोलीस ठाण्यात मालकासारखे वावरत होते. दोन मुलांचा मृत्यू झाल्याचं त्यांना खंत किंवा वाईट वाटत नव्हतं. मृतांच्या पंचनाम्यासाठी पोलीस आले नाहीत पण आरोपी मुलगा घरी होता, असा आरोपही त्यांनी केला आहे.

पुण्यात अनेक शहरातून आणि राज्यातून मुलं शिक्षणासाठी येत असतात. अशा घटनांमुळे पुण्याचं नाव खराब होत आहे. राज्यातील पालकांमध्येदेखील भीतीचं वातावऱण निर्माण झालं आहे. आपला मुलगा सुरक्षित आहे का? या पुण्याच्या नावाला तडा लागण्याचं काम पोलीसांमुळे आणि पाकिट संस्कृतिच्या माध्यमातून लागत आहे, असंही ते म्हणाले.पुण्यात अनेक बेकायदेशीर पब आहेत. त्यासोबतच रुफ टॉप हॉटेल्सदेखील आहे. या ठिकाणी पोलीस जात नाही पाहाणी करत नाही आणि महापालिकेचे अधिकारीदेखील जाऊन पाहणी करत नाहीत, असा आरोपही त्यांनी केला आहे.

पुणे रॅश ड्रायव्हिंग प्रकरणी आता पुणे पोलिसांची सुद्धा चौकशी होणार आहे पुण्याचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी यासंदर्भातील आदेश दिलेत पोलीस आयुक्तांच्या मार्फत नेमण्यात आलेली पोलिसांची समिती येरवडा पोलिसांची चौकशी करेल दोन-दोन एफआयआरची नोंदणी का करण्यात आली यासंदर्भात कोणी दबाव आणलेला का त्या अल्पवयीन मुलाची वैद्यकीय चाचणी नेमकी कधी झाली सोयाबीनचा तपास या पथकाच्या माध्यमातून केला जाईल.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!