पिंपरी चिंचवडमधील रुग्णालयात बॉम्ब ? बॉम्ब शोध-नाशक पथक घटनास्थळी दाखल; पोलिसांची धावपळ, परिसरात भीतीचे वातावरण
पिंपरी चिंचवडमधील डॉ.डी. वाय पाटील रुग्णालयात बॉम्ब आहे, पुढची कारवाई तातडीनं करा. सकाळी साडे अकरा वाजता हा धमकीचा मेल रुग्णालयाच्या अधिष्ठात्यांना आल्यानं एकच गोंधळ उडाला. त्यानंतर तातडीनं रुग्णालय निर्मनुष्य करण्यात आलं अन बॉम्ब शोध-नाशक पथकाला पाचारण करण्यात आलं. कॅन्टीनमध्ये एका बॅगमध्ये बॉम्ब ठेवल्याचा अंदाज बांधून, पथकाने इथून शोधकार्य सुरू केलं. टप्याटप्याने रुग्णालयाचा कानाकोपरा ही तपासण्यात आला, मात्र कुठं ही बॉम्ब आढळला नाही. त्यामुळं हा फेक मेल असल्याचं स्पष्ट झालं अन सर्वांचाच जीव भांड्यात पडला.
या घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार, हॉस्पिटलच्या डीन यांना एक मेल आला होता. त्यामध्ये ठिकाण सांगण्यात आलेलं नव्हतं, एक बॅग ठेवल्याचं सांगण्यात आलं होतं आणि तसं मेलमध्ये लिहिण्यात आलं होतं. पुढील कारवाई करा अशी माहिती देण्यात आली होती. या मेलची माहिती समजतात पोलिसांना बॉम्ब स्कॉडला ताबडतोब याबाबतची माहिती देण्यात आली. पोलिसांची पथके देखील ताबडतोब घटनास्थळी दाखल झाली डॉग स्कॉड घटनास्थळी दाखल झालं.
तपासणी चालू आहे सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास हा मेला आला होता त्यानंतर लगेच ही कारवाई सुरू करण्यात आली. सर्व ठिकाण तपासण्यात आली हॉस्पिटलमध्ये गर्दीचे ठिकाण असलेली सर्व तपासण्यात येत आहेत. कॅन्टीन पार्किंग ज्या ठिकाणी गर्दी होते ती ठिकाण तपासण्यात येत आहेत. बाकीचे काही ठिकाणी तपासली गेली , तसं काही सापडलेलं नाही तरी देखील अद्याप पोलीस तपास करत आहेत.