
एनडीएच्या आज बैठकीला सुरुवात झाली आहे. या बैठकीत आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची संसदीय पक्षाच्या नेत्या पदासाठी निवड होत आहे. दरम्यान, भाजपने आपल्या सर्व मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना शुक्रवारी महत्त्वाच्या बैठकीसाठी राष्ट्रीय राजधानी दिल्लीत बोलावले आहे.लोकसभा निवडणुकीच्या निकालाचा आढावा घेण्यासाठी ७ जून रोजी दिल्लीत भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची बैठक होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
9 जून रोजी सायंकाळी ६वाजता नरेंद्र मोदी सलग तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान म्हणून शपथ घेणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, त्यांनी आपल्या शपथविधी सोहळ्यासाठी भूतानचे राजा, श्रीलंकेचे राष्ट्रपती आणि नेपाळ, बांगलादेश आणि मॉरिशसच्या पंतप्रधानांसह अनेक प्रमुख नेत्यांना आमंत्रणे पाठवली आहेत.
एनडीएच्या संसदीय पक्षाच्या बैठकीत राजनाथ सिंह यांनी पंतप्रधानपदासाठी नरेंद्र मोदींच्या नावाला मंजुरी दिली. या प्रस्तावाला अमित शहा यांनी पाठिंबा दिला आहे. ते म्हणाले की, ‘गेल्या 10 वर्षात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाने नवीन उंची गाठली आहे. आगामी काळातही नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश इतिहास घडवेल. मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान व्हावे हा देशातील 140 कोटी जनतेचा प्रस्ताव आहे.’