
पुणे – खडकवासला धरणात उडी मारून एका महाविद्यालयीन विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. साहिल संजय कुमार (वय-२२) असे मृत तरुणाचे नाव आहे. या घटनेने मृत तरुणाच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, पुण्यातील तुडुंब भरलेल्या खडकवासला धरणात उडी मारुन साहिलने आत्महत्या केली. धक्कादायक बाब म्हणजे आत्महत्येआधी त्याने धरणासोबत स्वतःचा फोटो काढून तो व्हाट्सअपवर नातेवाईकांना पाठवला आणि त्यानंतर उडी मारुन स्वतःचे आयुष्य संपवले.
याबाबतची माहिती मिळताच पोलिसांसह शोध पथक घटनास्थळी दाखल झाले. हवेली पोलिसांनी स्थानिक रेक्सु पथकाच्या मदतीने चार तासांच्या शोध मोहिमेनंतर साहिलचा मृतदेह धरणातून बाहेर काढण्यात आला. दरम्यान तरुणाने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल का उचलले? याबाबतचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. पोलीस याबाबतचा अधिक तपास करीत आहेत.