
एका अल्पवयीन मुलीवर घरात घुसून बलात्कार केल्यानंतर त्या अत्याचाराचा व्हिडीओ बनवून तो व्हायरल केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी उत्तमनगर पोलिसांनी एका तरुणावर पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. हा प्रकार डिसेंबर 2022 ते मार्च 2023 या दरम्यान उत्तमनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला आहे.याबाबत 17 वर्षीय पीडित मुलीने गुरुवारी (दि.5) उत्तमनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सोहेल ताज शेख (वय-22 रा. यशोदिप चौक, वारजे माळवाडी) याच्यावर आयपीसी 376/2/एन, 504, 506, 507, पोक्सो अॅक्ट, आयटी अॅक्ट नुसार गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सोहेल शेख याने मुलगी अलप्वयीन असल्याचे माहित असताना देखील घरात कोणी नसल्याचा फायदा घेऊन घरात आला. त्याने पीडित मुलीसोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. शारीरिक संबंध ठेवताना आरोपी पीडित मुलीचे नग्न अवस्थेतील फोटो व व्हिडीओ त्याच्या मोबाईलमध्ये काढले. त्यानंतर आरोपीने वारंवार मुलीवर अत्याचार केले. तसेच शारीरिक संबंध ठेवताना काढलेले व्हिडीओ व फोटो पीडित मुलीच्या आई-वडीलांच्या व नातेवाईकांच्या व्हॉट्सअॅपला पाठवून व्हायरल केले. हा प्रकार पीडित मुलीला समजताच तिने पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल करुन त्याला बेड्या ठोकल्या आहेत. पुढील तपास पोलीस करीत आहेत.