
अतुल तीन गर्लफ्रेडवर खर्च करायचा आपला सर्व पगार
पत्नी निकिताचा मोठा खुलासा, अतुलवरच आरोप, म्हणाली लग्न करायचे नव्हते पण...
बेंगलोर – एआय इंजिनियर अतुल सुभाषच्या आत्महत्येची सध्या जोरदार चर्चा आहे. सुभाषने ९० मिनिटाचा व्हिडिओ शेअर करत आत्महत्या केली होती. त्यानंतर त्याची पत्नी, सासू आणि मेव्हण्याला अटक करण्यात आली आहे. याप्रमाणे रोज नवे खुलासे होत आहेत. आता. सुभाष याची पत्नी निकिता सिंघानियाने नवे खुलासे केल्याने खळबळ उडाली आहे.
पोलिसांच्या चौकशीदरम्यान निकिताने अतुल सुभाषवर फसवणूक केल्याचा आणि त्याच्या तीन गर्लफ्रेंड असल्याचा आरोपही केला. निकिताने पोलिसांना सांगितलं की, “मला आणि माझ्या कुटुंबीयांना या प्रकरणात नाहक गोवण्यात येत आहे, आम्ही अतुलकडे पैसेही मागितले नाहीत किंवा आम्ही कधीही कोणतीही मागणी केली नाही, उलट अतुल आणि त्याच्या कुटुंबीयांनी आमच्याकडे १० लाख रुपयांचा हुंडा मागितला होता. अतुलच्या बंगळुरूमध्ये तीन गर्लफ्रेंड होत्या आणि तो सर्व पैसे त्यांच्यावर खर्च करत असे. तो माझा पगारही हिसकावून घेत असे. तसेच सासरचे आपल्यावर अत्याचार करायचे असा आरोप निकीताने केला आहे. दरम्यान अतुल आपल्या मुलाकरिता निकिताला काही पैसे पाठवायचा. तेव्हा तिचे बँक खाते जे होते त्यावर आरजे सिद्दीकीचा पत्ता होता. त्यामुळे या दोघांमध्ये कुठला व्यवहार होता का? असा प्रश्नही उपस्थित केला जातो आहे. आता निकिता सिंघानियाने अतुल सुभाषबाबत जी माहिती दिली त्यावरून या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. निकिताचा खुलासा ऐकून पोलीसही चक्रावले आहेत.
निकिता आणि अतुल यांची भेट एका मॅट्रिमोनियल साइटवर झाली होती. यानंतर दोघांनी लग्न केले. करेतर निकिताला अतुलसोबत लग्न करायचे नव्हते. पण वडिलांची तब्येत खराब असायची. अशा परिस्थितीत घरच्यांच्या दबावाखाली येऊन अतुलशी लग्न केल्याचे निकीताने सांगितले होते. तिच्या या वक्तव्याने एकच खळबळ उडाली आहे.