Latest Marathi News
Ganesh J GIF

धक्कादायक! आरोपीनी लायटरने संतोष देशमुख यांचे डोळे जाळले

हत्येचा घटनाक्रम ऐकताना सभागृह स्तब्ध, सरपंच हत्येमागे मोठा नेता असल्याचा संशय?

बीड – बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येने सर्वत्र खळबळ उडाली आहे. त्याचबरोबर पोस्ट मोर्टम रिपोर्ट मधून धक्कादायक माहित समोर आली आहे. त्यामुळे संतोष देशमुख यांची हत्या कशी झाली याचा खुलासा झाला आहे.

संतोष देशमुख यांची ९ डिसेंबर रोजी अपहरण करून हत्या करण्यात आली होती. संतोष देशमुख यांची गाडी अडवली. सहा ते सात जणांनी त्यांचं अपहरण केलं. त्यांना बेदम मारहाण करुन नंतर त्यांची हत्या करण्यात आली. आतापर्यंत या प्रकरणात चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. सरपंचाची हत्या साधी नव्हती, लायटरने मृत सरपंच संतोष देशमुख यांचे डोळे उजळले, संपूर्ण पाठ काळीनिळी होईपर्यंत मारलं. शेवटला जीव जात नव्हता म्हणून त्यांच्या छातीवर उड्या मारण्यात आल्याचा धक्कादायक खुलासा भाजपचे आमदार सुरेश धस यांच्याकड़ून करण्यात आला आहे. संतोष देशमुख या तरुणाने भाजपा बुथप्रमुख म्हणून काम केले होते. त्याला मारताना व्हिडीओ कॉल करून कोणाला तरी दाखवण्यात आले. संतोष देशमुखचे डोळे लायटरने जाळण्यात आले. पाणी मागितलं तेव्हा दुसरं काहीतरी देण्यात आले. या प्रकरणात एक जरी अधिकारी दोषी आढळला तरी त्याच्यावर कठोर कारवाई करावी. आयपीएस दर्जाचा अधिकारी नेमून एसआयटी स्थापन करण्यात यावी अशी मागणी सुरेस धस यांनी केली आहे. दरम्यान संतोष देशमुखला गाडीत उचलून न्यायचं आणि महिलांची छेड काढली म्हणून त्याला माराहाण करायचा प्लान होता. कळंबला एक महिला तयार केली होती, त्या महिलेची चौकशी करायला हवी अशी मागणी यावेळी भाजपाचे सदस्य सुरेश धस यांनी केली आहे.

सरपंच संतोष देशमुख अपहरण करून हत्या करण्यात आली. या प्रकरणात वाल्मिकी कराड यांना अटक करण्याची मागणी केली जात आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी वाल्मिकी कराड यांच्या अटकेची मागणी केली आहे. महत्वाचे म्हणजे आज विधानसभेत या विषयावर चर्चा होत असताना धनंजय मुंडे यांनी मात्र उपस्थित नसल्याचे दिसून आले.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!