Latest Marathi News
Ganesh J GIF

आईचे विवाहबाह्य संबंध ! बॉयफ्रेंडने लग्नासाठी ठेवली अट, ३ वर्षांच्या लेकीसोबत आईने केले असं काही कि…

बिहारच्या मुझफ्फरपूरमधून विवाहबाह्य संबंधांमुळे एका आईने आपल्या तीन वर्षांच्या लेकीची हत्या करून मृतदेह सुटकेसमधून फेकून दिला. गुरुवारी सकाळी मुलीचा मृतदेह आढळून आला. तपासादरम्यान पोलिसांना कळलं की, मिष्टी असं या मुलीचं नाव असून ती मनोज कुमार आणि काजल यांची मुलगी आहे. जे परिसरात भाड्याच्या घरात राहत होते. मुलीच्या वडिलांनी तिच्या आईवरच हत्येचा संशय व्यक्त केला. पोलिसांनी मुलीच्या आईला ताब्यात घेऊन तिची कडक चौकशी केली.

आरोपी काजलने पोलिसांना सांगितलं की, तिचे रामपुरहरी पोलीस स्टेशन परिसरातील एका तरुणासोबत मागील एक वर्षापासून प्रेमसंबंध होते. तिला त्याच्याशी लग्न करायचं होतं पण तरुणाला आपल्या मुलीला सोबत ठेवायचं नव्हतं. त्यामुळे तिने टीव्हीवरील क्राईम पेट्रोल ही मालिका पाहिल्यानंतर आपल्या मुलीची हत्या केली आणि मृतदेह सुटकेसमध्ये भरून कचऱ्यात फेकून दिला. काजलने पोलिसांना सांगितलं की, शुक्रवारी दुपारी तिने पती मनोज याला फोनवर सांगितले होतं की, आपण आपल्या मुलीसोबत वाढदिवसासाठी मावशीच्या घरी जात आहोत. दुसऱ्या दिवशी कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर त्याच लाल रंगाच्या ट्रॉली बॅगमध्ये तीन वर्षीय मिष्टीचा मृतदेह आढळून आला. काजल यानंतर पळून गेली. तिने तिचे सर्व दागिने, आधार कार्ड आणि इतर वस्तू घेतल्या आणि फोन बंद केला.

पतीने केलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी काजलचा फोन ट्रेस केला आणि लोकेशनच्या आधारे तिला सोमवारी रामपुरहरी पोलीस स्टेशन हद्दीतील तिच्या प्रियकराच्या घरातून अटक केली. चौकशीत काजलने आपल्या मुलीची हत्या केल्याची कबुली दिली. मुलगी तिच्या प्रियकरासोबत राहण्यात अडथळा ठरत असल्याचं तिने पोलिसांना सांगितले. कारण प्रियकराने तिला मुलासोबत स्वीकारणार नसल्याचं स्पष्टपणे सांगितलं होतं. या प्रकरणावर एसपी अवधेश दीक्षित म्हणाले की, प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन विशेष पथक तयार करून तपास सुरू केला आहे. एफएसएफच्या पथकाने घरातून अनेक पुरावे गोळा केले. हत्येत वापरलेला चाकूही पोलिसांनी जप्त केला आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!