![Ganesh J GIF](https://maharashtrakhabar.com/wp-content/uploads/2022/08/gif-advt.gif)
मुलगा असणं हा सर्वात मोठा गुन्हा आहे, कारण पत्नीने…
पत्नीच्या व तिच्या प्रियकराच्या त्रासाला कंटाळून तरुणाची आत्महत्या, त्या व्हायरल व्हिडीओमुळे खळबळ
बरेली – इंजिनियर अतुल सुभाषच्या आत्महत्येनंतर पत्नीच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करणाऱ्या विवाहित पुरुषांच्या प्रमाणात मोठी वाढ झाली आहे. दोन दिवसापुर्वी कर्नाटकमध्ये एका विवाहित युवकाने आत्महत्या केली होती. त्यानंतर बरेलीतही व्हिडिओ बनवत एका विवाहीत तरुणाने आत्महत्या केली आहे.
बरेली जिल्ह्यात पत्नीच्या छळाला कंटाळून पतीने आत्महत्या केली आहे. मृत्यूपूर्वी त्याने व्हिडीओ बनवून आपल्या वेदना व्यक्त केल्या होत्या. सुरेंद्र सिंह असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. याआधी तरुणाने ६ मिनिटे ५० सेकंदांचा व्हिडीओ बनवला आणि त्याच्यासोबत घडलेल्या गोष्टी सांगितल्या, त्यानंतर त्याने आत्महत्या केली आहे. भोजीपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात राहणाऱ्या सुरेंद्रने २५ जानेवारीला आत्महत्या केली होती. तत्पूर्वी बनवण्यात आलेल्या व्हिडिओत सुरेंद्र म्हणाला की, २०२० मध्ये माझं लग्न झाले, तेव्हा मला वाटले होते की आता आयुष्य चांगले होईल. पण माझ्या पत्नीचे लग्नाआधीच तिचे कोणाशी तरी प्रेमसंबंध होते. त्यात तिची आई म्हणायची की माझी मुलगी १५ दिवस तिच्या सासरच्या घरी आणि १५ दिवस तिच्या आईवडिलांच्या घरी राहील. माझ्या पत्नीनेही तिच्या बॉयफ्रेंडला हाताशी धरून माझ्यावर खोटी केस केली. तसेच तिच्या बॉयफ्रेंडने मला मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिली होती. मुलगा असणं हा सर्वात मोठा गुन्हा आहे, कारण कोणीही तुमचं ऐकणार नाही. ना कायदा ना पोलीस. मला जगायचं नाही. मला आई आणि बाबा खूप आवडतात. मी सरकारला विनंती करतो की कोणीही माझ्या पालकांना त्रास देऊ नये. माझ्या मृतदेहाचं शवविच्छेदन करू नये, अशा शब्दात आपले दु:ख व्यक्त करत त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. दरम्यान पत्नीच्या प्रियकराकडून त्याला मारहाण करत १५ ते २० लाख रुपयांची मागणी करण्यात आली होती. पण या काळात पोलिसांनीही मदत केली नाही, असेही सुरेंद्र सिंगने म्हटले आहे.
या घटनेनंतर कुटुंबाच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी सुरेंद्रची पत्नी, सासू आणि मेहुणा कमल राणा यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी व्हिडिओची दखल घेतली आहे आणि कारवाई सुरू केली आहे.