Latest Marathi News
Ganesh J GIF

उरणनंतर पिंपरी चिंचवडमध्ये प्रेमाचा खूनी खेळ

उरणमधील यशश्री शिंदे हत्याकांडाची घटना ताजी असतानाच पुण्यातून धक्कादायक घटना समोर आली आहे. लग्नाला नकार दिला म्हणून 22 वर्षाच्या तरुणाने 21 वर्षीय तरुणीची चाकूने भोसकून हत्या केल्याची घटना पिंपरी चिंचवडमध्ये घडली आहे.घटनेच्या 12 तासानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. अविराज खराट असे आरोपीचे नाव आहे. पोलीस आरोपीची सखोल चौकशी करत आहेत.

‘आजतक’ने दिलेल्या माहितीनुसार, खेड येथील रहिवासी असलेली प्राची माने आणि अविराज खराट एकमेकांना आधीपासून ओळखत होते. दोघेही आधी सांगली येथे राहत होते. काही दिवसांपूर्वी अविराजने प्राचीला लग्नाचा प्रस्ताव दिला होता. मात्र प्राचीने अविराजचा लग्नाचा प्रस्ताव नाकारला. यामुळे अविराजच्या मनात खदखद होती. याच रागातून अविराजने प्राचीवर चाकूने वार करुन तिची हत्या केली.

हत्या केल्यानंतर आरोपी सातारा येथे पळून गेला. मात्र पोलिसांनी कसून शोध घेत 12 तासात आरोपीला अटक केली आहे. आरोपी साताऱ्यातून पळून जाण्याच्या तयारीत असतानाच पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत. अविराज विरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील कारवाई करत आहेत.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!