
गणपती बाप्पाला दहा दिवसांच्या पाहुणचारानंतर (दि.१७) निरोप देण्यात आला. यावेळी मोठा जल्लोष पाहायला मिळाला. या विसर्जन सोहळ्यादरम्यान तीन तरुणांचा आकस्मित मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. ससून रुग्णालयाने याबाबतची माहिती दिली आहे.

शहरातील विसर्जन मिरवणुकीवेळी नयन ढोके, विशाल बल्लाळ, व अन्य एक ४५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला असून ससून रुग्णालय प्रशासनाने याबाबतची मााहिती दिली आहे. या प्रकाराने शहरात खळबळ उडाली असून हा नेमका मृत्यू कशामुळे झाला? हे शवविच्छेदन अहवालातून समोर येणार आहे.

या तिघांपैकी लक्ष्मी रोड, टिळक रोड व एकाचा कसबा गणपती मंडळाजवळ मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या तीनही तरुणांचे मृतदेहांचे ससून रुग्णालयात शवविच्छेदन केले असून काही काळामध्ये त्याचा अहवाल येणार आहे.


