Latest Marathi News
Ganesh J GIF

अनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या पतीचा बीअर पाजून खून

प्रियकराच्या मदतीने रचला पतीच्या हत्येचा कट, प्रेमाने बोलत बीअर पाजली आणि मग....

रत्नागिरी – देशात विवाहबाह्य संबंधामुळे होणाऱ्या गुन्ह्यांमध्ये होत असलेली वाढ चिंताजनक आहे. विशेष म्हणजे महिलांचा यात असलेला सहभाग चिंतेत भर टाकणारा आहे. अशीच एक घटना
रत्नागिरीमध्ये समोर आली आहे. विवाहबाह्य संबंधात अडसर ठरणाऱ्या पतीची पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या केली आहे. यामुळे खळबळ उडाली आहे.

निलेश बाक्कर असे हत्या झालेल्या पतीचे नाव आहे. तर पत्नी नेहा बाक्कर आणि प्रियकर मंगेश चिंचघरकर यांना पोलीसांनी अटक केली आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली गिम्हवणे गावात निलेश बाक्कर यांचा सलूनचा व्यवसाय होता. परंतु, ते सोमवारी अचानक बेपत्ता झाले. त्यानंतर निलेश याच्या भावाने दापोली पोलीस स्टेशनला तशी तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनुसार पोलिसांनी निलेश याच्या पत्नी नेहाकडेही चौकशी केली.
परंतु, ती उडवाउडवीची उत्तरे देत असल्याचे आढळून आले. यामुळे पोलिसांचा तिच्यावर संशय बळावला. यातून पोलिसांनी नेहा ज्या हॉटेलमध्ये काम करत होती, त्या हॉटेलचे सीसीटीव्ही फुटेज तपासले. या सीसीटीव्ही फुटेजमध्ये नेहा आणि तिचा प्रियकर हे दोघे हॉटेलमधून एकत्र बाहेर पडत असल्याचे दिसून आले. यातून पोलिसांना संशय आणखीनच बळावला. तसेच नेहा हिने एका बिअर शॉपमधून बिअर घेतल्याचे सुद्धा सीसीटीव्हीमध्ये दिसून आले. त्यानंतर पोलीसांनी तिला आपला पोलीसी खाक्या दाखवताच पतीला बिअर पाजून प्रियकराच्या मदतीने हत्या केल्याची कबुली दिली. आपल्याच नवऱ्याला प्रियकराच्या मदतीने दारू पाजली आणि त्याचा खून केला. यानंतर निलेशचा मृतदेह विहिरीत फेकला असं तिने कबूल केले. निलेश याचा मृततेह विहीरीतून काढून दापोली रुग्णालयात पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आहे. या प्रकरणी अधिक तपास पोलीस करीत आहेत.

नेहाचा प्रियकर आरोपी मंगेश यालाही अटक केली आहे. तो एस. टी. महामंडळाचा बस चालक आहे. मंडणगड डेपोची बस दापोलीला मुक्कामी आली असता त्याला दापोली पोलिसांनी सापळा रचून अटक केली. . या भयानक हत्याकांडाने गावात खळबळीचे वातावरण आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!