Latest Marathi News
Ganesh J GIF

मतदान केंद्राच्या परिसरात मोबाईल नेण्यास बंदी – जिल्हाधिकारी-डॉ. सुहास दिवसे

विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने २० नोव्हेंबर रोजी होणाऱ्या मतदानाच्या दिवशी निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदान केंद्राच्या १०० मीटर परिसरात मोबाइल, स्मार्टवॉच, पेन कॅमेरा आदी इलेक्ट्रॉनिक उपकरण नेहण्यास मनाई करण्यात आली आहे.

मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रांवर मोबाईइ तसेच इलेक्ट्रॉनिक उपकरणे घेऊन जाण्यास मज्जाव केला आहे. मतदान केंद्र अधिकारी आणि पोलीस यांना काटेकोर अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा देखील जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी दिला आहे.मतदान केंद्रात आणि केंद्राच्या १०० मीटरच्या आवारात मतदान केंद्र अध्यक्ष, सूक्ष्म निरीक्षक सोडून निवडणूक कर्तव्यावरील अधिकारी, कर्मचारी, उमेदवार, उमेदवाराचे मतदान प्रतिनिधी, मतदार, वार्ताहर आदी कोणाही व्यक्तीला कोणताही मोबाईल, स्मार्टवॉच, पेन कॅमेरा, वायरलेट सेट यासह इलेक्ट्रॉनिक उपकरणे घेऊन येण्यास पूर्णत: बंदी आहे.

अनवधानाने आणल्यास मतदान केंद्राच्या १०० मीटरच्या अंतरावर ठेवावा लागेल. मतदान केंद्रावर किंवा मतमोजणी केंद्रावर मोबाईल सापडल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल, याबाबत सर्व उमेदवार, उमेदवारांचे प्रतिनिधी व नागरिकांनी सहकार्य करावे. निवडणूक कामकाजाची छायाचित्रे काढणे किंवा चित्रीकरण करणे, त्यांचे तसेच निवडणूकविषयक अफवा पसरविणारे संदेशाचे व्हॉटस्अ‍ॅप ग्रुप, समाजमाध्यमांवर प्रसारण करणे हा गंभीर गुन्हा आहे, असे करणाऱ्यावर गुन्हा दाखल करुन कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही जिल्हाधिकारी डॉ. दिवसे यांनी दिला आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!