
लोक मला विचारतात, त्यामुळे मुख्यमंत्री तुम्ही काही तरी करा
मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासमोर भाजपाच्या महिला आमदार आक्रमक, म्हणाल्या...
बीड – संतोष देशमुख हत्या प्रकरण चांगलेच चर्चेत आहे. संपूर्ण महाराष्ट्रात त्याचे पडसाद उमटत आहेत. विशेष म्हणजे हिवाळी अधिवेशनात संपूर्णपणे या प्रकरणाची चर्चा झाली. त्यामुळे फडणवीस यांनी एसआयटी चाैकशीची घोषणा केली आहे. पण ज्यांच्या मंतदारसंघात ही घटना घडली त्या केज मतदारसंघाच्या आमदार नमिता मुंदडा यांची भूमिका आता समोर आली आहे.
नमिता मुंदडा म्हणाल्या की, संतोष देशमुख हे बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग गावाचा दोनवेळा सरपंच होता. हे प्रकरण माझ्या मतदारसंघातील आहे. देशमुखनं चांगलं काम केलं होतं, लोकप्रतिनिधी असून त्याचं राष्ट्रीय महामार्गावर अपहरण करण्यात आलं. अवघ्या दोन तीन तासात त्याचा मृतदेह रस्त्यावर फेकण्यात आला. त्याचे डोळे जाळण्यात आले, पकडून पकडून मारण्यात आलं, असं नमिता मुंदडा म्हणाल्या आहेत. ज्यानं हत्या केली तो मुख्य आरोपी सापडलेला नाही तो फरार आहे. अध्यक्षमहोदय सगळ्या लोकांना पकडून फाशीची शिक्षा देण्यात यावी. जिल्ह्यात लोकं घाबरली आहेत, जिल्हा बंद केलेला होता. सगळ्या 7 लोकांना पकडून फाशीची शिक्षा द्या, अशी मागणी नमिता मुंदडा यांनी केली. त्याचबरोबर मला लोक विचारत आहेत. त्यामुळे काहीतरी करा अशी आर्जव त्यांनी फडणवीस यांच्याकडे केली आहे. शांत मतदार संघ म्हणून केज मतदार संघाची ओळख होती. मात्र, मस्साजोगचे माजी सरपंच संतोष देशमुख यांच्या निघृण हत्येनंतर ही ओळख संपली आहे. या अमानुष घटनेमुळे बीड जिल्ह्यातील नागरिकांत प्रचंड भीतीचे वातावरण असून जनतेचा पोलीस आणि लोकप्रतिनिधी यांच्यावर विश्वास राहिला नाही, अशी खंतही नमिता मुंदडा यांनी व्यक्त केली.
सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला आठ दिवस होत आहे. या प्रकरणात पोलिसांनी वेळेवर तक्रार नोंदवून घेतली नाही. त्यांची भूमिका संशयास्पद होती. त्यामुळेच संतोषची हत्या झाल्याचा आरोप देशमुख कुटुंबीयांनी केला आहे. त्याच अनुषंगाने पोलिस उपनिरीक्षक राजेश पाटील यांचे चार दिवसापूर्वीच निलंबन करण्यात आले.